August 31, 2009

वळवाचा पाऊस (पावसाचे गाणे)

वळवाचा पाऊस येई वाजत गाजत --
विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट,
कधी पाऊस , ऊन कधी, सप्तरंगी इंद्रधनू कधी
मुलेबाळे मस्त होती घरकुलांच्या गच्चीवरती

महानगरीँ जाती पावसाळे होऊनी पळें
शेवटच्या टप्प्यावरी पाऊस वळवाचा परी
आणितसे अमोल लेणे साळीच्या पिकाचे
विधिलिखित असें विद्रोही कवितेचे

(जन्म-मरणाच्या चक्रात अरे ऽ मी गुंते )
* * *
टीप १: शेवटच्या ओळीतील "अरे ऽ मी " हा शब्दश्लेष आहे.
(१) यातील "मी" म्हणजे मीपण / अंहकार;
(२) "मी" हा लेखक असेल किंवा वाचक;
(३) "अरे ऽ मी " हा मध्यम पद-लोपी समास पण होतो: मी मालवणला माझ्या जन्मगावी प्राथमिक शाळेत शिकत होतो. वर्गात एकदा मास्तर बोलले, "अरे ऽ मी काय बोलतोय ऐकलस का?" सर्वानी वर पाहिले. पण मास्तर माझ्या नजरेला नजर भिडवून म्हणाले, "होय, मी तुलाच विचारतोय..." झाले. वारयासाराखे "अरे ऽ मी " नाव गावभर पसरले. मास्तरानी "अरे रेमी" तील एक "रे" गाळला होता.
टीप २: पहा "इंद्रधनुष्ये" (इंग्रजी)


रेमीजीयस डिसोजा
मुंबई
२७-०८-२००९


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 22, 2009

गणेश उत्सवात मुंबईचा फूल बाजार

बाजार किंवा हाट ही प्राचीन देशी परंपरांपैकी एक आहे. बाजार ही आपल्या शेतीप्रधान देशातील सहा लाख खेड्यांची हजारों वर्षांची परंपरा आहे. देशभर अनेक प्रकारचे बाजार भरतात. त्यांत आठवड्याचा बाजार हा सर्वसाधारण नमुना. पंचक्रोशीतल्या खेडेगावांत ठरल्या वारी वेगवेगळ्या गावात किंवा बाजारपेठ असलेल्या गावी, तसेच जवळपासच्या शहरात असे बाजार भरतात.

या बाजारात भाज्या, फले, धान्ये, तसेच माती-बांबू-लाकुड-धातू यांच्या घर, कुटुंब, शेती यांच्या उपयोगी वस्तू (हस्तकला) विकायला लोक आणतात. त्याशिवाय गईगुरेँ, शेळ्या मेंढ्या उंट इ. जनावरे विक्रीसाठी आणली जातात. राजस्थानच्या वाळवंटात तरणेतर येथील जत्रेत इतर वस्तू आणि जनावरांबरोबर उंटांचा पण बाजार भरतो. ही जत्रा वर्षात एकदा भरते.


Dancing Ganesh: नर्तक गणेश

-------------------------------------------------------------

मुंबई पण इतर कोणत्याही शहराप्रमाणे परजीवी नगर म्हणजे "बांडगुळ" आहे, ते जवळच्या व दूरच्या प्रदेशांवर जगते. इतकेच नाही, तर त्याचे जगणे हायड्रोपोनिक्सचे आहे। "Hydroponics " म्हणजे "मृदाविराहीत रासायनिक जलशेती " मुंबईतील दादरचा फूलाबाजार हे याचे दृश्य उदाहरण आहे. येथे फुले, पाने, गवते... दांतण पण विकली जातात.
स्थळ: सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई.

ही फूल गल्ली किंवा फूलबाजार कितिक दशके जुना आहे. कदाचित शंभर - दीडशे वर्षें झाली असतील. कोणाला माहीत नाही. मुंबई शहराच्या स्थापनेपासून इंग्रजीतून शिकलेल्या विदेशी - देशी नगररचनाकाराना पण माहीत नाही. किंवा त्याना देशी लोकपरंपरेची पर्वा नसावी हे जास्त खरं!
नाहीतर
याला मुंबईच्या वेळोवेळी आखलेल्या नकाशांत पारंपरिक वारसा (heritage) म्हणून मानाचे स्थान व स्थळ मिळाले असते.

णेशोत्सवात येथे आजूबाजूच्या गावांतून - डोंगरांतून खेडूत अनेक जातींची फुले, फले, पाने, गवते (दूर्वा) जी भक्त गणपतीची पूजा आरास करायला वापरतात. आपल्या वनश्रीची संपन्न विविधता आपल्याला इथे बघायला मिळते.
मुंबईची लोकसंख्या जशी वाढतेय तशी यांची मागणी पण वाढतेय। त्याबरोबरच श्रीच्या मूर्तींची
मागणी पण.काही वर्षांपूर्वी दादरच्या रेल्वे स्टेशन बाहेर, सेनापती बापट मार्गावर (पूर्वीच्या तुळशी पाइप रोडवर) मोटारींसाठी उड्डान पूल, आणि इथून दोन फर्लांगावर सरकारी फूलबाजार बांधले.
अर्थातच वहिवाटीनुसार लोक इथेच बाजार मांडतात - जेथे जागा मिळेल तेथे - पुलाखाली, रस्त्यावर, फूटपाथवर, आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर पसरतात। मूळ दुकानदार पण तेथेच राहिले.
उत्सवाच्या दिवशी वाजन्त्र्यांचे आवाज, "बाप्पा मोरया"चा घोष ठिकठिकाणी ऐकू येतात.काळानुसार लोक प्रथा, रिती, रिवाज, परंपरा यात फरक करतात.
आता या बाजारात श्रीमंतांसाठी महागडी ऑर्किड फुले आणली जातात, गोरगरिबांसाठी कचकड्याची आरास विकत मिळते.
पाश्चिमात्य शिक्षणात वाढलेले व शिकलेले आधुनिक नगर-रचनाकार अर्थातच माणसांसाठी शहरांचे आलेखन करण्यात अपेशी झालेले आहेत. ते पाश्चिमात्यानी ठरवलेल्या प्रमाणांसाठी नकाशे बनवतात. शेकडो शहरे या देशात हजारो वर्शांपासून वसलेली आहेत. पण आधुनिक देशी शिक्षण पध्दतीने या शहरांचा अभ्यास कधी केला नाही. ही शहरे हजार वर्षे का टिकून आहेत याचा या शिक्षण संस्थानी आणि त्यांच्या शिक्षण पध्दतीने कधी रितसर केला नाही.
गणपती बाप्पा त्याना सदबुध्दी देवो!

श्री गणेशावर काही इंग्रजी लेख:
१। My "Sri Ganesh"
२। Dancing Ganesh
३। Flowers Forever (Poem)

आनंद कुमारस्वामी यानी त्यांच्या "YAKSAS: Essays in the Water Cosmology" या पुस्तकात "महायक्ष" गणपतीवर फार उदबोधक लेख लिहिला आहे. त्या पुस्तकाचे मी केलेले परिक्षण : दुवा


~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 19, 2009

जेव्हा आम्ही भेटू मरणा समोरा समोरी

"...आज करेसो अब कर" — कबीर


जेव्हा आम्ही भेटू मरणा
समोरा समोरी
पुरेसे एक अनेकवार
हरवण्या काहीच नसे

जेव्हा आम्ही एकमेका भेटतो
जेव्हा आम्ही घरा परततो
जेव्हा आम्ही कामासी जातो
दरेक वेळी अखेरच्या वेळी

दरेक भेटणे,
दरेक परतणे
दर दिनी कार्य प्रतिक्षा
दरेक क्षण आत्ता इथे
आहे उत्सव जीवनाचा
नमन असे मरणासी
* * *

(मूळ इंग्रजीचे भाषांतर)

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 15, 2009

मेघमल्हार -५

मेघमल्हार -५


पांढरा ढग पांघरे
आकर्षक रंग --
कोरडा


(पांढरे ढग हे राजकारणी लोकांसाराखे असतात.)
------

सुशिक्षित उच्चभ्रू वर्गाला वाटते शेतकरी फक्त चार महीने काम करतात आणि उरले वर्षभर आळसात घालवतात. अमर्त्य सेन सारखे तज्ञ पण याला अपवाद नाहित. मग सरकार अंमलदार लोकांचे काय सांगणार?

निसर्ग आणि नैसर्गिक आपत्तिंपेक्षा सरकार आणि अंमलदार, बाजार आणि औद्योगिक समाज हे त्यांच्या सुधारणा व प्रगतीच्या प्राथामिकतेच्या उलट धोरणामुळे शेतकरी समाजाच्या यातनाना खरे कारणीभूत आहेत.

(मूळ इंग्रजीचे भाषांतर: पहा दुवा )


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 12, 2009

मेघमल्हार-४

शेतकरयाच्या यातना आणि उल्हास


पावसाच्या येती सरी
पुनर्युवीत करिती ज्योती
वनराईच्या सदोदीत
झरे पाझरती खोलवरी
तृप्त होती बाळे तान्ही
धरतरीच्या अंगावरी

(मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर| पहा दुवा)

पारंपारिक मृदा शिल्पी वर्षानुवर्षे गणपती - दुर्गा यांच्या मूर्ती तयार करतात. त्याना माहित असते त्यांचे विसर्जन होणार. तरीही ते भाविकपणे न कंटाळता आपले काम करतात. शेतकरी पण अशाच श्रद्देने आपले काम करतो. यास्तव त्याच्या श्रमास "कारागिरी" "कलेचा" (vocation) दर्जा प्राप्त होतो. त्याच्या या कर्मात "ध्यान" असते म्हणून ते "आध्यात्मिक" पण असते.

टीप: शेतकरयांपासून बरेच काही शिकण्यारखे आहे. उदा: माझे इंग्रजी पोस्ट पहा, "Watering rhe farms: Learning from the people".


क्रमश:

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 10, 2009

मेघमल्हार -३: शेताकरयाच्या यातना आणि उल्हास


बी बियाण्यांची पेरी
हुकलेल्या सरी
थेंब थेंब ठिबके झरी
कृष्ण पक्षीं चंद्रकोर
आशा अधांतरी
सरकणारया मेघांवर

(मूळ इंग्रजीचे भाषांतर : लेखन - १९९९-२०००)

शेतकरी केवळ कलावंतच असतात असे नाही, तर नियोजनकार पण असतात. पण नगर नियोजनकारासाराखे नव्हेत, जे बुलडोझर लावून जमीन व तलाव सपाट करतात व जमीनीचे तुकडे पाडतात, शहरें वसवण्यासाठी. शेताकरयाचे नियोजन उंच-सखल जमिनीचा उपयोग पाण्याच्या व जमिनीच्या व्यवस्थनापनासाठी व संधारणासाठी वापरले जाते.

शेतकरी व्यवस्थापन तज्ञ पण असतात। ते जमीन, पाणी, बियाणे, तणे, चारा-वैरण, खते, अवजारे, साठवणी, नेआण, आणि इतर संलग्न अन्न-धान्ये व जनावरांचे पालन इत्यादींचे व्यवस्थापन करतात.
आणि तेवढेच अगत्याचे, ते सतत शेतीच्या दरेक क्षेत्रात संधारण, दुरुस्ती, पारख, सुधारणा, आणि धोरण आखणी करीत असतात. हे सर्व त्याना उपलब्ध साधन सामग्रीतून ते करतात.
शेतकरी कदाचित निरक्षर असले तरी "अशिक्षित" नसतात, जसे काही उच्चभ्रू मंडळीचा समज असतो.

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 05, 2009

मेघमल्हार- २

येरे येरे पावसा! शेताकरयाच्या यातना आणि उल्हास
काळा मेघ ओथंबलेला
करी उपड्या सरी --
पुनरूत्थान

(लेखन: १९९९-२००० | मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर | पहा दुवा )

शेतकरयांची कला वास्तवाच्या क्षेत्रात घडते. चित्रकला, छ्यायाचित्रण, शब्द इत्यादि प्रमाणे ती "मायावी वास्तव" निर्माण करीत नसते. शेतकरी लहान किंवा मोठ्या जमिनीच्या कैनवास वर निसर्गाचे रंग - पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश - घेऊन चित्र रंगवातो; तेहि जाणीवपूर्वक, त्यामुळे त्याला ध्यानाची जोड़ असते. तो कधीही वाचाळपणा करीत नसतो.
शेतकरी त्याच्या शेताच्या कानाकोपरयाशी पूर्ण परिचीत असतो, तसेच सर्व वनस्पतींच्या आरोग्याशी पण.
क्रमश:

~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 03, 2009

मेघमल्हार -१

येरे येरे पावसा! शेताकरयाच्या यातना आणि उल्हास

ढग भारावलेला
काळाभोर जडावलेला
भरकटे पुढे ---
अव्हेरलेली भुई

(मूळ इंग्रजीचे "Rain! Rain! Come again-1" चे भाषांतर)
-----
शेतकरी कलावंत असतात यावर फारच थोड्या लोकांचा विश्वास बसेल. सर्व प्रकारच्या रोजगार, व्यवसाय आणि कारागिरी (occupations, professions and vocations) यात शेतकरयांची कला अत्यंत धोक्याची असते याची अनेकाना माहिती पण नसेल.
क्रमश:

~~~~~~


© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

पाणीच पाणी चोहिकडे (पावसाचे गाणे)

पाणीच पाणी चोहिकडे

पाणी, पाणी, पाणीच पाणी चोहीकडे ---

लोकसभेत, कागदावरी, रुपेरी पडद्यावरी,
संगणकाच्या पटावरी, टीवी च्या पडद्यावरी...
परी पोसण्यासी थेंबही ना मिळे.

मरूभूमीत जेथे वालुका राशी तेथे
आत्मा जगे हवेतल्या ओलाव्यावरी
इथे परी मृगजळा मागे मन धावे चोहीकडे.

ध्रुव प्रदेशीच्या संधिप्रकाशी
डोंलफिन करिती मनमौज जिथे,
अन उबदार इगलू पहाटेच्या प्रतिक्षेत.

माझ्या सह्याद्रीच्या वनात, लोपणारया
तुझिया सत्तेखाली, पर्जन्य येई धो धो अन धावे
आषिश देत समस्ताना वाटेवरी.

परी तुझ्या नागरी अरण्यात तो बंदिवान
तुझ्या संकेतात, सुटका त्याची नळातून,
अन् सीलबंद बाटल्यांत ज्या मला न परवडे.

मज नाकळे ते अरण्य मजसी कसे हातळे,
मी, माझी संस्कृति, माझी नाती ---
नम्र तृणे
, देवादिकापासून ते प्राण-वायू;


त्याच्या विराट अवसीमीय मौनाने?
नाही जाणिले त्याने "प्रेम" आणिक एक
नाव असे पाण्याचे जयात अभिन्न "अग्नि".

* * * * *
माझ्या मूळ इंग्रजी "Water,Water everywhere" या कवितेचे भाषांतर. पहा दुवा


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape