December 31, 2010

निर्माल्य (Nirmalya)

निर्माल्य (Nirmalya): 
याला इंग्रजी शब्द मला माहित नाही. 
 ॥ निर्माल्य ॥
येणार्‌या फुलांची असती नावे अनेक ।
जाणार्‌या फुलांचे नाव एकच निर्माल्य ॥ 


  निर्माल्य : ज्याना आमच्या मुंबैत दर्या दूर पडतो ते शेजारच्या रस्त्यावर असलेल्या पिंपळावरच निर्माल्य सोडतात, बुंध्यावर खिळा ठोकून त्यावर. कोणी जवळपासच्या चुकल्यामाकल्या तळ्यावर जातात; ते तळे कधीकधी पाण्याऐवजी निर्माल्यानेच भरलेले असते! त्यांचा उपसा कधीच होत नाही. आमच्या मुंबईत तळी राहिलीत कुठे? ब्रिटिशांनी कधीच तळी बुजवली, खाड्या बुजवल्या. दर्या बुजवला. (आम्ही ऐकले की त्याना पाण्याची एलर्जी आहे. म्हणून ते पाण्याऐवजी कागद वापरतात.) ज्या आहेत त्यांच्या गटारगंगा झाल्या. 

मुंबईच्या पावसाळ्यात रस्त्यांवर नद्या वाहतात. तर कोरड्या दिवसात रस्त्याखालच्या गटारांना भरती येते. मग पावसाळा माथ्यावर आला की म्युन्सिपालटी गटारांचा उपसा सुरू करते. आतातर विस्थापितांच्या आयुष्याचे - जीवनाचे - झालेले निर्माल्य रस्तोरस्ती पाहायला  मिळते. फुलांचे निर्माल्य! पाण्याचे निर्माल्य! जित्याजागत्या माणसांच्या आयुष्यांचे निर्माल्य! जमीन - जळ - जीवन कसणार्‌यांचे, त्यात स्त्रियापण आहेत, निर्माल्य. बाल्य होते अकाली निर्माल्य. बाजारू आकडेमोडीत फसलेल्या आयुष्यात जीवन झाले निर्माल्य!    
रेमीजीयस डिसोजा  
ख्रिस्त जयंती २०१०
मुंबई

 ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

Labels: , ,

2 Comments:

At 31 December 2010 at 12:15 , Blogger aativas said...

ब्रिटीशांनी काही चुकीच्या सवयी आम्हाला लावल्या हे खरे .. पण स्वातन्त्र्यानंतर इतक्या वर्षांत आम्ही तरी काय केले? विकासाची परिभाषा, विकासाचा उद्देश, विकासाचे स्वप्न आणि मग त्या अनुषंगाने आमची वाटचाल .. .या सगळयाकडे आता नव्या दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे .. खर तर ती कधीपासूनच आहे!

जाता जाता - निर्माल्य शब्दाचा नेमका अर्थ काय? त्याची व्युत्पत्ती कुठे सापडेल?

 
At 3 January 2011 at 11:08 , Blogger Archetypes India said...

निर्माल्य (संस्कृत) : देवाला वाहिलेली फुले, निस्तेज व्यक्ती किंवा वस्तू. (संदर्भ: मराठी शब्दरत्नाकर, विस्तारित आवृत्ती) शब्दरत्नाकर मला उपयुक्त वाटतो. प्राथमिक शाळेत असल्यापासून तो संग्रही असावा असे नेहमीच वाटत आले.
मी काही भाषातज्ञ नाही, फक्त अभ्यासू आहे. त्यामुळे माझ्या लेखनात अनेक त्रूटी राहून जातात : शुद्धलेखनात चुका, विधाने किंवा विचार चुकीचे इत्यादी. खरं म्हणजे मी आर्किटेक्चर सोडून कोणत्याच विषयाचा तज्ञ नाही. आणि आर्किटेक्चर सोडून वर्षें गेली.
आपल्याकडे वस्तुनिष्ठ टिप्पणी जरा कमीच असते! तुमचा प्रतिसाद वाचून बरे वाटले. आभारी!

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home