भुईगोलाचा पाठ
"पृथ्वीचा आकार कसा बरे बाळ",
सवाल गोऱ्या दिप्टी साहेबाचा.
"साहेब पृथ्वी आहे गोल गोल
सोमवारी - उरले दिवस चौकोनी
तपकिरीच्या डबीसारखी मास्तरांच्या. "
खर्रँ खर्रं सांगते पिंकी.
भुईगोलाचा चुकवून तास
आवडते मला खेळायास.
पोरे खेळतात घसरगुंडी
तालीम रंगीत आईबाबांच्या
प्राक्तानाची पुन्हा पुन्हा
रोजच्या रोज नियमाने.
तपकिरीचा भरण्यात बार
तल्लीन मास्तरांची मिटली नजर
चुकवून ठोकतो मी धुम्म;
मला आवडतो खेळ खुप्प
पिसाच्या मनोगोऱ्यावर चढायचा
गोल गोल उंच उत्तरेच्या
नि सातव्या मजल्यावरून झुकलेल्या
मारायचा सूर गंगेत दक्षिणेच्या.
त्या दिवशी झाले काय:
भुईगोलाच्या तासाला
तपकिरीची डबी गोल
घरंगळत आली सोमवारी
सह्याद्रीच्या पायथ्याशी.
खेळता खेळता पाय ठेवून
पिंकीच्या हत्तीने केली चपटी
रुपयाच्या गोलासारखी.
एका बाजूला छापा
गोरया गोऱ्या राजाचा,
दुसऱ्या बाजूला काटा
उजाड़ झाल्या सह्याद्रीचा.
त्या दिवशी गलिलीओ आला
तारकांच्या जगातून उल्केवर बसून
भूईगोलावर उतरला नि फुक्कट मेला
सह्याद्रीचा काटा उरात खुपसून.
----
रेमीजियस डिसोजा ( २ - १२ - २००२ )
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
गोरा साहेब दीडशे वर्षे शिकवत गेला आणि आम्ही पांढरपेशे शिकत गेलो.
ReplyDeleteतेव्हा होते गाणारे भाट, "भो पंचम जोर्ज " ... आता ते आहेत अनेक पटीनी वाढलेले.
कूठून कूठे पोहोचलात??
ReplyDeleteह्म्मं.. काही लोकांची प्रतिमा थक्क करून सोडते..
हर्षदा,
ReplyDeleteपृथ्वी सतत फिरत असते: स्वत:भोवती आणि सूर्याभोवती. तसेच माझ्या पायावर पण
चक्र आहे. काय करणार?
-- रेमी