November 28, 2011
November 25, 2011
मी अण्णा हजारे नाही: डायरीचे पान
मी अण्णा हजारे नाही. लोकपाल विधेयक किंवा जन लोकपाल विधेयक, एकाचाही मसुदा मी वाचलेला नाही. आता पर्यंत या विषयावर झालेल्या गदारोळांत एवढी ऊर्जा वाया गेलेली आहे! पण वर्तमानपत्राचे एक पान या विधेयकांचा मसुदा प्रसिद्ध करण्यासाठी वापरले नाही; ना सरकारने ना चळवळ्यानी. असं कांही फुकटात वाचायला मिळाले असते तर त्यावर मी माझा अभिप्राय अवश्य लिहिला असता.
कोणतेही विधेयक पास होवो. हितसंबंधी लोक त्याचा बोर्या वाजवणार, ते हायजैक करणार. मग ते राजकारणी असतील, उद्योजक असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा सफेद कालरवाले गुंड असतील. जेथे कायदा करणारेच कायदा धाब्यावर बसवतात म्हणून आज तुरुंगांत बसवले आहेत, हे आपण पाहतोच. तेथे इतरांचे काय?
अण्णानं जर लोकसहभागाने गांवांना हरीत करण्याची मोहिम चालू ठेवली असती, आजुबाजूच्या चार गांवांत नेली असती तर वेगळा इतिहास घडला असता. हे 'हरित गांव' विधायक काम आहे, पण एवढे एक अण्णाचं गांव पुरेसे नाही. त्यानं काय आकाशाला ठिगळ लावणार? नाही तरी आम्हाला एका पिसाने मोर व्हायला आवडते.
[२१:५९, शनिवार १७-०९-२०११]
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Labels:
लोकशाही,
स्फुट-लेखन
November 22, 2011
घायपात बहरे मुंबई शहरी
घायपात बहरे मुंबई शहरी
अलभ्य लाभ ! मुंबईत रस्त्याच्या चौकात हे वानस बघायला मिळणे दुर्मिळ, आणि शहरातपण कुठेही. कुणी समंजस कलावंताने त्याचा उपयोग उपवन वानस म्हणून केला होता. तोही सुबक रीतिने : वहानवाहक व पादचारी यांच्या दृष्टीला अडथळा न आणता.
आणि मी पाहिले माझ्याशिवाय तेथे आणखीही कोणी होते. त्या होत्या छोट्या मधमाशा, घरमाशीपेक्षा लहान. मी फोटो घेत होतो, त्या मध घेत होत्या.
घायपात त्याच्या मजबूत तंतूसाठी प्रसिद्ध आहे. आणि खेडूत त्याचा यथायोग्य उपयोग करतात. भारताच्या जैविविधतेत तंतू देणारी अनेक वानसे आहेत : माड, कपास, अंबाडी, भेंड. शेवरी, केळ, अननस, ताग इत्यादि.
घायपाताच्या पानांतून तंतू मिळतात. तर अंबाडीच्या फाद्यांतून ६-८ फूट लांब तंतू काढता येतात. शेतकरी, कोळी, आदिवासी इ. लोक यांच्यातून मासेमारीची जाळी विणतात.
हे दोर सिंथेटिक दोरापेक्षा अधिक टिकाऊ असतात. हीं जाळीं जेवढी पाण्यात भिजतात तेवढी अधिक मजबूत होतात. या उलट सिंथेटिक दोर व जाळीं कोरडी राहिली कि कांही दिवसांनी आपोआप विशीर्ण होत जातात.
या चित्रातील घायपात बंदिस्त जागेत वाढवलेली उपरी वानसे आहेत. यांचा फुलोरा पाहिला कीं कुणाच्याही ध्यानात येईल हीं झाडें बाहेरून दिलेल्या खत-पाण्यावर पोसलेलीं आहेत. त्यांना जमिनीतून काहीही पोषण मिळत नाही. थोडक्यात हीं परावलंबी झाडें आहेत.
या पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर परिणाम झाल्यावाचून कसा राहिल ? नैसर्गिक मोकळ्या अवस्थेत यांची पाने पांच फूटाहून अधिक वाढली असतीं.
पिंजर्यातले पक्षी, कांचेच्या टांकीतले मासे, कुंडीत लावलेलीं झाडें आणि मुंबईच्या फूटपाथवर लावलेली शोभेची झाडे यांचे पण असेच होते.
मग आपलें - शहरवासियांचें - काय होत असेल बरें? हीं शहरें आमचें व्यक्तिस्व सर्वार्थाने – शारीरिक, मानसिक (व आत्मिक) – बहरायला, फुलायला कारणभूत होतात का?
असे हे प्रश्न माझे मीच स्वतःला विचारायचे, आणि उत्तरही मीच शोधायचे. गंमत अशी : या प्रश्नांतच त्यांचे उत्तर आहे !
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
![]() |
| फोटो १- घायपात, मुंबई |
आणि मी पाहिले माझ्याशिवाय तेथे आणखीही कोणी होते. त्या होत्या छोट्या मधमाशा, घरमाशीपेक्षा लहान. मी फोटो घेत होतो, त्या मध घेत होत्या.
घायपात त्याच्या मजबूत तंतूसाठी प्रसिद्ध आहे. आणि खेडूत त्याचा यथायोग्य उपयोग करतात. भारताच्या जैविविधतेत तंतू देणारी अनेक वानसे आहेत : माड, कपास, अंबाडी, भेंड. शेवरी, केळ, अननस, ताग इत्यादि.
घायपाताच्या पानांतून तंतू मिळतात. तर अंबाडीच्या फाद्यांतून ६-८ फूट लांब तंतू काढता येतात. शेतकरी, कोळी, आदिवासी इ. लोक यांच्यातून मासेमारीची जाळी विणतात.
हे दोर सिंथेटिक दोरापेक्षा अधिक टिकाऊ असतात. हीं जाळीं जेवढी पाण्यात भिजतात तेवढी अधिक मजबूत होतात. या उलट सिंथेटिक दोर व जाळीं कोरडी राहिली कि कांही दिवसांनी आपोआप विशीर्ण होत जातात.
![]() |
| फोटो २- घायापाताचा फुलोरा, मुंबई |
या पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर परिणाम झाल्यावाचून कसा राहिल ? नैसर्गिक मोकळ्या अवस्थेत यांची पाने पांच फूटाहून अधिक वाढली असतीं.
पिंजर्यातले पक्षी, कांचेच्या टांकीतले मासे, कुंडीत लावलेलीं झाडें आणि मुंबईच्या फूटपाथवर लावलेली शोभेची झाडे यांचे पण असेच होते.
मग आपलें - शहरवासियांचें - काय होत असेल बरें? हीं शहरें आमचें व्यक्तिस्व सर्वार्थाने – शारीरिक, मानसिक (व आत्मिक) – बहरायला, फुलायला कारणभूत होतात का?
असे हे प्रश्न माझे मीच स्वतःला विचारायचे, आणि उत्तरही मीच शोधायचे. गंमत अशी : या प्रश्नांतच त्यांचे उत्तर आहे !
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Labels:
जैवविविधता,
सृष्टी
November 18, 2011
रेमीची मुक्ताफळे -१६ : पर्यावरण
सृष्टीच्या कार्यात "पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा" यांचे स्वतंत्र खातेवाटप नाही; ते परस्परसंबंधी व अधिव्यापी घटक असतात. सृष्टीच्या निर्मितीत काटोकाट मितव्यय असतो आणि त्या वस्तूचे – जैव अथवा अजैव – आयुष्य संपल्यावर अवशिष्टाचे पुनश्चक्रण (recycling) होते.
आधुनिक औद्योगिक संस्कृती मात्र हा पाठ शिकली नाही.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
November 15, 2011
रेमीची मुक्ताफळे-१५
Labels:
Image,
जीवन शैली,
शरीर-धर्मं,
सृष्टीयोग
Subscribe to:
Posts (Atom)