October 25, 2008

Life-line (poem with image)

Translation of original Marathi poem by the author.
---------------------------------------------------------------------------------------------

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 23, 2008

जीवनरेखा - Life-line (Image)

जीवनरेखा
मातीतून येई वर
एका आयुष्याचा दोर
गुंफीत जाई वळेसार
मातीच्या स्पंदनांचा
काळाच्या वेशीवर...
अनावर गर्दीत सभोवार
नाही कधीही होत धरतीला भार।

* * *
टीप: वळेसार (मालवणी) गजरा (मराठी)
---
(रेमीचे सौभाग्य असे की तो झाला असेल कधी ना कधी सभोवतालच्या माणसाना भार पण कधीही नव्हता धरतीला भार। इतरांचे माहीत नाही। अशी ही रेमीची नागडी उघडी कविता। )
~~~~~

© Remigius de Souza. All rights reservede.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 22, 2008

सखी तुझा अंतराय

सखी तुझा अंतराय

सखी तुझा अंतराय
आज आलेत पैसे
विकत घेतो अन्न काही
थोडा निवारा पांघरूण
चैन थोड़ी मौज मस्ती
जोवर आहे तुझा अंतराय

मग येशील तेव्हा
ठेवणार नाही यातले काहीच
नाही करणार साठेबाजी
असेन मी रीता

आज आलेत पैसे हातात
यास्तव आहे तुझा अंतराय .

(गुजरात
४-१०-१९७० )
~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 17, 2008

त्या बलिदानाशी इमान राहूदे

त्या बलिदानाशी इमान राहूदे

नेते महात्मे समाजधुरंधर
त्याना पाषाणाची देवकळा
अरे परमेश्वर तर कधिच मेला
पाषाण होऊन राहिला
मीच आहे ब्रम्ह म्हणून
इमान राखावे स्वताशी .

त्याना देवकळा पाषाणाची
संत महंत संस्कृतीचे आधार
मी आहे ना कीडा हाडामासाचा
इमान राहूदे जीवनाशी .
धरतीची लेकूरे आम्ही
आम्ही प्रेषित आमच्या जिंदगीचे .

त्याना देवकळा पाषाणाची
पोथ्या पुराणे दर्शने
मी पूत मातीचा
शपथ आहे रक्ताची .

ऋतुवर्षांचे चक्र चक्र
परंपरा संस्कृतीच्या वावटळी
हौतात्म्य त्यात पिचत राहिले
मानवतेचे
त्या बलिदानाशी इमान राहूदे .

स्थळ: बडोदे
सन १९६७
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 14, 2008

नर्मदेची बाळें आणि माझी नर्मदेची परिक्रमा

नर्मदेची बाळें

माझी नर्मदेची परिक्रमा
माझी नर्मदेची परिक्रमा रूढ़ अर्थाने परिक्रमा नव्हतीच. नाही मौजेसाठी अथवा संशोधनासाठी केला हा प्रवास. इतर नद्या, सरोवरें आणि सागर यांच्या बरोबर नर्मदासुद्धा सर्व जीवामात्रांची जीवनरेखा आहे ही जाणीव मात्र असायची, आताही मी जारी शहरात असलो तरी आहे, अधिकच प्रखर आहे.

मी काही मूर्तिपूजक नाही. नाही मी संघटीत धर्मसंस्थामध्ये विश्वास ठेवीत. नाही मी ईश्वरवादी, नाही मी निरीश्वरवादी. कोणत्याही धर्माच्या, कुणाच्याही ईश्वराच्या वादात पडायचे नाही. श्रध्दा जर कृतीमध्ये परिवर्तीत होत नसेल आणि त्यात सर्व जीवमात्राची जाणीव नसेल तर तिला अंधश्रध्दा म्हणावी लागेल.

महाकालीचापण रूढ़ अर्थाने मी भक्त नाही. पण महाकालीच्या संकल्पनेचे वास्तव दर्शन मला नर्मदेमध्ये झाले. नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्राच्या उत्सवाची सांगता मी सोबतच्या छायाचित्राने करतो.
~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 09, 2008

आई नर्मदे!

आई नर्मदे

चण्डिकेचा अवतार धारण करून
गावे राने धुवून काढतेस
तरीही लोक तुझा जयघोष करतात...

आई नर्मदे
हरघडी मी अनिवार्य ओढीने
तुझ्याकडे येतो सर्जनशीलतेला जेव्हा होतात
सामाजिकतेचे बांध असह्य...
कितिक ओंजली भरभरून मी पीतो
आणी श्रध्दा माझी प्रत्येक ओंजळीतून
सामर्थ्याचं प्राशन करते...

आई नर्मदे
तुझ्या पाण्याच्या प्रत्येक ओंजळीने
माझ्या आतला अग्नी प्रज्वलीत करावा
जागा ठेवावा;
आणी त्या अग्नीचा मलाच विरघळून
टाकणारा महापूर बनावा;
मनातील सामाजिकतेची सारी जळमटे
धूवून टाकणारा अग्नीपूर भडकून उठावा;
त्यात स्वत:च निर्माण केलेल्या
दंभाच्या साऱ्या प्रतिमा नष्ट व्हाव्या;
त्या साऱ्या पतिमानी डागाळलेले
जीवन मुक्त मनसोक्त व्हावे...

आई नर्मदे
त्या अग्नीपूरात तुझीही प्रतिमा नष्ट झालीय;
आता मीतूचा भावही संपलाय;
तुझ्या पाण्याच्या प्राशानाने मी नर्मदामय झालोय.

माते वैराग्यभूमी,
युगायुगांची साक्षी
तुझ्या पाण्याच्या प्राशानाने
दुर्बलांचे अश्रू लाव्हारासा बनू दे;
त्यांचे निश्वास ज्वालामुखी बनू दे;
आणी त्यांची जीवने अग्नीपूर होवूं दे।
-----
स्थळ:
सन : १९६९
~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 08, 2008

अशरिरीणी आदिशक्ति

अशरिरीणी आदिशक्ति

अशरिरीणी आदिशक्ति
भितिदायक भव्यहि
कोटिकोटींच्या विशाल दु:खात
कोंडून आहे तिचा थयथयाट
त्यांचे सुस्कारे अग्नीची
कारंजी बनतील.
-----
स्थळ - बडोदे
सन - १९६९

~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 07, 2008

नर्मदा, गुरुडेश्वर

नर्मदा, गरुडेश्वर

पाण्याची धार कापते
काळ्याकभिन्न पुरातन पथ्थराना.

~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 06, 2008

अन्न परम ब्रम्हः

अन्न परम ब्रम्हः

अन्न परम ब्रम्ह: म्हणे --
भांग प्यायली होती तेव्हा.
अन्न घशाखाली विष हौउन उतरते.
बाजार आहे अन्नाचा
विक्रय आहे शरीराचा
सिनेमा थेटरात मनाचाही

आम्ही हलाहल पचवले
नशा नाही कामी येत
आम्ही विषवृक्ष -

मुखावट्या आड़ कंठ आहे
काळा ठिक्कर जळणारा
तडफडणारा
आशा निराशेच्या जाळ्यात
गुरफटून टाकणारी चाहूल
मरणाची दाबून आम्ही ठेवतो.
---
स्थळ: बडोदे
तारीख: ३१-३-१९६९

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 05, 2008

क्षण गोठलेला

क्षण गोठलेला

क्षण गोठलेला
काळ-काम- वेगाचे गणित
थांबवून राहिलेला
एकाकी तरीही
तिनही काळ
व्यापून राहिलेला

क्षण संभवाचा - समभावाचा
सीमारेषेवरचा
जननमरणाच्या.
---
स्थळ : बडोदे
सन: १९६९

~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 04, 2008

त्याना सामर्थ्य दे आई

त्याना सामर्थ्य दे आई

अनेक रुपानी तू सभोवती वावरतेस
दीन दुबळे दलितांच्या कष्टांचे
तू प्रतीक आहेस
धरतीच्या अनेक काळात
तिच्या रुद्रभीषण रुपात
तू साठवली आहेस
ममतेच्या एका इवल्याशा कटाक्षातही
तुझे महात्म्य सामावून जाते.

अगणितांच्या दू:खकष्टाना
आई तू सामर्थ्य दे.
-----
स्थळ: बडोदे
सना: १९६९

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 03, 2008

आई तुझ्या कष्टांचा वाटा मला दे

आई, तुझ्या कष्टांचा वाटा मला दे
सर्व सुखदु:खाच्या फेर्यात
उत्कर्ष अपकर्षाच्या चक्रात
शहाणपण दैवाच्या आवर्तात
तुझ्या कष्टाचा वाटा मला दे.

ही माती घडवण्यासाठी किती कष्टांचे
डोंगर पालथे घातलेस
त्या तुझ्या कष्टांचा वाटा मला दे.
---
स्थल: बडोदे
तारीख: १३-५-१९६९

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 02, 2008

गांधीवाद

गांधीवाद
गांधीजी पंचा नेसत होते.
आम्ही बाजारू खादी नेसतो.
ही आमची गांधीवादाची मर्यादा --
नक्राश्रू ढाळू नकोस.

(गांधीजयंती, ऑक्टोबर २, २००८)

---------

Gandhism

Gandhiji wore loincloth of Khadi
We patronise marketed Khadi
That’s our limit of Gandhism –
Don’t shed crocodile’s tears.

(Translated from the original by the author)

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 01, 2008

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून

आता उठालो आहे माझ्या फोंसिलमधून
माझ्या न्यायाचा क्रूस नको घेऊन जाऊ
आता वाढलीय महागाई - साखर
अन्नधान्य हवापानी कापडचोपड
शब्द पण महाग आहेत
आणि वाढलाय व्यापार
कमाई उरण्याची खिंडारे भगदाडे.
---
बडोदे
फेब्रुवारी १९७०

~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape