July 31, 2009

वर्षेच्या आगमनासवे येती...(Rain Song)

वर्षेच्या आगमनासवे येती...
वर्षेच्या आगमनासवे येई मोराचा केकारवपहिल्या सरी घेऊन येती मातीचा सुवास
पावसाच्या सरी घेऊन येती आशा अन् ओढ़
घराची वसलेले फार दूरच्या डोंगरांत
जेथे पश्चिमेची शीतळ मऊ मोरपिशी
झुळुक आणते दिलासा:
वेळ ही पुनरुत्थानाची.
* * *

(मूळ इंग्रजी "With monsoon comes " या माझ्या कवितेचे भाषांतर: इंग्रजी कविता वाचल्यास लक्षात येईल त्यावर मराठीची छाप आहे. ती छाप जवळ जवळ सर्वच इंग्रजी लेखनावर आहे. वाटल्यास तिला रेमीची "इंग्रजी बोली' म्हटले तरी चालेल.)

~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 28, 2009

सोहळा करू! वर्षा ऋतु आता!

सोहळा करू! वर्षा ऋतु आता!
सोहळा करू! वर्षा ऋतु आता!
सुप्त असलेली बीजे अंकुरली आता
करपलेल्या मातीतून
लांबवर केलेल्या प्रतीक्षे उपरांत.
असे कदाचित हा सुमुहुर्त आता
बी-बियाणे पेरायला - सांभाळाया
येते जे सैपाकाघरातल्या कच्ररयातून
संधी त्यां देऊ रुजण्याची परतून
चिमुटभर मातीत
टमरेलात ठेवलेल्या बारीच्या उंबारयावर;
व्हायला आम्ही निमित्तमात्र घडीभर
साफ करायला हवा प्रदूषित
बोल-बोल-बोल अखंड करून;
मुक्त व्हायला घडीभर
मायावी वास्तवतेच्या दुनियेतून,
जोडू आम्हासी अदृश्य जमातींशी
त्या चिमुटभर सजीव मातीतील घडीभर
साधावया संपर्क साक्षात
जाणीवपूर्वक घडीभर
पंचामहाभूतांशी, जीवनाशी.
* * *

(लेखकाच्या "Rejoice! It's Monsoon" या मूळ इंग्रजीचे भाषांतर)

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 23, 2009

"झपूर्झा", केशवसूतांची कविता शंभर वर्षांनंतर

"झपूर्झा", केशवसूतांची कविता शंभर वर्षांनंतर


(लेखन: मुंबई, २ जुलै १८९३; प्रसिध्दी: करमणूक, १२ जुलै १८९३, पृष्ट ९८; लेखक "केशवसूत" कृष्णाजी केशव दामले: जन्म ७ आक्टोबर १८६६, रत्नागिरी, मालगुंड; मृत्यू ७ नोवेंबर १९०५)


केशवसूत सुरवातीला पुढील टीप लिहितात:
"आपल्यास जें कांहीं नाहीं असें वाटतें, त्यातूनच महात्मे जगाच्या कल्यानाच्या चिजा बाहेर काढितात. त्या महात्म्यांची स्थिति लक्ष्यांत वागवून पुढील गाणे वाचल्यास ते दुर्बोध होऊं नये, असें वाटतें."

झपूर्झा


हर्षखेद ते मावळले,
हास्य निवालें,
अश्रू पळाले,
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांहीं दिसे दृष्टीला,
... प्रकाश गेला,
... तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितीला?
... झपूर्झा गडे झपूर्झा!


हर्षशोक हे ज्यां सगळें
... त्यां काय कळे?
... त्यां काय वळे?
हंसतील जरी ते आम्हाला,
भय धरूं हे वदण्याला:-
व्यर्थीँ
* * *

"झपूर्झा" आम्हाला शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती. त्यावेली आचार्य अत्र्यांची "नवयुग वाचनमाला" अभ्यासाला होती. झपूर्झा समाविष्ट करायला अत्र्यांसारखाच प्रचंड, अष्टपैलू व्यक्तित्वाचा संपादक हवा. नवयुग वाचनमालेच्या रुपाने त्यांच्या अप्रत्यक्ष उपस्थितीत आम्ही मराठी वाचायला-लिहायला शिकलो हे आमचे सौभाग्य.

झपूर्झा ऐकली - पाहिली की "झिम पोरी झिम" मला हमखास आठवते. एक आठवली की दुसरी आठवणारच. आता गणपती आले तरी या महानगरात "झिम्मा" कानावर पडत नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळेच बहुधा "झिम पोरी झिम" मला या उत्सवात सतत आठवते; बरोबरच "झपूर्झा".

झपूर्झाची जीवन-प्रवृत्ति आणि झिम्माची जीवनासक्ति या दोनींचे "साधन आणि साध्य" (means and goal) एकच आहेत: ते म्हणजे "आनंद" (Joy)! हा कलेचा मूलभूत पाया आहे असे मला वाटते. असे जर विद्येच्या सर्व शाखांतून आणि राजकारण, धर्मकारण, समाजकारण, उदिम-व्यापार-शिक्षण क्षेत्रांत झाले तर आजची अनागोंदी, अव्यवस्था, अराजकता आणि हिंसाचार राहील का?

महाराष्ट्र भाषासंचनालय या सरकारच्या खात्याने केशवसूतांच्या हस्तालिखितांचा संग्रह प्रसिध्द केलाय. मूळ हस्तालिखितांचे फोटो, संशोधित व विस्तृत संदर्भ आणि टीपा, आर्ट पेपरवर सुबक छपाई व पुठ्ठ्याची बांधणी यानी नटलेले हे पुस्तक केशवसूताना यथोचित श्रध्दांजली आहे.

महाराष्ट्र राज्यसराकाराचे "महाराष्ट्र भाषासंचनालय" हे एक तरी खाते काही गाजावाजा न करता स्थिरपणे व धीराने प्रसंशनीय काम करतेय हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी भाषिकाना व भाषाप्रेमीना याचे समाधान पण वाटावे.

- रेमीजीयस डिसोजा
स्थळ: मुंबई


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 17, 2009

भातशेती


भातशेती

भादरव्याची सरगंध आणतेहिरवट पिवळा

(१२--१९८५)
गो. नी. दांडेकरानी लिहिलेली गोष्ट वाचली होती. त्यात कथेच्या नायकाला एक साधू मातीचा सुगंध पकडलेल्या अत्तराची कुपी देतो. पहिल्या पावसाच्या सरीनंतर येणारा मातीचा सुगंध अनुभवलाय. भाताचा सुगंध अत्तरात पकडलेला कधी ऐकला नाही. पण अनुभवलाय मात्र खूप, भाताच्या शेतात. ज्याना हा हवा असेल त्यानी जवळपासच्या शेतात भाताला फुलोरा येतो तेव्हा जरूर जावे.

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 16, 2009

फुलावी धरतरी कष्टिली

फुलावी धरतरी कष्टिली


अंतरातल्या जळत्या ज्योतीचे
जोडावे जळणे समस्त व्यक्तिमात्राचे
निर्झर ठायीठायी पामरांच्या अश्रूंचे
त्यांचा जोडावा महानद
ताप अनशन कष्टांचे तांडव
त्याने फुलावी धरतरी कष्टिली.
* * *
गुजरात (३१.१०.१९६९)


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 14, 2009

अशी कविता: एक कोडें

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 10, 2009

धरती, जळ आणि सांगाती

धरती, जळ आणि सांगाती

लाख लोकानी जी पुस्तके वाचली
ती मी कुवतेनुसार वेळोवेळी वाचली


त्यातल्या ख़ास हजार लोकानी जी वाचली
ती म्या कधी ना वाचली ना पाहिली ना ऐकली


धरती माझी आई - जळ माझे जीवन -
लाख माझे सांगाती - त्यानी केले औक्ष पूर्ण


~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape