April 01, 2011

मातीचा माणूस - मातीचा सुगंध : Son of the Soil

मातीचा माणूस - मातीचा सुगंध

मातीचा गोळा     माणूस त्यातून केला
नांव त्याचे ठेवले     मातीचा पूत

पावसांत त्याला     भिजत ठेवला कुजत ठेवला
ठोकून थोपटून घडवला     उनांत त्याला करपला

मातीचा गोळा     केला त्याचा एकाच प्याला
साठवली     पहिल्या धारेची त्यात नशा
    मध्य रात्रीच्या     नि:शब्द सान्निध्यात.

मातीचा गोळा     त्याची केली     पणती
वात त्यात पेटवली     मध्य रात्रीच्या
    नि:शब्द सान्निध्यात.

मातीचा माणूस     विसाव्या शतकाच्या अखेरीला
चावूनझ चालायमा राजकारणी     लोकांची पंथास लागलेला.

माणसाची माती    उंबरठ्यावर     एकविसाव्या शतकाच्या.

मातीचा सुगंध.   

* * *
मुंबई | ६.३.१९८९
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. शतक बदलत म्हणून आपण, आपला दृष्टिकोन बदलतो? की आपण बदलतो म्हणून सभोवतालचा अर्थ आपण वेगळा लावतो?

    ReplyDelete
  2. सावितादी,
    विसावे शतक इथे प्रतिक व एक वास्तविकता म्हणून वापरले आहे. आमचे दृष्टीकोन बदलतात. शब्दांचे अर्थ बदलतात. अंतर्बाह्य सृष्टी आहे तशीच आहे. आणि आम्ही पदोपदी सृष्टीमातेपासून दुरावावत चाललो आहोत, केवळ आमच्या अतोनात अहंकारामुळे. याचा अर्थ असा कि मी तुमच्या प्रश्नात असलेल्या, लपलेल्या उत्तराशी सहमत आहे. या रचनेत वेगळे काही लिहिलेले नाही.आणि यातला उपरोध पण लपलेला नाही.

    ReplyDelete