October 01, 2012

सृष्टीत आम्ही सातत्याने

 सृष्टी स्तवनभारताला संपन्न जैवविविधतेची देणगी सृष्टीकडून मिळाली आहे. त्यातूनही भारतीयांनी नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे संबोधले. नारळाला 'श्रीफळ' म्हटले. सृष्टी सर्व जीव मात्राला जगण्याचे साधन देते, आणि मानवाला संस्कृती देते. संगीत, काव्य, नाट्य, साहित्य, चित्र, वास्तू, महाकाव्ये ही केवळ संस्कृतीची अभिव्यक्ती आहेत. संस्कृती केवळ मानवात वसते.

सृष्टीत आम्ही सातत्याने


सृष्टी मानवप्राण्याला तिची लाडकी जीवजाती म्हणून ओळखत नाही, की नाही नागरी समाजाच्या कुंपणाना व त्यांच्या सामाजिक अधिश्रेणींना.वानसे सुसंस्कृत समाजाची कुंपणे व अधिश्रेणी ओळखत नाहीत 
नागरी समाजांना कुंपणे - भिंती बांधायचे, वर्गवारी करायचे फारच वेड आहे. ते एवढ्यावरच थांबत नाही. त्या भिंतीवर नक्षीकाम करायचे, त्याच्यावर अलंकार चढवायचे, त्यांची स्मारके घडवायची, आणि टाळ्या वाजवायच्या हे पण पर्यायाने आलेच. उदाहरण: चीनची भिंत: ते तर सरंजामदारशाहीचे प्रतिक आहे.

तसेच वानसे आणि अन्य प्राणीजातीपण त्यांची सामाजिक बंधने व अधिश्रेणी ओळखत नाहीत.
पाळीव पशुपक्षीपण सायंकाळी निवार्‌याला घरी परतून येतात. त्यांना तेवढ्यापुरतीच कुंपणाची म्हणजेच मालकीची ओळख असते. सामाजिक अधिश्रेणी सोपान ते ओळखत नाहीत.
लहानपणी आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न आपणास सुरू केले की जीवाणूंच्या झुंडी आपल्या उदरात कायम घर करून राहायला सुरवात करतात. त्यांच्या अनेक जातींची संकुले उदरात असतात!

आशा करूया, 'हिरवाई' बगिचे, झाडी, शेते, उरली सुरली जंगले, आणि नद्या-सरोवर-सागर यांच्यापल्याड; वर्डस्वर्थ याच्या कविता, टर्नरची चित्रे, यांच्यापल्याड; आणि फोटो सिनेमा विडयो - ही कितिही अद्यावत असली तरी - त्यापल्याड जावून आपण कधीतरी सृष्टीचा अनुभव घेऊ ! कारण ही सर्व माध्यमे मनोरंजक व दृष्टीसुख देणारी असली तरी ते सृष्टीला पर्याय नव्हेत.

वरील दाखले आपणांस निसर्गाच्या मनोहर / भयावह अनुभवांची आठवण करायला मदत करतील.
जीवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र, त्यांनी केलेली प्रगती आम्हाला निसर्गाची अधिकाधिक माहिती देते, शिवाय निसर्गातील आपले स्थान काय हेपण समजायला मदत करतात.
कदाचित चक्रीवादळे, मेघस्फोट, ज्वालामुखी, धरणीकंप, हिमवादळे, सुनामी... इत्यादि आणि आता वायुमान बदल (ही काही कल्पित कथा नव्हे) या रौद्रभयानक रूपांत निसर्गाचे सामर्थ्य आपणास दिसते. 

सृष्टीचे प्राथमिक निरिक्षण 


सृष्टीशी मौलिक संबंध प्राथमिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रस्थापित करणे हे सर्वात उत्तम. स्वतःच्या शरीर व मनाचे निरिक्षण करणे; त्यासाठी नाही मुहूर्त, नाही मंत्र-तंत्र विधी, ना शुभाशुभ स्थानाचे, विषेश बैठकीचे अथवा वेशभूषेचे नियम. केवळ निरिक्षण, लक्षपूर्वक व करुणापूर्वक. कारण शरीर आणि मन आम्हाला या जगात टिकून राहाण्याची मिळालेली साधने आहेत व आम्ही त्यांचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे. यात कोणतेही गूढ नाही; जशी बाहेरची हिरवाई तसेच आम्हीही सष्टीचेच केवळ भाग आहोत.

सृष्टीच्या निरिक्षणाचे दुसरे साधन  


उष्ण कटिबंधात वानसे  कोठेही उगवतात


आम्ही भारतीय पंच महाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि पैस परंपरेने मानतो.
स्वतःनंतर सष्टीच्या निरिक्षणाचा दुसरा उत्तम पर्याय असा : वानसांबरोबर संबंध जोडणे व त्यांचे निरिक्षण करणे. त्याहूनही चांगले प्रत्यक्ष कृती: सैपाकघरातून काही बीजे घेऊन मातीत पेरणे. त्यासाठी टीनाची प्लस्टीकची अथवा मातीची लहान कुंडी चालेल. मातीची कुंडी बरी कारण माती श्वासोश्वास करते. अशी पेरणी प्रत्येक ऋतूत केलेली बरी. आणि रुजलेल्या रोपांच्या वाढीस सूर्यप्रकाश व पाणी देऊन मदत करणे. मार्गदर्शक पुस्तके शक्यतो टाळावी. काही चूका झाल्या तरी हरकत नाही.
प्रत्येक बीज रुजेलच असं नाही. त्यांना येणारे कोंब पहावे, सूर्यप्रकाश व पाणी घालावे. हे सर्व करीत असताना रोपांबरोबर आपणही पंच महाभूतांच्या संपर्कात येतो, पर्यायाने सृष्टीच्या संपर्कात जाणीवपूर्वक येतो.

निसर्गाच्या प्रयोगशाळेत कृषीक्रांती

दहा हजार वर्षांपूर्वी अर्धनग्न मानवांनी रानटी वानसे आणि पशूपक्षांचे गृहसंवर्धन केले. आणि बिकट नैसर्गिक वातावरणात कृषीक्रांतीची सुरवात झाली. आणि ती सर्व जगभर पसरली (विना बौद्धिक मालकी हक्क).
त्या काळी नागरी संस्कृती किंवा सुसंस्कृत समाज किंवा civilization अस्तित्वात आले नव्हते. कृषिक्रांतीनंतर पाच हजार वर्षांनी सुसंस्कृत समाज Civilization म्हणजेच Urban Revolution, 'नागरी क्राती'चा उदय झाला.
औद्येगिक क्रांती Industrial Civilization काही शतकांपूर्वीच विलायतेत उदयास आणि पाहता पाहता सर्व जगभर पसरली. पण ती कधीच 'वैश्विक' universal झाली नाही. आपण उच्चभ्रू वर्ग मात्र येथे पोहोचलो. आपले अध्ययन सांघिक शिक्षण पद्धतिच्या जुळवणी पंक्तीवर Assembly Line झाले.
अजूनही वेळ नाही का आली सृष्टीशी संयोग करायची?

टीप : वरील मजकूर लिहित असताना एका इंग्रजी ब्लॉग वरील लेख Humans and Nature: Can the Gulf Be Bridged?  वाचनात आला. याचा मथळा वाचताच विलायती समाज आणि त्यांचे अनुकरण करणारे इतर समाज निसर्गापासून कसे दुरावलेले आहेत हे.ध्यानात येते. या लेखावरील माझी टिप्पणी प्रतिक्रिया अवश्य वाचावी.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Labels: , , ,

4 Comments:

At 1 October 2012 at 22:24 , Blogger aativas said...

जोवर सुरक्षित राखतंय, तोवर कुंपणाला प्रतिबंध नसावा. पण सुरक्षिततेच्या नावाखाली कुंपण फक्त भिंती निर्माण करायला लागतं तेव्हा आजची स्थिती पुन्हपुन्हा निर्माण होत राहते हे एक भीषण वास्तव आहेच!

 
At 2 October 2012 at 13:33 , Blogger Archetypes India said...

सावितादी, अतिशय मोजक्या शब्दांत आपण वस्तुस्थिती सांगितली.

 
At 3 October 2012 at 11:30 , Blogger Archetypes India said...

आदिवासींच्या घरांचे पुनर्वसन करायचा प्रकल्प होता. त्यासाठी CAPART या दिल्लीच्या सरकारी संस्थेचे अनुदान मिळाले होते. त्यांनी प्रश्न विचारला, प्रत्येक घराच्या प्लॉटचे क्षेत्र आराखड्यात दाखवलेले नाही. मी उत्तर दिले, 'आदिवासी संस्कृतींत "जमिनीची मालकी" अमान्य आहे.' गंमत अशी की ज्या सेवाभावी संस्थेसाठी मी काम करीत होतो त्यानाही हे माहित नसावे. घराशेजारी केलेल्या शेतीवाडीची जनावरांपासून राखण करायला फक्त ते कुंपण करतात. Tribal house and habitat या लेखात मी उल्लेख केलेला आहे. ईशान्येच्या राज्यांतपण ही प्रथा आहे.

 
At 5 October 2012 at 11:22 , Blogger Archetypes India said...

कुंपण - हद्द - सरहद्द : जात, धर्म, वर्ण, वर्ग, भाषा, देश प्रदेश, ज्ञानशाखा, खातेवाटप, प्रोटोकॉल, उच्च-नीच, वहीवाट... किती किती कुंपणे! मानवेतर प्राण्यातही हद्दी असतात पण त्या जगण्याच्या गरजेसाठी, हवसेसाठी wants नव्हे.
पाच माणसांच्या कुटुंबात प्रत्येकाच्या सभोवती व्यक्तिमत्वाची (individuality) भिंत उभी असते, विशेषत: सुसंस्कृत नागरी समाजात.
मला आजच्या मुंबईत कितिक सुशिक्षितांनी विचारलेय, 'डिसोजा! तुम्ही मराठी कसं बोलता ?' गुजरातेत तर प्रथम "जात" विचारली जायची. मी चक्क उत्तर देत असे, 'मी "धेड" आहे.' फार तर पाण्याचा पेला बदलणार!
हे सर्व कोणत्याही विषयावर साकल्याने विचार करण्याच्या आड येते.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home