April 04, 2011

गुढीपाडव्याच्या सर्वां हार्दिक शुभेच्छा

वासंतिक नव्या वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.
मुंबईत गुढी पाडवा
गुढीपाडव्याच्या सर्वां हार्दिक शुभेच्छा!
केवळ कॅलेंडरच नाही, आपल्या देशातील चालीरीती, पूजा, विधि, परंपरा, सण, सोहळे, जत्रा, बारशापासून अंतयात्रेपर्यंत होणारे अनेक विधी हे सृष्टीमातेशी कुठे ना कुठे निगडीत असतात, जशी वटपूजा.
अनेक विधी आता जरी कधीकधी यांत्रिक पणे होत असले तरी सृष्टी आपल्या मनात, मातीत पडलेल्या बीजाप्रमाणे सुप्तावस्थेत असते.
केव्हा ना केव्हा ती रुजेल, फुलेल अशी आशा करायला पुष्कळ जागा आहे.
रेमीजीयस डिसोजा

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

1 comment:

  1. गुढीपाडव्याला मुंबईहून कित्येक लोक कोकणात गावी गेले. तीन दिवस जोडून सुट्टी. गुढी उतरली व मागे वळले. पाडवा जनतेचा सण. नागरिकांस - शहरी लोकांस ग्रेगरी शकाची संवय झालेली. जनता मात्र अजूनही शालिवाहन शकाप्रमाणे चालते. अमावास्येला कामाला सुट्टी. आणिक वर्षभर सणासुदीला सुट्ट्या आहेतच. या सुट्ट्या पण शेतीवाडीच्या हंगामानुसार असतात. त्यांना आठवड्याच्या - शनिवार-रविवार - सुट्ट्या घेऊन चालणार नाही.

    ReplyDelete