November 16, 2008

आगीतल्या सोन्यासारखी ऊन मऊ

वेश्येला वर्मा नसते मानभावीपणाचे कधी
गरतीच्या नजरेंत पण वेश्यावृत्ती डोकावते कधी


आईच्या दारी पाहिली तिला अफाट गर्दीत
आगीतल्या सोन्यासारखी ऊन मऊ एकाकी


दग्ध उत्तान विभ्रमाना तिच्या होती कडा आशेची
मिळेल इथे आसरा मायेचा क्षणभर


चक्रातून छचोर विक्षेपांच्या तिला वाट मिळेल
अर्धनग्न स्तनांत गुदमणारया अश्रूना क्षणभर


माणुसकीच्या वेशीवर - संस्कृतींचा वेदींवर
लाजेच्या फ़टकूराची होळी केल्यावर


आईच्या दारी पाहिली तिला गर्दीत अनावर
आगीतल्या सोन्यासारखी ऊन मऊ एकाकी
* * *
बडोदे
५ में १९७१
~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape