September 30, 2008

रंगले आभाळ अपार

रंगले आभाळ अपार

घर माझे मोठे आभाळाएवढे.
हरवून बसलो होतो स्वत:ला
जेव्हा अंहकार जागा झाला.
नदी केव्हाच वाहून गेली होती.
अंहकार एकटा आहे
एकाकी आहे.
रंग उडाले आभाळाला चिकटले।
रंगले अपार आकाश.
उजाड राने पथ्थर झिजलेले
आभाळ रंगलेले.
-----
स्थळ: बडोदे
तारीख: २६-१०-१९६९
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 25, 2008

प्रार्थनेचे सामर्थ्य आणी भुईगोलाचे तप्त हवामान

प्रार्थनेचे सामर्थ्य आणी भुईगोलाचे तप्त हवामान

प्रार्थना जेव्हा होते काम
स्रुष्टी सारी होते विद्रूप जबाबदारी.

काम जेव्हा होते प्रार्थना
सृष्टी सारी होते मंगलमय शिव.

(मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर. या कवितेवरील इंग्रजी टिप्पणीसाठी पहा)

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 19, 2008

व्यक्ती आणि समष्टी

रेमीजीयस डिसोजा उवाच:

व्यक्ती आणि समष्टी

व्यक्तिस्वातंत्र्याच्या युध्दात
वसतीच्या वेशीवर
समष्टी कामास आली.
पराधीन - स्वाधीनतेच्या संघर्षात
परास्पराधीन कामास आले.
-----
मुंबई
१०.४.१९९७
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 16, 2008

येईतो बोलावणे

येईतो बोलावणे

वाहिले तुझिया चरणे सुखदु:ख उणेदुणे
तुवें दिले तैसे जगणे येईतो बोलावणे.

नाही मानपान जोखणे सोडिजे अहंकारी लाजीरवाणे
हव्यासाने भरले जीणे मिरावावे जीवाचे अमूल्य लेणे.

चव्वलाच्या नादीं घटकापळांच्या हिशेबी
मोहाचे मोहोळ खरेची वाटले.

मोहाचे मोहोळ वाटले जीवाचे सार्थक
कर्मयोगी मधुमाशी मुक्त मात्र.

नाही चुकावावा क्षण जीवनमरणाच्या रेषा क्षीण
अथवा भरकटणे उरेल रानोमाळ.

अहंकाराच्या जाळी उभ्या पावलोपावली
शुध्द हरपली वेळोवेली अष्टांगी सावधान.

आकाशी झेप पतंगाचे जळणे
सार्थकी लागणे दिव्याशी जोड़ने.
-----
रेमीजीयस डिसोझा
२८.१२.१९९९
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 15, 2008

माझी शतकांची वाटचाल

माझी शतकांची वाटचाल

बाभळीच्या तप्त पिवळ्या
काटेरी सावळ्या
ओरखाडतात
माझी लक्तारांची पूंजी
राखलेली
वाटचालीत शतकांच्या.

११.९.१९८५
(भालप्रदेश, गुजरात)

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 12, 2008

व्यावसायिकाना सलाम!

व्यावसायिकाना सलाम!

अर्जुनाला पोपटाचा डोळाच दिसता होता.
व्यावसायिकाना सलाम!
मला अभाग्याला डोळा दिसतो.
पोपट दिसतो.
फांदी दिसते.
झाड दिसते.
जमीन दिसते.
अन्न-पाणी देणारी जमीन दिसते.
पाऊस पाडणार्या आकाशाचे
त्याच्या डोळ्यावर प्रतिबिंब दिसते.
डोळ्याचा आतला अंधार दिसतो.
त्यावर उमटलेले निळ्या आकाशाचे
चित्र दिसते.
अर्जुनाचा तीर सुटला.
पण माझे तीर-धनुष्य गळून पडले.
पोपट त्याच्या जन्मातून मुक्त झाला.
मी माणसाच्या जन्मातून मुक्त झालो नाही.
(मला पुनर्जन्माचे वरदान मिळाले.)

----
बडोदे
नोव्हेंबर १९७०
(इंग्रजी भाषांतर पहा)
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 09, 2008

सायंतारया सय तुझी

सायंतारया सय तुझी

सायंतारया सय तुझी
गलाबताच्या कुशीत
गलबत आहे अंधाराच्या भरतीत.

पश्चिमवारया, पश्चिमवारया
येशील का न्यायला?
तर आहे नजरेपार.

(तर: किनारा)

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 06, 2008

प्रतिमा

प्रतिमा

जग प्रतिमांचे
आमचे आहे प्रारब्ध
ज्या प्रतिमा बंडखोर.

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape