January 07, 2010

अन्नदाता नंदी: मुंबईत आपला परिसर- - -

पांगूळ-बैल मुंबईत फिरतात. शेतीची गावांतली कामे संपलीत. मुंबईतल्या या चौकात अल्पाहाराच्या टपरीवाल्याने त्याना प्लेटीत पोहे दिले. म्हातारबुवानी ती प्लेट मागारणीस दिली.

पन्नास लक्षांहून अधिक ग्रामीण जनता या महानगरीत स्थलांतरण करून आलेले आहेत. आणि झोपडपट्टीत (सरकारी परिभाषेत "गलिच्छ वस्ती") खपले. सरकारला फक्त आर्थिक विकास माहीत आहे; माणसांचा व माणूसकीचा विकास कसा होतो व कसा करायचा हे त्यांच्या कोशात नाही. "सरकार" हा शब्दच मुळी नपुंसक लिंगी आहे ना? त्याना षंढाच्या धर्माला जागायाला हवे ना?

इंडियाच्या अर्थकारणात बैलाचा वाटा "सिंहाचा" आहे यात शंकाच नाही. मान्यवर अर्थाशास्त्रज्ञ्य पण याला अपवाद नसावे, (कृपया माझा Cow dung, Rice and Amartya Sen (a critique) हा लेख अवश्य वाचा.) कोर्पोरेट दुनियेने सरकाराना हाताशी धरून बेघर बेरोजगार करून सोडले.

साठ वर्षात चाळीस कोटी लोकाना साधे साक्षर करता आले नाही. प्राथमिक सक्तीचे व मोफत करायचा कायदा आणायलाच शंभर वर्षांचा काळ गेला. गोपाळ कृष्ण गोखाल्यानी गेल्या शतकाच्या सुरवातीस हा कायदा प्रिव्ही कौन्सिल आणण्यासाठी जीवापाड मेहनत केली. त्याना गोरयांकडूनच काय, स्वकीयांकडूनही
विरोध झाला.

आणि आता दिल्ली सरकारातला एक महाभाग (कपिल सिबल) शंभर दिवसात नव्या शिक्षणाची दिशा ठरवणार म्हणे. शंभर वर्षें जातात, तेथे शंभर दिवसांचे काय? पब्लीकाची आठवण अल्पजीवी असते.

नंदीबैल याचा एक अर्थ असाही होतो: इशारा कराल तशी मान हलवयाची - डोके हलवायचे.
आता "रिमोट कंट्रोल"वर ईशारे केले जातात व चमचांचे व पब्लिकचे डोके हलवले जाते. विचार करायचा त्रास नाही. हे गाइडात पाहून अभ्यास करण्यासारखेच आहे.
मीपण नंदीबैलात जमा!


~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Labels: , ,

2 Comments:

At 12 January 2010 at 19:17 , Blogger साळसूद पाचोळा said...

रेमीजी..

नंदीबैल आपल्याकडे काय कमी आहेत काय,, बायकोपुढे मान हलवणारे त्यातलेच, ओफिसातही सगळेच नंदिबैल असतात.

प्रत्येक वेळी भुतकाळ विसरून नेत्यांच्या आश्वासनांना भुलनारी जनताही नदिबैलच, पक्शाचे कार्यकर्तेही नेत्यांपुढे नंदिबैल, नेते वरिष्टांपुढे नंदीबैल, एकुनच काय तर आपल्याकडे प्रत्येकजन कुणापुढे तरी नदीबैल आहेच...

आपन मात्र बऱ्याच नंदीबैलांवर निशाना साधला आहे.... मस्त.
.

साळसूद नंदिबैल.(सोरि... पाचोळा)

 
At 22 January 2010 at 14:46 , Blogger Archetypes India said...

सचिन,

गेल्या काही दशकांचे केंद्र व राज्य स्थरांचे निवडणूक - निकाल पाहिले तर लक्षात येते:
कोणत्याही राजकीय पक्षास ठोस बहुमत मिळत नाही. कारण बहुसंख्य ग्रामीण जनतेचा आता भ्रमनिरास झालेला आहे.
पण त्यातून धडा न घेता कंपूगीरी करायच्या मागे लागतात. याचेच नाव लटकणारी लोकसभा / विधानसभा (hung parliament etc.). अशा अफवा पण ऐकू येतात बहुमत होण्यासाठी मते पण विकत घेतली जातात, किंवा आमिषे दाखवली जातात.

एकंदरीत पाहता बहुसंख्य (८० %) लोक बैलांची प्राणी ऊर्जा वापरत असेल तरी ते बैलोबा, किंवा नंदी बैल नाहीत!

--- रेमी

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home