॥सृष्टी महात्म्य॥
किती गुण गाऊ मी सृष्टीचे! तिची लीला अगाध! तिचे गूढ अगाध! तिचे औदार्य अपार! तिचा न्याय निष्ठूर तसाच निस्पृह! अवतार, प्रेषित, संतमहात्मे, राजेरजवाडे, चोरदरवडेखोर, किडेमुंग्या, कीटक, पशूपक्षी, तृणे, झाडेवेली सर्व तिला समान. पर्वतराई, महासागर, महाभूखंड, गृहतारे पण अपवाद नाहीत.
सृष्टीला संतुष्ट करायला पूजापाठ, भजनकीर्तन, जपजाप्य, मुहूर्त-शुभाशुभ वेळ... कशाचीही गरज नाही. फक्त तिच्या नियमाचे पालन करायचे. अति खाल्ल्याने अपचन / अतिसार होणार हे अटळ आहे. गंमत अशी की सृष्टी आपल्या बाहेर तशीच आतही आहे. आणि ती काही वेगळी नाही. तीच मूलद्रव्ये. पण हे कधी आईबाबानी, मास्तरांनी की धर्मोपदेशाकांनी सांगितले नाही. नाही वैज्ञानिकानी सांगितले. ते बिचारे हुकुमाचे ताबेदार! ते नवीन नवीन मशिने, शस्त्रास्त्रें, अण्वास्त्रें, संगणके इत्यादि शोधण्यात गुंतलेले आहेत. अर्वाचीन - आधुनिक युगातले सुधारलेले गुलामच म्हणाना.

२.
विज्ञानाने आधुनिक युगात केवढी तरी प्रगति केलीय. रोज नवनव्या बातम्या ऐकायला मिळतात. सृष्टीचे एक रहस्य उलगडते. त्याहून अनेक पटीने सृष्टी रहस्यमय होत जाते. त्याहूनही मजेची गोष्ट अशी, माणसाला आपलेच शरिर (आणि मन) तरी पूर्णतः कुठे माहित झालेय?
संशोधनासाठी विज्ञानाने नवीन भाषा व यंत्रादि साधने तयार केली, जी माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत, पूर्वी जशी देवभाषा संस्कृत होती तशी. (जर शूद्रांनी त्या भाषेचा उच्चार केला तर तिला विटाळ होत असे. आजही ते चित्र बदललेले नाही. तर अधिक सोवळे झालेय; त्याला 'Intellectual Property Rights' असे नाव आहे.) आपण वैज्ञानिकांवर भाविकपणे विश्वास ठेवायचा एवढेच आपल्या हाती राहते. वैज्ञानिकाना जर विवेक नसेल तर आपण विषमतेच्या आगीत होरपळायचे -- मग ती आग अण्वास्त्रांची असो, कि आर्थिक-सामाजिक-राजकीय, किवा पर्यावरण-पारिस्थितिकी-ऊर्जेची असो. याचे साधे कारण विज्ञान तसेच ज्ञानाच्या इतर शाखा काळाबरोबर लोकाभिमुख वा सार्वत्रिक झालेल्या नाहीत. अशी विषमता नागरी संस्कृतिंत सत्तेला पूरक व पायाभूत असते. किंबहुना 'सत्तेचे केंद्रीकरण' हे नागरी समाजांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

3.
अशा सत्तापिपासूंनी या ना त्या कारणांनी पृथ्वीवरच्या सर्व जमिनीचे वाळवंट केले तरी सृष्टीला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. कदाचित सहारा वाळवंटातील पिग्मी आदीवासी जमात सोडून इतर सारे मानवप्राणी नष्ट होतील. कदाचित कल्पित स्वर्गातील काल्पनिक देव हळहळतील. पण सृष्टीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही.
सृष्टीचा आद्य नियम - सृष्टी सर्व सजीव योनीँना, अतिसूक्ष्म जीवाणू ते वनस्पती, व मानवासह सर्व प्राणीमात्राला, जगण्याची सुयोग्य साधने, सक्षमता व स्वायत्तता देते. या नियमात कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. ही सक्षमता अथवा कार्यक्षमता अशी: "श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन" होत. ही पंच-कार्यें कोणत्याही व्यक्तिच्या वा संस्थेच्या -- ना राजसंस्था, ना धर्मसंस्था -- अखत्यारात येत नाही. ज्यानी असा हस्तक्षेप इतिहासकाळापासून केला ते सारेच सृष्टीचे व जीवमात्राचे घोर अपराधी आहेत. त्यांचा निवाडा करायला सृष्टी सर्वतोपरी समर्थ आहे. ते सारे काळाच्या प्रवाहात वाहून गेले.
४.
सृष्टी समजून घ्यायची तर तिच्याशी अंतर्बाह्य नियमित संपर्क ठेवायला हवा. अर्थात हा स्वतःपासून सुरू होतो, तो पण आपल्या शरिर व मन यापासून. आपले सर्व अवयव - नाड्या, हृदय, फुफ्फुसे, यकृत इ. - सहजधर्माने चालतात; ते आमच्या मर्जीने चालत नाहीत. लहान बालकांना याची गरज लागत नाही. कारण तीं निसर्गतः सहजधर्माचे किंवा सृष्टीच्या धर्माचे पालन करतात. मात्र आपण - पालक, कुटुंब व समाज - त्याना गर्भधारणेपासून अनेक निमित्तांनी सहजधर्मापासून जाणता-अजाणता दूर करीत असतो. आमच्या अनेक संतांनी अनेकदा सहजधर्माचा पाठपुरावा केला, पण कधी ध्यानातच आले नाही! मुले स्वाभाविकतः सृष्टीयोगाची साधना करतात.
सृष्टीयोगाच्या साधनेत आपणच आपले गुरू! यात कोणतेही विधी नाहीत. आजच्या शहरी धकाधकीत स्वतःसाठी वेळ काढणे फार कठिण झाले आहे. चित्त विचलित करणारी किंवा आपल्या मोकळ्या वेळेचा कबजा घेणारी आमिषे आकर्षणे अमाप असतात. आपल्या शरिर व मनाचे व्यवहार लक्षपूर्वक निरखणे खरोखरच मनोरंजक असते.फक्त एकवार अनुभवायला हवे.
५
सृष्टीने सर्व जीवमात्राला पाच कार्यक्षमता दिलेल्या आहेत: "श्रम, विश्राम, स्वाथ्य, अध्ययन व प्रजनन" (दुवा: Work-Leisure-Health-Learning-Propagation) ही स्वायत्त कार्ये प्रत्येक योनीच्या संरचनेला अनुरूप आहेत.
पण इतिहास काळापासून नागरी समाजांतील राजसत्ता व धर्मसंस्था यांनी चढत्या भाजणीने व्यक्तिच्या व समष्टीच्या जीवनात या कार्यांवर कमी अधिक प्रमाणात कबजा केला. आता तर प्रगति व सुधारणा यांच्या नावाखाली या सर्वच कार्यांवर नव्या सत्ताधिशानी कबजा घेतलेला आहे.
या सत्ता आपल्याला सर्कशीतल्या जनावरासारखे वागवतात. आपण मुक्तपणे गाणे नाचणे कधीच विसरलो. आता आपण बॉलीवुडच्या तालावर गातो. मात्र पाच हजार वर्षांच्या सवयीने आपल्याला हेच सत्य आहे असे वाटते. या सत्तेच्या राजकारणातून सुटका करून घ्यायची असेल तर ती व्यक्तिगत, कौटुंबिक व 'जमाती'च्या (community) पातळीवरच होऊ शकते. कोणतीही संस्था वा संघटणा हे करू शकणार नाही .

![]() |
शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास |

* * *
उद्धरण :
प्राण्यात 'जाणीव' । चैतन्य असते
वर्तन घडते । त्यातूनही;
तरी जगातील । सर्व व्यवहार
होती नियमानुर । सृष्टीच्याच.
कुणा सृष्टीकर्त्या । ईश्वराची नाही
जरूरीच काही । त्यांच्यासाठी.
वर्तन घडते । त्यातूनही;
तरी जगातील । सर्व व्यवहार
होती नियमानुर । सृष्टीच्याच.
कुणा सृष्टीकर्त्या । ईश्वराची नाही
जरूरीच काही । त्यांच्यासाठी.
(विंदा करंदीकर, चार्वाकदर्शन, "अष्टदर्शने", पॉप्युलर प्रकाशन, २००३, पृष्ठ पृ. ७७ )
टीप: प्रतिमा: "शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास" - संदर्भ: इंटर्नेट, हे चित्र रद्दीत मिळाले. याचे मालकी हक्क New Scientist या विज्ञान साप्ताहिकाचे आहेत/असावेत.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
मानवाची सहज प्रवृत्ती आणि सृष्टीचे नियम यात काही अंतर आहे का? - असा प्रश्न खर तर मला नेहमी पडतो. अन्यथा अनेक चांगल्या गोष्टी 'लोकाभिमुख' न होण्याच काय कारण? व्यासांना पण 'कोणी माझे ऐकत नाही - मी त्यांच्या हिताचे सांगत असूनही' असा उद्वेग वाटला होता असे एके ठिकाणी वाचल्याचे आठवते - संदर्भ आठवत नाही त्यामुळे चूकही असेऊ शकते या स्मरणात!
ReplyDeleteआपल्या विचारांची कंपने अवकाशात विरणार नाहीत, तर पसरत जातील असा मला विश्वास आहे.
ReplyDeleteएक गोष्ट कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न मी करतो: कमीत कमी शब्दात आशय व्यक्त व्हावा. सहज धर्म सर्व जीवमात्रात तसेच अजैव वस्तुमात्रात आहे.
आजचा शहरी समाज एवढा यांत्रिकी झालाय की कुणाला थांबायला वेळ नाही. पण तसंच काही राहणार नाही. ऋतुचक्र चालूच राहणार.