![]() |
रेखाचित्र, रेमी डिसोजा, मुंबई |
मातीचा गोळा माणूस त्यातून केला
नाव त्याचे ठेवले मातीचा पूत.
पावसात त्याला भिजत ठेवला, कुजत ठेवला
ठोकून थोपटून घडवला उनात त्याला करपला.
मातीचा गोळा त्याचा केला एकच प्याला
साठवली पहिल्या धारेची त्यात नशा
मध्यरात्रीच्या नि:शब्द सान्निध्यात.
मातीचा गोळा केली त्याची पणती
वाट त्यात पेटवली मध्यरात्रीच्या
निशब्द सान्निध्यात.
मातीचा माणूस विसाव्या शतकाच्या
अखेरीला
चावूनझ चायलामा राजकारणी लोकांची
पंथास लागलेला.
माणसाची माती उंबरठ्यावर
एकविसाव्या शतकाच्या.
६-३-१९८९
No comments:
Post a Comment