पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला उधाण येत राहील का?
जन्माला येण्यापुर्वीच आरपारच्या ग्रहानी
भवितव्य लिहून ठेवले तेव्हा
एक जीव जन्माला आला
एक वेडी पावसात भिजत
रस्त्याच्या कडेला फाटक्या लक्ताराच्या
चिंध्या करण्यात मग्न आहे
तरी चंद्र आपला फिरतच आहे
स्वत:भोवती आणि पृथिवी भोवती
पृथिवी ही तशीच...
बडोदे.
२६-७-६९
For more poems visit Beehive In Godwana
© Remigius de Souza.All rights reserved.
माणूस चंद्रावर जावून किती वर्षे लोटली... आमचा खटारा एका बैलावर चालतो आहे - चालतो आहे - चालतो आहे... काय खवट कविता लिहिता हो आपण?
ReplyDeleteअनामिका! वातावरण - पर्यावरण - नसले की कविता खंवट व्हायचीच, नाही का? धन्यवाद! परत भेट अवश्य द्या.
Deleteअनामिका! वातावरण - पर्यावरण - "नासले" की कविता खंवट व्हायचीच, नाही का? धन्यवाद! परत भेट अवश्य द्या.
ReplyDelete