एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)
तीस दिवसांचे ७२० तास तो पाळीव प्राण्याचे जीवन जगतोय. भिंतीवर टांगलेल्या दिनदार्शिकेची पाने बदलत असतात, व दिनदर्शिका पण. तरीही याचे आयुष्य असेच चाललेय.
कधी तो गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा असतो, तर कधी चुलीच्या उबेस बसलेलं मांजर...
कधी तो होतो बळीचा बकरा; कधी तो असतो ओझे वाहणारा टोणगा; तर कधी गोठ्यात बांधलेली दुभती गाय.
कधी तो असतो गळ्यात दोरी बांधलेला माकड -- त्याच दोरीच्या इशारयावर कोलांट्या उड्या मारणारा... तेच त्याचे काम.
कधी तो असतो पिंजरयातला पोपट; ऐकत असतो मुक्ताफळे:
"पोपटा, पोपटा, खा ना जरा पेरूची फोड,
आणि बोल माझ्याशी गोड गोड."
कधी तो असतो घाण्याला बांधलेला बैलोबा, फिरत असतो वर्तुळात, पण त्याच्या जूं वाहाणारयां खांद्यावरच्या जखमेवर कोणी कधी तेलाची घडी घालत नाही.
कधी तो असतो राजेशाही बगीला बांधलेला, डोळ्याना झडपा लावलेला उमदा घोडा -- माहीत नसते त्याला तो कुठे कशासाठी सतत धावत असतो.
शेवटी, आजच्या आधुनिक सुधारलेल्या सुसंस्कृत समाजात परावलंबी आयुष्य काढायचे असले तर अशा या सर्व भूमिका नकोत का निभावायला? इथे परस्परावलंबी समष्टीला कुठे थारा?
रेमीजीयस डिसोजा । मुंबई
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Hi Remi!!
ReplyDeletePassing you the 'Kho'
Read more details at:
http://karadyaachhata.blogspot.in/2012/07/blog-post.html
http://samvedg.blogspot.in/2012/06/blog-post.html
हर्षदा, तुझा 'खो' कामी आला. दोन्ही दुवे वाचले. मी हल्ली फारशा कथा-कादंबऱ्या वाचत नाही. आजूबाजूची माणसे मला वाटतात एकेक जण 'महाकाव्य' आहे. त्यातच मी दंग असतो. या कथा-कादंबऱ्या जेथे सुरू व्हायला पाहिजेत तेथे संपतात. आणि करमणुकीसाठी तर वाचीत नाही की लिहित पण नाही.
ReplyDeleteमला माहित असलेला एक अपवाद : शरत्चंद्र चटर्जी, निर्विवाद. शाळेत असताना वाचलेल्या कादंबऱ्या हल्ली पुन: वाचली. नव्वद वर्षानंतर आजही त्या नवीन वाटतात. त्यातली एक 'भैरवी'. मामांनी भाषांतर केलेय.
फिर मिलबो!