April 27, 2010

एक दरवेशकी अनोखी दुनिया

निःसंग मैँ वनवासी दरवेस

भटकता रहा दरदर देस परदेस|

मिले दरसन भव तीरथ जनसागर

चरणोमे उनके लीन मैं निर्भर|

~~~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 24, 2010

मुक्काम मुंबई - पोस्ट इंडिया : मुंबईत आपला परिसर

आजचा  २४- ४- २०१० दिवस "राष्ट्रीय पंचायती राज दिन"  म्हणून साजरा करा असे केंद्र सरकारने जाहिर केलेय.  

मुक्काम मुंबई, पोस्ट इंडिया 
 आज इथे, उद्या माहीत नाही  
यही मुंबै मेरी जान 
आय लव माय इंडिया  
वगैरे वगैरे 

साठ वर्षे : रोज विस्थापितांचे लोंढे सर्व प्रदेशांतून शहरा शहरांत महानगरांत येतात, बकाल जीवन जगतात. 

साठ वर्षे कोणत्याही सरकारने - राज्य वा केंद्रात -   कोणत्याही झेंड्याच्या - रंगाच्या - पंथाच्या - नेत्यांच्या  कोणत्याही पक्षाने, या समस्येवर तोडगा काढलेला नाही.
त्यांच्या घोषणा थांबत नाहित. कोणतेही विधायक काम सुरू झाले तर तडीस जात नाही. असे आहेत हे आजच्या आधुनिक "महाभारताच्या" यादवी युध्दाचे लेखक.

पांडित्यपूर्ण प्रबंध लिहून ही समस्या कधीच सुटणार नाही. प्रकासशाकांचे मात्र खिसे भरतील, व लेखकाना सन्मानाचे किताब / बक्षिसे मिळतील.    

अब्जावधी रुपये खर्च करून कितीही सिनेमे - धारावाहीक मालिका काढल्या तरी या प्रश्नाला टेंगूळ पण येणार नाही. वितरकांचे खिसे मात्र भरतील, व कलावंत वार्षिक बक्षिस समारंभात संगीत खुर्चीचा खेळ खेळतील.       

IPL चा सद्या चाललेला घपला तर विचारूच नका! अकरा क्रिकेटपटू अकरा मिलियन (११० कोटी) लोकांचे हीरो झालेत. आणि सर्व अवतारी महापुरुष देवघराच्या बंदीवासात  राहिले!      

कोणत्या पंचायती राज्याच्या या घोषणा? देशात सुमारे सहा लक्ष खेडी आहेत. त्यांची वार्षिक आवक किती असेल? बोलीवूड, दूरचित्रवाणी, क्रिकेट राहू दे हो बाजूला. केवळ  केंद्र वा राज्य सरकारे - शासन, प्रशासन व न्याय संस्था - चालवायला वार्षिक खर्च काय? सरकारी खर्च खर्व-निखर्वानी भरेल. या सहा लक्ष गावांवर (सुमारे सत्तर कोटी व्यक्ति) केलेल्या खर्चाच्या लक्षावधी / अब्जावधी पटीने असेल!   

आहे! उत्तर आहे!! सर्व मानवनिर्मित प्रश्नाना उत्तरे आहेत!!! 
एकच उत्तर: सर्व गावाना स्वायत्तता द्यायची, म्हणजेच 
सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे. 
पण हे उच्चभ्रू वर्गाला पचन होणार नाही. हे पण आम्हास माहीत आहे. फक्त कायदे करायचे, कागदोपत्री लिहायचे; आणि म्हणायचे हे सर्व आम्ही अंमलात आणलेले आहे. थोडक्यात जनसामान्यांच्या तोंडाला पाने पुसायची. 

|| जय हो ||

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 23, 2010

मनोगत: धर्म नसतो प्रार्थनेत, मंत्रांत, पोथ्यापुस्तकांत; तो असतो आचरणात रोजच्या, प्रत्येकाच्या व सर्वांच्याच. प्रार्थना जेव्हा काम होते तेव्हा व्यापार येतो व धर्म चुपचाप बाजूला सरतो. पण काम जेव्हा प्रार्थना होते तेव्हा धर्माचा महिमा दाही दिशा होतो; धर्माला मग गरज नसते प्रचाराची, ना राजाश्रयाची, ना धर्मांतराची, ना भव्य स्माराकांची...


~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 21, 2010

दिवास्वप्ने

रात्री स्वप्ने सोबत करतात
विस्मृतितील दिवास्वप्नाना
वेदेविद्रे आकार देत.




रेमीजीयस डिसोजा
(१९६९)
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 19, 2010

मनोगत - संतकवी तुकाराम, कबीर इ. यांचे अभंग, पदे, साक्या... कोणत्या दालनात बसवायचे, काव्य की समीक्षा, असा प्रश्न मला कधी कधी पडतो?


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 02, 2010

अन्नपूर्णा चुलीजवळ

 अन्नपूर्णा  चुलीजवळ


माझ्या चुलीजवळ भेटतसे मी
आप्तांस आत्ता नि पुनरपी निशीदिनी;
अन एक नि:शब्द संवाद घडतो
समर्पणांत नि बलीदानात;
ते नेती मजसी दूर निवासीँ
जेथ असती नवखे मानुष - मानुषी,
नि अविरत परिश्रम प्रेमाचे निरामय
मातीत, पाण्यात, ऊन-हिंव-पावसात.

माझ्या लहानग्या सैपाकघरी बरोबर
समर्पितो आम्हास आम्ही यज्ञवेदीवर
जगण्यात - वाढण्यात - मरण्यात
बरोबरीने अनुरागे त्यागात.
इथे विस्तारते एक वैश्विक गीत
जे घेऊन जाई मज नवख्या मुलुकात.
*    *    *

(मूळ इंग्रजी "At my little kitchen" या कवितेचे भाषांतर)




हल्लीच जागतिक महिला दिन "प्रथम जगत" देशांत संपन्न झाला. त्याचे दुनियेतील तृतिय व चतुर्थ जगात काय प्रयोजन आहे ते माझ्या अल्पमतीस समजले नाही.
आपल्या देशात पण तो साजरा झाला, तसेच केंद्र सरकारने शासनात (म्हणजे लोकसभा, विधानसभा इ.) महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाचा ठराव आणला.
इथपर्यंत महिलांची वर्णी लागली. यापुढे ते कसे राबवले जाईल हे बघायचे.
सरकार म्हणजे शासन (legislation), प्रशासन (administration), व न्यायसंस्था (judiciary), या सरकारच्या तीन शाखांत या बिलाची व्याप्ती काय असेल व ती कोण ठरवणार हाही एक मूक प्रश्न राहतो. हाताच्या काकणाला आरसा कशाला? 



~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape