June 25, 2010

श्रम गेले गटारात

येथल्या गटारांतूनही
या शहरी जीवनात आशा आहे काही
गाळून सोने काढायची
पण येथल्या मूढमतींकडून काहीच नाही --
दिसायला ते शोभिवंत
परि असती ते भोगवादी बाजारू वस्तू --
करिती फक्त पोपटपंची
त्यांचे प्रतिसाद उथळ, भेदी त्यांचे कारक व्यापार

काय अपेक्षा करणार
या संवर्धित कृत्रिम फुलझाडांकडून
घडवले जयाना जुळवणी पंक्तिवर
या संस्कृतिने, जी सदा मदमस्त संमोहित सुखात नि अवशिष्ट निर्मितीत?
नाही फुले. नाही फळे.
ना सर्जनशील कर्म. नाही मुक्ति. 

*  *  *
(माझ्या मूळ इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर)   
टिप: (१) सेकंदाला फक्त एक पैसाः सेलफोनवर बोलायचा दर! मात्र रोजचया व्यवहारातून एक, दोन, पांच, दहा, वीस पैशांची नाणी कधीच गेली. आता पंचवीस पैशाचे नाणे पण दिसत नाही. पैशांची किंमत वाढली पण मोल कमी झाले. यंत्राची किमत (मजूरी) वाढली. श्रमाची किंमत व मोल, दोनही कमी झाली. मजूराला तासाच्या पण हिशेबाने कोणी मजूरी देत नाही. शारीरिक व मानसिक श्रम कमी करायला यंत्र वापरायचे. पण जे यंत्राचे गुलाम झाले त्यांचे मोल काय? (अधिक वाचा: सोन्याच्या शोधात: मुंबईत आपला परिसर )
 
(२) छायाचित्रे :  "मुंबईत सोने शोधणारे" | रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 16, 2010

जीजुत्सू प्रतिकार-विद्या


बलिष्टांचे शक्तीस्थान त्यांचे मर्मस्थान पण असते. कुस्तीवरच्या एका कथेत फारा वर्षापूर्वी वाचलेले वाक्य. गुरू आपल्या शिष्याला हा उपदेश देतो. मल्लयुध्दाच्या डावपेचांतील हे एक इंगितः आपल्यापेक्षा अधिक ताकदीच्या मल्लाला चीतपट करायचे असल्यास त्याचे वर्म ओळखणे जरूरीचे असते. 

भारतातून सुमारे इ. स. 200 वर्षापूर्वी बौध्ध भिक्षू चीनमध्ये धर्मप्रचारासाठी हिमालयातून जात असत. वाटेत लुटारू हल्ले करीत. तेव्हा त्या निशस्त्र भिक्षूनी जीजूत्सू  विद्येचा शोध लावला. ही खरीखुरी विधायक सर्जनशीलता.  


आज याची भारतातील बहुसंख्य दीनदलीत, पिडीत, कृषिक वर्गाला गरज आहे, विद्येची गरज आहे, नक्षलवाद्यांची नाही, परजीवी संघटनांची नाही. भारतातील उच्चवर्गीयानी, किंवा उच्चवर्णीयानी म्हणा, त्याना हजारो वर्षे विद्येपासून वंचित ठेवले, व या निधर्मी लोकशाहीत अजूनही ठेवलेय. ही विद्या बदलत्या
काळानुसार बदलायला हवी. ही विद्या कृषिक भारतीयांसाठी समर्पक आहे.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 07, 2010

धरतीची लेकुरे पोरकी

 पाऊस कुठुनी आला कुणी नाही देखिला. 
वसुंधरेचे झरे आहेत लपलेले. 
कुणी नाही बोले मनी जपलेल्या आशा.   
कुणा ना आठवली स्वप्ने. 
धरतीची लेकुरे पोरकी तिच्या उबेला पारखी 
शोधिती निवारा अंधकारी.  


~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


Page copy protected against web site content infringement by Copyscape