May 30, 2009

परिमितींच्या पार

सागर अथांग अमर्याद
रिते न होणारे
करुणेचे सडे अनंत |१|

वाळवंट जात क्षितिज रेषेपार
ऊनाच्या झळा
उर्जेचे स्रोत अपरंपार |२|

कड्याकपारी उंचावत खडतर
विहंगामाचे दर्शन
अनंताचे संगीत सतत |३|

चांदण्यांच्या अपार गालिचाला
अंधाराच्या कडा
उल्केचे बंध अवकाशाला |४|

(१९-१२-१९९३)


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 25, 2009

अखेरीचे अर्ध्य

कोंडलेल्या पाळीव जनावरा
हवी आहे आता काही मोकळी हवा

थकल्या भागल्या वाटे जीवा
विश्राम मज काही हवा हवा

जीवनाचा कधीचा पाठ चुकलेला
मुक्त चित्ताने पुन्हा वाचावा

सुजन दुर्जन गुणावगुण
माझ्यातच सारे म्या पाहिले

नाही परी मानापमानाची चाड
नाही कधीही अनुतापाची वाण

अखेरीचे हे अर्ध्य आता
माझ्या लांबलेल्या वाटेवर

विनम्र मी वाहितो तुजला
हे अनामिका जनजनार्दना!

---

मुंबई

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 16, 2009

मरूभूमि


मरूभूमि तृषार्त जरी
इवल्याशा ओलाव्या
तिचे स्मितहास्य परी
उमले उनात काटेरी.
- - -
(मूळ इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 11, 2009

काळ (पेट्रार्कन सुनीत)

ज्या
वाटांवरून
मी
गेलो;
काळ
यम /
समय
येतोय
मागे
मागे
माझ्या
पावलांच्या
खुणा
पुसत.

- - - - -
काही वर्षांपूर्वी लिहिलेली ही रचना, जिचे स्वरूप प्रार्थनात्मक होते ते बदलून अपरिहार्य वस्तूस्थितित्मक केले. कविता केवळ अभिव्यक्तिच असते असं काही नाही. ती "सेफ्टी वाल्वचं" पण काम करते.
केव्हातरी एक पेट्रीआर्कन सुनीत वाचनात आले आणि शब्दांचा खेळ खेळलों. आजच्या SMS च्या जमान्यात एकदम फिट्ट.



~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 03, 2009

सूरसागराच्या पाळीवर - वडोदरा

  सुरसागर, वडोदरा, गुजरात  

सूरसागराच्या पाळीवर - वडोदरा

-----------------------------------------------------
कोणत्याही एका संध्याकाळी
सूरसागरावरच्या पाळीवरून
पांढुरके करडे ठिपके सरकतात
मागे पुढे संथ कधी द्रुतगती
निओनच्या प्रकाशात
चांदण्यांची प्रतिबिंबे लुप्त होतात


कोणत्याही एका संध्याकाळी
सूरसागराच्या पाळीवर
बसते जोडपे बिंब शोधित
बोटात बोते गुंतवून
झगमगलेल्या विजेरी पाण्यात
हरवतात स्वत:ला

रस्ते गजबजतात
गर्दी शोधित कातरवेळी
फटक प्रकाशात रंगलेली तोंडे
न्याहाळीत कोणतीही एक संध्याकाळ
सूरसागराच्या पाळीवर वखवखलेली
सिंधी ठेल्यावरच्या
भाजियानी वासाळलेली
शिंतोडा चुकवत शिताफिने
फिट्ट नायलोन मध्ये

कोणाही एका संध्याकाळी
सुरसागराच्या पाळीवर
लाल हिरव्या प्रकाशाच्या रोगणात
लपलेला मुखवटा मिचकावतो डोळा
आणि एक वाकडा व्यवहार सरळ बनतो

कोणाही एका संध्याकाळी
सुरसागराच्या पाळीवर
डांबरी पट्ट्यावर काचेरी रंगाचे
लोलक सरकताना
निओनच्या रोगणात एक जादू बनते
सरळ व्यवहार आडोसा शोधतात
आणि वाकडे बनाव सरळ दिसू लागतात

विजेरीच्या झगमगाटात लपल्या
फिकट पणत्या - लामण दिवे
मिजाशीने चुकवली तरी
कातरवेळ टळत नाही

नियमाने कोणत्याही एका संध्याकाळी
उद्याही याच वेळी
हीच धावाधाव पाठीशी लागेल
तोंड लपवण्यासाठी
निओनच्या बदलत्या रंगात
----
(बडोदे - गुजरात । सन १९६९)
(नगर रचनाकार असो की आर्किटेक्ट - व्यावसायिक असला तरी लोकाभिमुख नसला तर त्याचे विज्ञान वा तंत्रज्ञान केवळ निर्जीव यंत्रच निर्माण करेल - जिवंत "वास्तु" नाही. कोणतेही कायदे न्यायाच्या वर असू शकत नाहित.
सूरसागराला अनेक परिमाणे आहेत; ती एक जिवंत वास्तु आहे. त्याच्याशी "कार पार्क" आणि "वाटर पार्क" यांची तुलनाच होऊ शकत नाही. अधिक वाचा )

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape