January 29, 2009

सृष्टीयोग


सृष्टीयोग
सृष्टीयोग म्हणजे निसर्गाचा - प्रकृतीचा - मार्ग, जो अनादी कालापासून अस्तित्वात आहे, अगदी सुसंस्कृत समाज अस्तित्वात यायच्या पूर्वीपासून.
सुसंस्कृत समाजानी अनेक योगांची उपासना केली, जसे ज्ञानयोग - विज्ञानयोग पासून ते कर्मयोग - भक्तीयोग ते हटयोग - तंत्रयोग इत्यादी.
वैदिक काळातील किंवा "एडनच्या बगीच्यातील" लोक कदाचित भरपूर फळे आणि मुबलक पाण्याने समृद्ध होते.
पण आम्ही मात्र कल्पनेने "सुजलाम् सुफलाम्" गात असतो पण कृतीत कमी पडतो.
आता इथेच सृष्टीयोगाची उपासना करण्याची - निसर्गाशी - प्रकृतीशी अंतर्बाह्य समन्वय साधण्याची घटका आलेली आहे. अस्तु.
(मूळ इंग्रजीचे स्वैर भाषांतर )
-----------


"Srishtiyoga" -- Way of Nature – is an ancient unwritten law long before the birth of civilizatio. Civilizations have been following a number of Yoga practices, from Jnan Yoga – Vijnan Yog to Karma Yoga – Bhakti Yoga to Hatha Yoga – Tantra Yoga. People in the Vedic times or in the ‘Garden of Eden’ were perhaps blessed with plentiful of water and fruits. It is only our wishful thinking that we sing “Sujalam, Sufalam” - abundant water, abundant fruits – that falls short of action. It is time now for ‘Srishtiyoga’ – Communion with Nature.


~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 15, 2009

घर माझे मोठ्ठे आभाळाएवढे

घर माझे मोठ्ठे आभाळाएवढे

घर माझे मोठ्ठे आभाळाएवढे.
हरवून बसलो होतो स्वत:ला
जेव्हा अंहकार जागा झाला .
नदी केव्हाच वाहून गेली होती.

अंहकार एकटा आहे -
एकाकी आहे.

रंग उडाले आभाळाला चिकटले.
रंगले अपार आकाश -
उजाड राने पथ्थर झिजलेले -
आभाळ राहिले रंगलेले.


c~~~~
© Remigius de Souza। All rights reserved।
Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 08, 2009

भुईगोलाचा पाठ

भुईगोलाचा पाठ

"पृथ्वीचा आकार कसा बरे बाळ",
सवाल गोऱ्या दिप्टी साहेबाचा.
"साहेब पृथ्वी आहे गोल गोल
सोमवारी - उरले दिवस चौकोनी
तपकिरीच्या डबीसारखी मास्तरांच्या. "
खर्रँ खर्रं सांगते पिंकी.

भुईगोलाचा चुकवून तास
आवडते मला खेळायास.
पोरे खेळतात घसरगुंडी
तालीम रंगीत आईबाबांच्या
प्राक्तानाची पुन्हा पुन्हा
रोजच्या रोज नियमाने.

तपकिरीचा भरण्यात बार
तल्लीन मास्तरांची मिटली नजर
चुकवून ठोकतो मी धुम्म;
मला आवडतो खेळ खुप्प
पिसाच्या मनोगोऱ्यावर चढायचा
गोल गोल उंच उत्तरेच्या
नि सातव्या मजल्यावरून झुकलेल्या
मारायचा सूर गंगेत दक्षिणेच्या.

त्या दिवशी झाले काय:
भुईगोलाच्या तासाला
तपकिरीची डबी गोल
घरंगळत आली सोमवारी
सह्याद्रीच्या पायथ्याशी.
खेळता खेळता पाय ठेवून
पिंकीच्या हत्तीने केली चपटी
रुपयाच्या गोलासारखी.

एका बाजूला छापा
गोरया गोऱ्या राजाचा,
दुसऱ्या बाजूला काटा
उजाड़ झाल्या सह्याद्रीचा.


त्या दिवशी गलिलीओ आला
तारकांच्या जगातून उल्केवर बसून
भूईगोलावर उतरला नि फुक्कट मेला
सह्याद्रीचा काटा उरात खुपसून.

----
रेमीजियस डिसोजा ( २ - १२ - २००२ )
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 03, 2009

बया पक्ष्याचे घरटे: एक अभ्यास

बया पक्ष्याचे घरटे: एक अभ्यास
नर बया पक्षी मादीला आकर्षित
करण्यासाठी घरटी बांधतो. त्यासाठी प्रथम सुरक्षीत जागा निवडतो. अशी जागा ओढ्याला लागून असलेले बहुधा काटेरी झाड, विहिरीची भिंत असतात. जैवीक तंतुने बनवलेले हे घरटे मजबूत असते. अशा जागी बया पक्ष्यांची एक वसाहतच तयार होते. सारख्याच दिसणारया या घरट्यामध्ये कमालीची विविधता असते.
पक्ष्यात जर एवढी बुद्धीमत्ता आणि निर्मितिक्षमता असते तर माणसामध्ये - अशिक्षित माणसात पण - किती असावी? पण प्रत्यक्षात मात्र वेगळाच अनुभव यतो.
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape