October 30, 2009

मुक्ताफळें -१२
"निवारा जेथे घर वसे; घर जेथे हृदय वसे."

तुझ्या पैशाने तू निवास विकत घेऊ शकतोस, पण पैसे घर-कुटुंब विकते घेऊ शकत नाहीत.(मूळ इंग्रजी कविता)

मुंबई महानागारीच्या रस्त्यावर मी जेव्हा उतरतो तेव्हा लक्षावधी विस्थापित कुटुंबे नजरेस पडतात. (कारण साधे आहे: कधी मी आर्किटेक्टचा व्यवसाय करीत होतो. कधी शिक्षक होतो. कधी जमीन नसलेला शेतमजूर होतो. कधी मीपण विस्थापित होतो. फक्त शिक्षणाची वेळीच संधी मिळाली. हे सारे लोक देशाच्या सर्व प्रदेशातून आलेले आहेत; जेथे जेथे मुंबईचे पदचिन्ह उमटले तेथून. ही गोष्ट राजकर्त्याना नजरेआड करून चालणार नाही. मुंबईत वसलेल्या देशी - परदेशी भांडवलदारांची ऐपत त्या सर्वाना गुलाम म्हणून विकत घेण्या इतपत आहे. पण जेथे सुशिक्षित गुलाम मिळतात तेथे त्याना कोण विचारतो?टीप: मी काढलेले वरील छाया-प्रकाश-चित्र कलेचा नमुना नाही. असे चित्रण मी फक्त नोंदणी साठी वापरतो. "कलेसाठी कला" मी मानीत नाही.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 27, 2009

मुक्ताफळें - ११

मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल, नि आवळ्याची तुरट चव!

"ज्यानी निसर्गाशी संवाद साधून जगणे अनुभवले नाही त्याना नैसर्गिक मरण कसे येणार!"

क्रमश:
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 22, 2009

मुक्ताफळें - १०

मुक्ताफ्ळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल! इतर भाषांतही अशी मुक्ताफळें असतील; त्याना काय म्हणतात माहीत नाही. इंग्रजी भाषेत aphorism हा शब्द जवळचा आहे, प्रत्येक भाषेच्या स्वत:च्या छटा असतात.

"सर्वानाच खुश कसे करणार? त्यासाठी विदूषक व्हायला लागते."

(काहीना हा ब्लॉग, ही पोस्ट आवडतील अथवा आवडणार नाहीत. कुणी टिप्पणी करतील; कुणी इतराना कळवतील, कुणी चूका नजरेस आणून देतील, कुणी सबस्क्राइब करतील; आजच्या धकाधकीच्या जीवनाला अनेक कंगोरे आहेत हे मी लक्षात घेतो... सर्वांचे स्वागत आहे. धन्यवाद. )

रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 12, 2009

मुक्ताफळें - ९

मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल.

झाडांवर लक्षावधी पाने असतात. प्रत्येक पानाच्या शिरा (bar-code by Nature) एकमेवाद्वितीय असतात. तरीत्यांच्यापुढे व्यक्तित्व-पेचप्रसंग (identity- crisis) उद्भवत नाही.

(उद्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. लोक मूर्ख नाहित. कुणालाच बहुमत मिळणार नाही याची खात्रीआहे. मग खरेदी-विक्रीचा बाजार सुरु होईल. निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या माथ्यावर पण त्याची किंमतलिहिलेली असणार, जशी शर्यतीत धावणारे घोडे, IPL चे  क्रिकेट खेळाडू,  चोर दरोडेखोर वगैरेंच्या डोक्यावर लिहिलेली असते. दरेक निवडणूकीत अशीच निकाल येत आहेत. पण हरघडी प्रांतांच्या व केंद्र सरकारच्या निवडणूकींच्य  निकालांपासून कुणीच कसा धडा शिकत नाही? कधी हे तथाकथित पुढारी आपला हेकेखोरपणा सोडून कधी लोकाभिमुख होणार?) 

-- रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 09, 2009

मुक्ताफळें - ८

मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!

अनुभवाची मुळें व्यक्तिगत वातावरणाच्या चारित्र्यात खोलवर रुजलेली असतात.

रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 05, 2009

मुक्ताफळें ७

मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!

काम नाही, उद्योग नाही... असे कधी झालेय?
स्वस्थ पडून रहा आणि शोध घे.

क्रमश:

रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 01, 2009

त्याना देवकळा पाषाणाची

त्याना देवकळा पाषाणाची 
नेते महात्मे समाजधुरंधर  
अरे परमेश्वर तर कधीचा गेला 
पाषाण होवून राहिला
मीच आहे ब्रम्ह म्हणून 
इमान राखावे स्वत:शी. त्याना देवकळा पाषाणाची 
संत महंत संस्क्रुतिंचे आधार 
मी आहे ना जीव हाडामासाचा
इमान राहू दे जिवाशी-जीवनाशीत्याना देवकळा पाषाणाची
पोथ्या पुराणे दर्शने  
धरतीची लेकुरे आम्ही 
आम्ही प्रेषित आमच्या जिंदगीचे 
मी आहे पूत मातीचा 
शपथ आहे रक्ताची. 

ऋतु वर्षांचे चक्र चक्र
परंपरा संस्कृतिंचे 
त्या वाळवंटात हौतात्म्य 
पिचत राहिले मानवतेचे 
त्या बलिदानाशी 
इमान राहु दे.
*    *    *

 (स्थळ: वडोदरा
सन: १९६७)

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

मुक्ताफळें - ६

मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!

पुढची पाच मिनिटे वाट पहाण्यात कधीच निघून गेलेली आहेत!

क्रमश:
रेमीजीयस डिसोजा
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape