मुंबईच्या एका चौपाटीवर
अनेक दर्प, गंध, सुगंध अगणित
खसखस नायलॉनची
किलबिल कुणाची
फडफड पदराची
वारा येतो गर्दी शोधीत
गजबज इथे बजबजपुरी
त्यात तू एक
अन मी एक
मीही एक गर्दी शोधीत
माझे एकटेपण कुरवाळीत गोंजारीत
उबगलेले उच्छ्वास टाकणयासाठी
जागा शोधीत
चौपाटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ---
इथल्या पुळणीतसुध्दां संस्कृतीने घाण करून ठेवली आहे ---
ढुंगण टेकवीन म्हटले तर.
मधूनच बाहूला तंग चोळीचा मृदू स्पर्श
बोटात गुंतवलेली बोटे
एकांत शोधतात
कोपरखळी आडोसा शोधीत
पुराण्या संकेतांचे संवाद
जवळीक करू पाहतात.
इथल्या वाळूत वाकडी पावले बोचत नाहीत
इथे असती संवाद - विसंवाद - वाद सतत
ही एक बजबजपुरी
त्यात तू एक
अन मी एक .
* * * * *
लेखन १९६५
टीप: १. मजा अशी कि चाळीस वर्षांनंतर मुंबईचे वातावरण / पर्यावरण किती सुधारले / किती बिघडले हे नागरिकांनी ठरवायचे. चित्रातील वरळी-सी-लिंक बघायला आकाशात कोण जाणार? सिनेमा - टीवी वरच्या जशा "सेलिब्रिटीज" तसाच हा पूल!! दोनीही नागरिकांच्या खिशाला कात्री लावतात - निष्क्रीय करमणूक करतात. आणि समाजातील एक - दोन टक्के लोकांचे खिसे भरतात.
२. छायाचित्र रेमीजीयस डिसोजा, मुंबई
~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:
Post a Comment