March 28, 2010

ल सा वि-४: श्रम - मानसिक अडसर दूर करणे






मुख्य शब्द: "श्रम - विश्राम - स्वास्थ्य - अध्ययन - प्रजनन"


(मानसिक अडसर (mental block) अनेक प्रकारचे असू शकतात: राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रिवाज, परंपरा . उदाहरणार्थ, "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" ही जीवनाची चार उद्दिष्टे मानली जातात; ही कोण आणि किती व्यक्ति आचरणात आणतात हा प्रश्न वेगळा. परंतु उपासपोटी अशी प्रवचने कोण ऐकणार? या उलट वर उल्लेखलेली पांच निसार्गादत्त कार्ये अगदीच प्राथमिक अन अनिवार्य आहेत.)


श्रम हे निसर्गादत्त -- "श्रम - विश्राम - स्वास्थ्य - अध्ययन - प्रजनन" -- कार्यांपैकी एक जे सर्व जीवाना अपरिहार्य आहे, मग कोणी राजा असो की रंक. श्रम शारीरिक नि मानसिक दोनही. श्रम अर्थातच उर्जेचा वापर करतात: शारीरिक, मानसिक आणि निसर्गातून घेतलेली वेगवेगळ्या प्रकारच्या उर्जा (उदा. जेवण तयार करण्यासाठी वापरलेले इंधन - लाकूडफाटा, गोवरी, वीज, गैस .)

श्रम कशासाठी?
निसर्गाने श्रमाचे नियोजन मनुष्य-प्राण्यासह सर्व जीवांसाठी स्वत:ची उपजीविका करण्यासाठी, गरजा भागवण्यासाठी केलेले आहे. जीवाला जन्माला घातले तर त्याच्या चरितार्थाची व्यवस्था पण करायला नको का? ते काही इंडियन सरकारचे नियोजन नव्हे; कायदे करायचे पण अंमलबजावणी नाही.

अर्थातच "श्रम" हे कार्य इतर "विश्राम, स्वास्थ्य, अध्ययन आणि प्रजनन" यापासून वेगळे काढता येत नाही. सर्वांचा एकमेकाशी अन्योन्य संबंध आहे. त्यांच्यांत वर्गवारी नाही की अधिश्रेणी - उच्च-नीच नाहीत.

गरजा फक्त तीनच
अन्न, निवारा आणि वस्त्र या मानवाच्या फक्त तीनच गरजा आहेत. याव्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टीना गरजा समजले जाते ती केवळ माणसाची "हवस" असते. हवस अल्पकालीन, टाकाऊ, आणि बदलत असतात. त्याबरोबरच निसर्गाने समस्त जीवामात्राच्या जीविकेसाठी पुरेशी साधन संपदा पण निर्माण केलेली आहे; मनावासाठी पण. यास्तव माणसाच्या अन्न-वस्त्र-निवारा, पर्यायाने समस्त जीवामात्राच्या, या गरजामध्ये कुणीही व्यक्ति संस्था याना हस्तक्षेप करण्याची सत्ता नाही की अधिकार नाही.

मनुष्येतर जातींसाठी पण निसर्गाने अद्वितीय, बहुविध आणि अगणित आलेखने प्रदान केलेली आहेत. कोणाला लोकर, कोणाला कठिन कवच; कोणी माती खाते (गांडूळ), कोणी मध, कुणी शाकभक्षी, कुणी मांसभक्षी... कुणी रक्तावर जगतात (बांडगुळे).

सर्व जीवामात्राच्या अंतर्बाह्य देण्याघेण्याच्या व्यवहारातून पर्यावरण, पारिस्थितिकी उर्जा यांच्या संतुलानाचे व्यवस्थापन निसर्गाने केलेले आहे.

अन्न - माणसाच्या तीन गरजांपैकी एक:
अन्न या गरजेसथी ढोबळ मानाने पुढील कृती येतात:
धान्ये, फले, भाज्या ही निसर्गातूं घेणे अथवा यांची उपज करणे, रांधणे, जेवणे (हा पण एक श्रमच), भांडी स्वच्छ करणे. श्रमाच्या या सर्व क्षेत्रात शरीर मन सारखेच सहभागी असतात (नसतील तर असावे).


कल्पना करुया: शस्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे, मानवाने सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी जंगली तृण धान्ये, भाज्या, फळझाडे यांचे गृह-संवर्धन (domestication) केले. त्यावेळी शळा - विद्यालये - विश्वविद्यालये नव्हती. त्यावेळी नागारासमाज नव्हते. श्रमाची विभागणी नव्हती: राजे - महंत - लैंगिक कर्मचारी (sex-workers), अवतार - प्रेषित नव्हते. (नागर समाजांचा इतिहास सुमारे पांच हजार वर्षांचा असावा असे म्हणतात.) आशा परिस्थितीत आदिम मानवाला हे सारे कसे शक्य झाले? आजच्या तथाकथित विकासाचा आणि प्रगतीचा उगाच बाऊ करण्याचे कारण नाही.


श्रमाच्या कार्यात प्रज्ञा (intelligence - बुद्धी आणि संवेदना) क्रियाशील असते. निश्चितच बोधना (intuition) जागरूक असते आणि संवेदनांच्या साह्याने विकसित होते. श्रम करताना येणारे यश - अपयश - अडचणी इत्यादिमुळे अध्यायानाचे कार्य (अभ्यास आणि अध्यायानाचे अध्यन) सिद्ध होते.


आपल्या संवेदना भावना उद्दीपित करतात. भावना पण उर्जेचा एक प्रकारच. त्यांचे विधायक सृजनशील निर्मितीत परिवर्तन केले तर आनंददायी होते - हा विश्रामाचा एक प्रकार. पण त्या भावनांचे विघातक सर्जनशीलतेत परिवर्तन केले तर होतो उर्जेचा अपव्यय, विनाश.
श्रमाने शरिर मन अधिकाधिक सुदृढ़ होतात, बोधना विकसित अधिक कार्यक्षम होते. आणि हे सर्व एकत्रित "स्वास्थ्य" साध्य करतात.


माणसाने श्रम सोपे करण्यासाठी अवजारांचे शोध लावले; आणि उत्पादन वाढवण्यासाठी यंत्रांचे शोध लावले. गरजेपेक्षा अधिक उत्पादन करण्याची कोणाला अणि कशी हाव लागली वेगळा प्रश्न. आजही अशा जमाती आहेत जे गरजेपेक्षा जास्त उत्पादन करीत नाहीत. गरजेपेक्षा जास्त उत्पादन करणे याला "हवस" (wants) म्हणतात. आणि केवळ "सत्ता" 'सत्तेसाठी हापापलेले" याना "हवस" असते.


इंडियातील कोट्यावधी खेडूत आदीवासी परिश्रम करतात. पण त्यांचे श्रम शून्यमनस्क, निर्बुद्ध नसतात, केवळ शारीरिक नसतात, तर प्रज्ञावंत (intelligent) असतात. अगदी उच्चभ्रू पांढरपेशा वर्ग समजतो त्याच्या उलट. ती कारागिरी असते.


या उलट आधुनिक (यंत्र) युगात उत्पादनाची क्रिया, जेथे केवळ शरिर कामास लावले जाते, जेथे कामात यांत्रिकीपणा येतो, जेथे दिवस भरण्यासाठी काम केले जाते, जेथे "चिंतानाचा" अभाव असते, ते असते केवळ "रोजगार" लक्ष्य असते. आणि मन सततचे कंटाळलेले, २४ x मनोरंजनासाठी, सतत उत्तेजनासाठी वखवखलेले. परिणामत: शरीर आणि मन दोनही आजारी: स्वास्थ्य हरवते. असे हे यांत्रिकी व्यक्तिमत्व सामूहिक जाणिवेने (collective consciousness) ईतर स्तरात / वर्गात पण उतरते. परिणामत: सामाजिक स्वास्थ्य पण हरवते,

इलेक्ट्रोनिकी तंत्रयुग
पांच / दहा / शंभर / शेकडो... माणसांच्या जागी आता एक माणूस यंत्राच्या साह्याने काम करतो. इतर व्यक्तींच्या श्रमाच्या स्वायत्तेवरच त्यामुले आक्रमण होते, त्याला विस्थापित केले जाते. त्याने पारिस्थितिकी संतुलन मात्र नष्ट होते.


उदाहरणार्थ, शहर हा आवासाचा (Habitat) एक प्रकार आहे. नागर संस्कृतीच्या उदयाबरोबर नगरे निर्माण झाली. अर्थातच शहर हे सत्तेच्या केंद्रीकरणाचे प्रतीक आहे. म्हणून शहर व्यक्तीच्या "निवारा" या गरजेची स्वायत्तता नाकारते, तसेच "अन्न" आणि "वस्त्र" पण. या तीनही गरजा आणि त्यांचे नियोजन आता संस्थांच्या ताब्यात गेलेले आहे.
यातून एक निष्कर्ष निघतो: जशी जशी श्रमाची विभागणी त्यांचे स्तर वाढत जातात तसे तसे सत्तेचे केंद्रीकरण वाढत जाते.याचा अर्थ असा, व्यक्ति आणि व्यक्ति-समूहांची स्वायत्तता पण कमी होत जाते.


एवढेच नव्हे तर मनुष्यप्राणी इतर सर्व प्रजातींच्या "श्रम - विश्राम - स्वास्थ्य - अध्ययन - प्रजनन" याना यंत्रयुग बाधा आणते. तर आधी त्यांच्या अस्तित्वाचाच विनाश करते. मग कुणी जाणकार वेगवेगळ्या "संधारण" (conservation) मोहिमा सुरु करतात. हा अर्थातच दुटप्पी व्यवहार झाला.

"सत्ता" आणि "सताधिशांच्या" पुढे नमते घेऊन नि त्यांच्या हो ला हो देऊन सर्वच नागर समाजांचे नागरिक एन्ट्रपीच्या दिशेने जात आहेत. मूक-बधीर प्राणी वनस्पतीना पण हे अमानुष कर्म दिसते आणि समजते. पण आम्हास जर त्यांची भाषा समजेल तर ना?

साकल्याने (holistically) पाहिल्यावाचून - विचार केल्यावाचून इंडियाचा खेडूत नि वनवासी आदीवासी समाज कोणत्या प्रकारच्या विनाशाला तोंड देत आहेत याचे आकलन होणे वा कल्पना करणे पण शक्य नाही. यालाच आपण "लोकशाही" "विकास" म्हणतो का?

समतोल
केवळ शारीरिक श्रम आणि मानसिक श्रम यांचा समतोल राखणे महत्वाचे आहे. एवढेच नव्हे तर सर्वच निसर्गादत्त कार्यांतही ते महत्वाचे आहे. नाहीतर पतन निश्चित आहे. औषध-पाण्याची, कोर्ट-कचेरयांची बिलेँ भरा. नवनवीन कायदे करा. तीस कोटी लोकाना "दारिद्रय रेषेखाली" सोडा. चालीस कोटी लोकाना निरक्षर राहू द्या!

टीप:
() "निवारा" यावर अधिक वाचा:“Housing: Shelter as Basic Need”, "आर्किटेक्चर आणि नियोजन" या विषयावर "Architecture and Biodiversity in India" हे माझे प्रसिध्द झालेले लेख.

---------------------------------------------
Note:
(1) more on "shelter" see and on "architecture and planning" see (my published papers).
(2) Illustration above: "Eight Hours" by Artist: Ricardo Levins Morales | quoted by Anders Hayden , "Sharing the Work, Sparing the Planet: Work Time Reduction, Consumption and the Environment" (Paperback)
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape