June 30, 2009

त्या बलिदानाशी ईमान राहूं दे

त्या बलिदानाशी ईमान राहूं दे

त्याना देवकळा पाषाणाची
नेते महात्मे समाजाधुरंधर
अरे, परमेश्वर तर कधीच गेला
पाषाण होऊन राहिला
मीच आहे ब्रम्ह म्हणून
ईमान राखावे स्वत:शी.

त्याना देवकळा पाषाणाची
संत महंत संस्कृतीचे आधार
मी आहे ना जीव हाडामांसाचा
ईमान राहू दे जीवाशी.

त्याना देवकळा पाषाणाची
पोथ्या पुराणे दर्शने
धरतीची लेकुरेँ आम्ही
आम्ही प्रेषित आमच्या न्यायाचे
मी आहे पूत मातीचा
शपथ आहे रक्ताची

ऋतुवर्षांचे चक्र चक्र
परंपरा संस्कृतिंचे
त्या वाळवंटात
हौतात्म्य पिचत राहिले
मानवतेचे
त्या बलिदानाशी ईमान राहूं दे.

(१९६७, गुजरात)

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 29, 2009

एका समकालीन आदीवासीचे आनंदगान

एका समकालीन आदीवासीचे आनंदगानआमच्या पितरांच्या मातीत अणि पाण्यात 
मी नाही रेव किंवा नाही उपोत्पादन
या अमानुष अराजकाचा नागर-सांस्कृतिक,
जी देत
असते आव्हाने दरेक श्वासागणिक
मानवतेच्या प्रतिष्टेला आणि आत्मसन्मानाला.

आम्ही नाही उदास किंवा नाही निराश
आमच्या हवस-विरहित जीवन शैलीमुळे. आम्हास
जीवन आहे
श्रेष्टतम सर्वतोपरी वस्तुंपेक्षा मानवनिर्मित.
आमचा हरेक श्वास असतो निमित्त खचित
जीवनोत्सवाचा सोहळा साजरा हरेक कर्मात
आनंदाचे लेणे घेऊन येणारा सदोदीत;

असे जरी सभोवार हीणकस कितीही अराजकता.
तिचे
मुक्त पतन करतात तिचीच समीकरणे
आणि आरोपणे, तिचे कुप्रसिध्द
अन् सुप्रसिध्द भाट ; तें सारेंच जाणार धुपून
काळ-पुराच्या महाद्वारातून
होणार अज्ञातात विलीन.

सुपूर्त करतो मी माझ्या निष्टेचे आश्वासन
आमच्या पुनर्भेटीचे प्राचिनतेत
आमची जीजीविषा उड्डाणास तयार सदोदीत
, माझ्या आप्तस्वकीयानो, आदिम प्रकृतित!
 
 - - - - - -
 (मूळ "Song of an aborigine in our time" या इंग्रजी कवितेचे भाषांतर)
- - - - - - -
प्रतिमा: १, भिल्ल आदीवासी होळीचा उत्सव साजरा करतात सातपुड्याच्या कुशीत.
पतिमा २ व ३, भिल्ल आदीवासी षोडशांचे नृत्य अन गान; गांव चिखली, सातपुड्याच्या कुशीत.
(छाया-प्रकाश चित्रे: रेमीजीयस डिसोजा)
पावसाळ्याचे दिवस होते. मक्याचे पीक तयार झाले होते. योगायोगाने तो दिवस होता "दिवासौ" सणाचा, पितरांच्या आठवणीत. चिखली गांवाचे आदरातिथ्य स्नेहाने भरलेले. सर्वानी मोहाची मदिरा घेतली. ती पिण्यास खास एक वीतभर लांबीचा छोटा तुंबडा घेतात, त्यात जेमतेम २-३ चमचे दारू मावते. ताडी पिण्यासाठी मात्र हातभार लांबीचा तुंबडा वापरतात. मोहाची दारू घरोघर तयार करतात. त्यामुळे तिला हस्तकलेचा दर्जा प्राप्त होतो. कोणतीही विलायती कारखान्यात तयार केलेली दारू तिची बरोबरी करू शकत नाही.
मोहाचे झाड अनन्यसाधारण आहे. त्याला बहार येतो तेव्हा साऱ्या गावात आणि वनात त्याच्या फुलांचा मधूर सुगंध पसरतो. बहराच्या हंगामात त्याच्या फुलांची भाजी करतात, तसेच सुकवून ठेवतात आणि दारू पण गाळतात. ती खास दिवशीच काढतात. त्या दिवशी मोहाच्या फुलांचे पीठ मक्याच्या पिठात मिसळून बिस्किटा सारख्या रोटल्या तयार केल्या होत्या. त्यांची चव मधुर होती. सुगंधाला पण चव असते.~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 27, 2009

आम्ही जन्मतो अबाबीलच्या पंखावरी

पदच्युत असू जरी,
आम्ही पातशहा अमुच्या मानसविश्वाचे
आम्ही जन्मतो
अबाबीलच्या पंखावरी

- - -
(अबाबील: ईराणी दंतकथेतील पक्षी (फिनिक्स)
सप्टेंबर १९९०
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 25, 2009

संस्कृतींची वावटळ

संस्कृतींच्या वावटळीत
हृदयातली
कळ जपावी

(४.९.१९६९)
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 24, 2009

सवयीच्या वाटा

सवयीच्या वाटा आंधळ्या
विधी राहिले, अर्थ हरवले
कधी वळून पहा मागे.

(१९८४)
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 21, 2009

तिची सय

तिच्या सयीचा सुगंध
दारीचा निंब
दरवळतो आसमंत

(३१-३-१९८४)
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 19, 2009

असणे-जगणे-नटणे (Painted Poem)

नटणे. . . . . . . . . .काही

. . . .. . . . . . . . . .भाकर
. . . . . . . . . . . .. आणि. . . . . . . . . . . . .काहीसे. . . . . . . . . . . . .वेगळे जगणे . . . . . . . .श्वसन . . . . . . . . . . . . .एक . . . . . . . . . . . . चौकोनी . . . . . . . . . . . . ख़ुंट . . . . . . . . . . . . गोल . . . . . . . . . . . ..छिद्रांतअस्तित्व.. . . . .भूईतल्या
- - - - - - - - - - - - - - - - - - - - -
असणे-जगणे-नटणे (Painted Poem)
(खाली उद्र्रुत केलेल्या मूळ इंग्रजी "Existence-Survival- Decoration" चे रूपांतर)

मूळ इंग्रजी शब्द-चित्र

मनाच्या उत्कट अवस्थेत हे शब्द - चित्र (painted poem) लिहिले गेले. अशी अवस्था सातत्याने असते, तिला आदी-अंत नसतो.
शहरे, गावे, आदिवासींच्या निसर्गानिवासातिल वाडया, त्यांच्या परिसारात अनेक वर्षे भटकंती केली, त्याशिवाय माझा जन्म आणि वाढ कोंकणातील खेड्यात झालेली. या सारयाचा हा परिणाम असेल कदाचित. सकारण - अकारण केलेल्या या भटकंतीत कोणत्याही प्रकारच्या --- जातपात, धर्म, आदर्श, संस्कार, संस्कृति, आवड-निवड इ. इ. --- झडपा लावल्या नाहीत. कोणतेही चश्मे लावले नाहीत. आजही नाही.

त्यातल्याच एके दिवशी (सन १९९८५) हे शब्द - चित्र आकारले. तो दिवस पण नोंदला नाही. अशा अवस्थेत काळ-काम-वेग-स्थळ- अवकाश ही परिमाणे पण गौण होतात. अर्थातच हे कोणत्याही कला - सौंदर्य शास्त्रांच्या चौकटीत बसणे शक्यच नव्हते. खरे पाहाता याला कला - काव्य म्हणायचे का याचा संभ्रम पडतो. नागर सुसंस्कृत समाजाने केलेल्या कोणत्याही वर्गावारीत ही रचना बसणारी नाही हे पण मला माहीत आहे.

इतकेच नाही. तर रूढ़ अर्थाने मी कलावंत आहे का याची पण मला शंका येते. पण यामुळे आपल्या अभिव्यक्तीला मर्यादा पडायचे कारण नाही.

वरील मराठी संस्करण संगणकाच्या मदतीने मूळ चित्रात मुद्दाम घातलेले नाही. अशा अवांतर कसरतीची - अलंकारांची पण गरज वाटली नाही.

आपल्या अनुक्रियांची - प्रतिक्रियांची अर्थातच मन:पूर्वक अपेक्षा आहे.

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 16, 2009

फूलपाखरू

विजन वैशाख
रंग भरीत फूलपाखरू ---

फिकट
गालांवर

(१६-३-१९८४)
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 14, 2009

गुंतावळा

या गुंत्याचा धरुनी धागा
मी चौराईवर सतत उभा
वाटचाल शतकांची
अचूक चंद्र तारका
फिरत सतत अचल दिशा
अवकाशाचा आभास निशा.
(१९०११९९४)
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 07, 2009

मिरग येतो

मिरग येतो
सुकल्या कडेकपारीवरून उतरतो
विस्मरणाच्या डोंगरावर चढवतो
हिरवी वाकळ
उततात आठवणींचे
ओढे नाले विहिरींचे काठ कोरडे,
येतो भरून तानेल्या धरतीचा ऊर
अनंत अमृत धारानी.
रेमीजीयस डिसोजा
मुंबई
(२३-६-०५)

मिरग (कोंकणी) = मृग नक्षत्र

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 05, 2009

मौन

संभव काळाच्या उदरीं
नि:शब्द शांती
सामावत नाही
शब्द विकलांग.~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape