आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर
माहित झाले यात माझ्या सुखाची ग्यारंटी आहे.
टळली नव्हती दुपार तरी
डामरी रस्ते आपलेसे वाटले —
रामबोलोच्या नादात.
काळ्या दुपारी काजवे कवडसे
हरवणाऱ्या शुध्दीचे
पराकाष्टा करतात वाट उजवायची
— रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
No comments:
Post a Comment