December 22, 2008

माझी लक्तरांची पुंजी

बाभळीच्या तप्त पिवळ्या
काटेरी सावळ्या
ओरखाडतात
माझी लक्तरांची पुंजी
राखलेली शतकांच्या
वाटचालीत
***
(भालप्रदेश, गुजरात )

लोथलच्या (जेथे इंडस - सिंधू - संस्कृतीचे अवशेष आहेत ) परिसरात अनेक वर्षे भटकताना हे जाणवले: तथाकथित प्रगत विसाव्या शतकात येथील भूमीचे पुनरुज्जीवन झाले नाही।

एक गोष्ट ऐकलीय: रोम जळत असताना रोम साम्राज्याचा बादशहा म्हणे फिडल वाजवत बसला होता । बलाढ्य रोम साम्राज्य आणि संस्कृति त्यानंतर लवकरच लोप पावली।

पुरातत्वशास्त्रात मला जरी रस असला तरी मी लोथल बघायला कधीच गेलो नाही। उगाच इतिहासाची प्रौढी मिरवण्यात काय तथ्य?

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

4 comments:

  1. मला कळलंच नाही..

    ReplyDelete
  2. हर्षदा,
    आपल्या शेरयाबद्दल मी मनापासून आभारी. नेमकं काय नाही कळलं?

    पण याच अंदाजाने मी माझ्याच कवितेवर टीप लिहिली होती. क्षमस्व.
    -- रेमी

    ReplyDelete
  3. Please see my free English translation of this poem on my other blog "Archetypes India" and suggest any corrections.

    ReplyDelete
  4. धन्यवाद रेमी... मी तूमचा इग्रजी blog वाचला....या संदर्भात..

    मनापासून आभारी.

    ReplyDelete