September 10, 2013

भग्नमूर्ती

सृष्टीयोग 

 
मातृदेवता

सुमारे तीस हजार वर्षांपुर्वीची मूर्ती, पाश्चिमात्यांनी तिला नाव दिले 'व्हिनस'. मी नाव  दिले 'मातृदेवता. आदिवासी जमातीत अजूनही योनी-पूजा अस्तित्वात आहे.

 

१. भग्नमूर्ती


कल्पना, विचार, तर्क, तर्काच्या पलिकडे... युरेकाऽऽऽ ।
वर्षांमागून वर्षें गेली, दशके गेली; एक ठिणगी अनेक घटनांच्या राखेच्या थराखाली जीवंत राहिली, उलटसुलट सतत येणार्‌या चक्रीवादळांत, झंझावातांत तगून राहिली. 


सर्जनाचा कस लागतो आपल्याच लेखी. लोकप्रवाद मागे पडतात. मळलेल्या वाटा संपतात. पुढचे मार्ग कुंठीत होतात. मागे वाळवंटे खंडारे भगदाडे पन्नास शतकांची. समोर खोल खाई मृत्युची. त्यापल्याड हिरवाई, छलांगाच्या अंतरावर.

आता माघारा फिरलास, गड्या, तर वेसण कायमची. आणि षंढाचे जीणे. कुणाचे काही जात नाही. प्राण एकवटून मार छलांग!

२. अवतरण : ' भग्नमूर्ती ' (मुक्तछंद)


निसर्गस्वभाव, निसर्ग शक्ति, ।
निसर्गांत जें जें आहे तें सारें मानवांतहि ।
आणिक अधिक त्याहून आहे ।
निसर्गाची जी अंतिम सीमा ।
मनुजकार्याचा आरंभ तेथे ।
तेथून विकास मानवतेचा ।
तेथून पुढे जाण्यासाठीच धडपड त्याची ।
तेंच उद्दिष्ट साधायासाठी ।
त्याची कला शास्त्रें विद्या तत्त्वज्ञान ।
धर्म आचार विचार आणि ।
नीतिनियम. ।
(टीप : 
हे अवतरण काव्यशास्त्राच्या एका पुस्तकात मिळाले. लेखकाने कवीचे नाव दिलेले नाही. अशाच अनेक अवतरणांचे संदर्भ / नावे दिलेली नाहीत. मुक्तछंदात लिहिलेले हे मराठीतले पहिले दीर्घकाव्य आहे असा उल्लेख मात्र आहे. वाचकांना माहित असल्यास अवश्य कळवावे.)

' भग्नमूर्ती ' चे वरील अवतरण वाचून सुचलेले विचार :


 कवीची निसर्गासंबंधीची कल्पना बालसदृश किंवा बालिशपण नाहिय. आणि आधुनिकपण नाहीय. निसर्गाला एवढे तुच्छ लेखून कोणाचाच निभाव लागणार नाही हे नक्कीच. पश्चिमेचा प्रभाव कवीवर नक्कीच असावा!
 
प्रागैतिहासिक काळातील मानवाने, जेव्हा सुसंस्कृत समाज अस्तित्वात नव्हते, कधीही या कवीप्रमाणे विचार केला नसता. त्या मानवांचा निसर्गाशी सुसंवाद जुळलेला होता यात शंकाच नाही. याचा अर्थ तेव्हा कला आणि विज्ञान अस्तित्वात नव्हते असा नाही. आतासारखे ते एकमेकापासून वेगळे नव्हते.


आजही तथाकथित अश्मयुगात राहणारे मानव भूतलावर आहेत.
अथवा भविष्यात नागरी संस्कृतिंचा विनाश झाल्यानंतरचे मानवपण असा विचार करण्याचे धारिष्ट्यपण करणार नाहीत.


३. भग्नमूर्ती 


प्राथमिक शाळेत शिकताना मला भातशेती-शाकशेती, सूत कताई-विणाई, मातीची घरबांधणी - अन्न, वस्त्र, निवारा - या मूलभूत गरजा भागवण्याचे शिक्षणपण गावले. तसेच परिसरातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांना जवळून बघायची संधीपण मिळाली (घेतली). त्यावेळी मी 'मानववंशशास्त्र' हा शब्द ऐकलापण नव्हता.
इथूनच माझा लोकजीवन बघायचा छंद सुरू झाला. आणि छंदात कविता रचायचा छंदपण ! कालांतराने माझ्या कवितेतील छंद, वृत्त, जाति, अलंकार आयुष्याच्या पायवाटेवर कधी हरवले समजलेच नाही. आयुष्यात एक विद्रोह सुरू झाला.


४. 'भग्नमूर्ती'


निरपेक्ष आयुष्य जगण्याचा छंद आला. जगणेच काव्य झाले, छंद झाले, मुक्त-छंद झाले. मीच कवी आणि माझा मीच रसिक !
 

एक जाणीव आकारत गेली : 'जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे; सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने व्यापारउदीम, अर्थसंस्था, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे'.

५. 'भग्नमूर्ती'


भ्रमनिरासाच्या प्रक्रियेतून जाताना एक रचना, "अशी एक कविता : एक कोडे" आकारली. तिला अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव यांनी गायली. त्यावर काही नमुनेदार प्रतिक्रिया आल्या. या वाचनीय आहेत. पण कोडे मात्र अनुत्तरित राहिले.
चवाठ्यावरच्या चर्चेत कधी कधी मूलभूत मुद्दा बाजूला होतो. आणि शब्दच्छल राहातो.
दुवा :

 गायक : अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

कवी:रेमी डिसोजा 


टीप :
१. हल्लीच लिओनार्द दा विंची " कलावंत कि वैज्ञानिक ? " असा वाद विलायतेत झाला.
दुवा : Is Leonardo da Vinci a great artist or a great scientist?
 भरल्यापोटी असे वाद घालणे हा पंडितांचा उद्योगाच आहे म्हणा ना !
२. निसर्गाची एक झलक : शरीरधर्म  BODY DHARMA
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

8 comments:

  1. 'भग्नमूर्ती' चे हे संकलन आणि प्रकटन दोन्ही आवडले.

    रेमी योनी-पूजेचा सखोल शोध रा.चिं.ढेरे यांनी त्यांच्या लज्जागौरी या पुस्तकांत घेतला आहे. अभ्यास करुन लिहिलेले हे पुस्तक सुंदर आहे. अतिशय वाचनीय.

    बाकी दीर्घकवितांवर रविकिरण मंडळाने काही काम केले होते त्याची ही माहिती येथे मिळेल -
    http://marathivishwakosh.in/khandas/khand14/index.php?option=com_content&view=article&id=10234

    "
    ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
    ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
    ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
    वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?
    "
    खूप आवडली कविता :)

    ReplyDelete
    Replies
    1. सागर, रा. चिं. ढेरे यांनी उल्लेख केलेल्या 'लज्जागौरी' या शिल्पाचा फोटो मी पाहिलाय, पुस्तक वाचले नाही. जरूर शोधेन. रविकिरण मंडळाचा दुवा दिल्याबद्दल हि अत्यंत आभारी ! काय करू ? आता मला फारसा वेळ नाही. त्यामुळे जे लिहिलेय त्याचे संकलन करण्यातच वेळ जातो.

      Delete
    2. रेमी लज्जागौरी या पुस्तकाची झलक पुढे पहावयास मिळेल. यातील अनुक्रमणिका पाहूनच तुला या पुस्तकाचे महत्त्व लक्षात येईन.

      http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=4692021242566156607&PreviewType=books

      वेळेचे गणित जुळवणे हे आजकाल सर्वांनाच कठीण जाते आहे. मी ही त्याला अपवाद नाहियेच. पण जसे जमेल तसे करत रहा. रोज थोडा का होईना वेळ दिला की हळू हळू हवे ते लेखन प्रत्यक्षात अवतरते.
      मी ही सध्या हेच सुरु केले आहे. १ तास वाचन आणि २० मिनिटे काही ना काही लेखन. असे केले की मनाला आनंद मिळतो.

      Delete
    3. सागर, तंतोतंत मीपण हेच करतोय. मात्र वाचनात सद्यस्थिती वाचायला देतो. विचार करायला जास्तीत जास्त वेळ देतो. आणि लिहायला निवडक वेळ! कारण बरेच संदर्भ येतात.
      लज्जागौरी पहिली. मुखपृष्ठावरील चित्राचे वारली बायकांनी काढलेल्या चित्रांशी बरेच साम्य आहे. आता मात्र हे पुस्तक वाचायला हवेच. धन्यवाद.
      मातृदेवता निश्चितच अतिप्राचीन आहे यात शंकाच नाही.


      Delete
  2. खूप आवडली कविता

    ReplyDelete
    Replies
    1. nk धन्यवाद ! पुन्हा भेटा !!
      मलाही तुमचा ब्लॉग आवडला.

      Delete
  3. Hi
    I am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!

    ReplyDelete
  4. Thanks for your visit. Please do visit again.

    ReplyDelete