![]() |
संतोष कुमार, मुंबईत एका फुलांच्या दुकानात काम करणारा शिक्षित नोकर,
फावल्या वेळात कलाकुसर करतो. हा त्याचा स्वायत्त अधिकार आहे.
|
संवयींचे आम्ही गुलाम
चालतो, बोलतो, बघतो
दुनिया सारी सवयीने;
अन् रोजची धावाधाव –
फुरसत नाही थांबाया;
पुजा, अर्चा, खाणे, पिणे,
नशा, झिंगणेही संवयीने;
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,
जातपात, वंश, गतकाळ...
मग राही कशाचे भान?
व्यक्तिस्व सदा हरवलेले
स्वातंत्र्यही बाळपणीचे
चालता झुंडीच्या आधारे
अजाणता हातींचे गेलेले
झुंडीत सांडले सगेसोयरे
कसे जोडावे सुटले दुवे?
* * *
व्यक्ति आणि समष्टी व नागरी आवास यांत मानवी मापनश्रेणी (human scale) पुनः प्रस्थापित होणे, विशेषतः आजच्या यंत्रयुगात व नागरी पर्यावरणात अनिवार्य झालेले आहे. यांत्रिकी राहणीने व मायावी वास्तवतेच्या प्रभावाने व्यक्तिचे व समष्टीचे जीवन ढवळून निघालेय, अस्तव्यस्त झालेय. त्यात वेग व घाई वाढलीय. ज्ञान व माहिती यांचा संग्रह वाढला पण त्यांचा रवंथ करायला वेळ नाही. परिणामतः समाजाच्या सर्व स्तरांवर सर्जनशीलतेची गुणवत्ता आता किती राहिलीय याचीपण शंकाच आहे. विधायक सर्जनशीलता सर्वांतच असते. ही एकल्या-दुकल्याची मक्तेदारी नाही. अनेकात ती सुप्त असते. तिला जागी करणे ही खरे पाहता समष्टिची जबाबदारी, इतर कोणत्याही संस्थांची नव्हे! पण लक्षात कोण घेणार?
© Remigius de Souza. All rights reserved.|

I can follow Marathi. But this comment place has no Devanagari script facility!
ReplyDeleteI’m fascinated by astringent taste of in writings here, which is unusual!!! While everyone goes for “namkin – tikha – khatta – meetha, this is something.
@Anonymous आंतरजालाशी संपर्क असणारे सर्वच अन्य-भाषिक – वाचक व ब्लॉगलेखक – इंग्रजी जाणतात. मी लेखनात शक्यतो विषयाला अनुसरून पारिभाषिक शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो. आणि हे विषय कांही वेळा आजच्या काळाला युक्त असले तरी अ-पारंपरिक असतात. हे खरं ! अन् माझे ब्लॉग पाहणारे वाचक अधिक असावेत असं मला वाटते. :-) आपले स्वागत आहे.
ReplyDeleteअनामिका, मनःपूर्वक आभार! परतभेट जरूर द्यावी! :-)