August 24, 2008

पाचोळा (हायकू)

पाचोळा ( आधुनिक हायकू)

तुझ्या मोटारीच्या मागे मागे
येई मी फ़रफ़टत ....
पाचोळा

(शेताकरयाला पाचोळा फार मोलाचा असतो। त्याची शेकोटी होते। त्याचे शेतासाठी (कम्पोस्ट) खत होते। पण आधुनिक इन्डियात [वाटल्यास भारत म्हणा किंवा हिन्दुस्तान म्हणा] टाटा सारखे आधुनिक राजे महाराजे तयार झाले आहेत. शेतकरी की पाचोळा, त्यांची त्याना काय किंमत ? पुढे वाचा )

२४.८.२००८
~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 21, 2008

एक मातीचा बंध

एक मातीचा बंध

आयुष्य अस्तित्व पणाला लावून
आतडे पिळवटून
अनुभूतिच्या विश्वाची चाळण करून
संवेदनेपार रक्त वाफ़ारून
माझे मीपण निचरून
आकृति आकाराते अमूर्त वास्तवातून
एक मातीचा बंध।

तुच्छ किताब हिणकस
क्षुद्र आकांक्षा क्षणिक
आहुति त्यांची - पेटतो
ज्वालामुखी मातीचा कण।
- - - - -
मुंबई
तारीख: ३०-०४-१९९७

----------------------
© Remigius de Souza। All rights reserved।
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 10, 2008

लागेबांधे

लागेबांधे

काही वर्षापूर्वी लिहिलेल्या या दोन कविता: "आई" आणि "बाप माझा" पुन्हा वाचल्यावर वाटले त्या अजूनही कालबाह्य झालेल्या नाहीत। आज समाजाच्या वेगवेगळ्या थरातून वैयक्तिक आणि सामाजिक मुल्ये मात्र झपाट्याने उलटीपालटी होत आहेत, तशाच व्यक्ति आणि समष्टि यांच्या भूमिका पण।

तरीही ती म्हण आजही लागू आहे असे मला व्यक्तिश: वाटते। बाक़ीचे सर्व काळ (समय आणि मरण या दोनही अर्थाने) ठरवणार।

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 08, 2008

शून्य कि संभ्रम: End of an Era

शून्य कि संभ्रम
-----------------------------------------------------------------------------------

शून्य कि संभ्रम ?
हरघडी पाहिले माघारा वळून:
विस्कळित
शापित भूमी -
एका ख़न्डाचा शेवट नजीक आला।
-----------------------------

End of an Era

Zero or illusion?

Each time turned back to notice —

Fissured cursed land:

The end of one era nearing.

(Translation by the author from the original Marathi text)

~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 02, 2008

रोग कोणता? औषध काय?

रोग कोणता? औषध काय?

मी वेडापिसा
लोक वेडेपिसे
रबरी फुगे, गोळ्या,
नसबंदी -
रोग कोणता?
औषध काय?
लितांचा पतितांचा महापूर
थांबवणे म्हणजे काय
डोळे बांधून गाढवाला
शेपूट लावायचा खेळ आहे?
---
सन १९६८

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 01, 2008

वळणावळणाने जाणारी वाट

वळणावळणाने जाणारी वाट

वळणावळणाने जाणारी वाट
माझ्या दारी
ओलावतो कातळ काळा मध्यान्ही
वळून पाहशील तेव्हा
हरवलेली वाट वळणावर
वळेसरात अबोलीच्या
माडराईत बांबूच्या बेटात
वळणाशी श्रंगार वाऱ्याचा फुलेल
पायरव हरवेल आभासात
~~~~
सावंतवाडी
सन १९७०

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape