December 10, 2010

पाचोळा - २

पाचोळा २

प्रत्येकासाठी कुणीतरी साद घालत असावं 
जन्माला आल्यापासूनच 
कुणी ऐके 
कुणी काणाडोळा करतं 
आणि आयुष्यभर वणवण करीत जातं 
भिरभिरत  जातं
कानोसा घ्यावा आणि चुकावं 
असही होत असावं. 
वावटळीतला पाचोळा कुठतरी स्थिर व्हावा 
आणि जीवनचक्र पुन्हा परत सुरू व्हावं 
भिजणं सडणं कुजणं आणि अन्नब्रम्हाच्या कारणी लागावं 
वैराणातून मार्ग काढीत 
-- जंगल - वैराण - महापूर - महानगर -- 
आणि सर्व जीवनेच्छा पणाला लागावी  
विरघळत जाणारा मी आणि माझे मीपण  

*****

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. 'जीर्ण पाचोळा पडे तो उदास' या कवितेची आठवण आली तुमची कविता वाचताना.

    ReplyDelete
  2. आभारी! तुम्ही उल्लेख केलेली कविता मी वाचलेली नाही. पाचोळा म्हणजे अखेर, साहजिकच तो उदसीन असावा. पण येथे मात्र त्याची जीवनोर्मी प्रबळ आहे. अन त्याला जीवाचे उद्दिष्ट पण गवसलेय असे मला वाटते.

    ReplyDelete