October 12, 2009
मुक्ताफळें - ९
मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल.
झाडांवर लक्षावधी पाने असतात. प्रत्येक पानाच्या शिरा (bar-code by Nature) एकमेवाद्वितीय असतात. तरीत्यांच्यापुढे व्यक्तित्व-पेचप्रसंग (identity- crisis) उद्भवत नाही.
(उद्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. लोक मूर्ख नाहित. कुणालाच बहुमत मिळणार नाही याची खात्रीआहे. मग खरेदी-विक्रीचा बाजार सुरु होईल. निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या माथ्यावर पण त्याची किंमतलिहिलेली असणार, जशी शर्यतीत धावणारे घोडे, IPL चे क्रिकेट खेळाडू, चोर दरोडेखोर वगैरेंच्या डोक्यावर लिहिलेली असते. दरेक निवडणूकीत अशीच निकाल येत आहेत. पण हरघडी प्रांतांच्या व केंद्र सरकारच्या निवडणूकींच्य निकालांपासून कुणीच कसा धडा शिकत नाही? कधी हे तथाकथित पुढारी आपला हेकेखोरपणा सोडून कधी लोकाभिमुख होणार?)
-- रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Labels:
निसर्ग,
मुक्ताफळें,
सृष्टीयोग
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment