'एक तीळ सात जणात वाटून खावा'
ही म्हण मराठी अस्मितेला सामाजिक बांधिलकीची अनाहूतपणे जाणीव देते. किती हृद्य परंपरा! विषेशतः संक्रमण काळी हे फारच जाणवते. ![]() |
Winter in Mumbai : मुंबईत शिशिर ऋतू |
इंडियात सहा ऋतू आहेत. तर चीनमध्ये २४ ऋतू ओळखले जातात; तेथे दर पंधरवड्याला ऋतू बदलतो: हा संवेदनशील निरिक्षणाचा निष्कर्ष. ध्रुवीय प्रदेशांत सहा महिने दिवस (की संध्या?) - सहा महिने रात्र! सृष्टीचा असा हा सतत चालणारा चलत्चित्रपट! नित्य नवा! सृजनशीलांचे - व्यक्ति व समष्टीचे - कधीही न आटणारे हे स्फूर्तीचे संपन्न भांडार (No copyright attached here or price-tag)!
संक्रातिच्या दिवशी वसंत ऋतु नवा उल्हास घेऊन येणार याची आशा पालवते.
असे वसंत आपल्या आयुष्यात पण आले तर किती मजा येईल! पण त्यासाठी मानवाला वानस व्हावे लागेल आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार सोडून. पण ते कसे शक्य आहे?
खरं तर 'प्रथम जगतात' सर्व ब्लॉगवाल्यांचा हा अंतरिक्षाला जोडणारा दिवस खास असायला हवा.
नकळत, या तीळ वाटायच्या देशी परंपरेची आठवण देणारा हा दिवस त्यानी साजरा केला नाही तरी, ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली करून, हे संक्रमणाचा दिवस रोजच साजरा करतात नाही का! आणि इंटरनेटवर इतरही अनेक : Wikipedia, Firefox, Open Office, WikiLeaks इ. त्यातलेच नाहीत का? हे सारेच लोकशाहीचा खडतर मार्ग सुकर करायला हातभार नाही का लावित?
जेवढी भौतिक प्रगति अधिक तेवढी लोकशाहीची वाट ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते अधिक बिकट करणार यात शंकाच नाही.
एका जगात अनेक 'जगते'
'प्रथम जगत इंडिया' शिवाय अर्वाचीन युगात इतर जगते पण आहेत.
'तृतीय जगत इंडिया' कृषिवलांचे, जे तीळ तसेच अन्नधान्यादी लागवड करतात; 'चतुर्थ जगत इंडिया' निसर्गनिवासी आदिवासींचे; आणि 'पंचम जगत इंडिया' विस्थापित, बेघर, बेकार व स्थलांतरण झालेल्यांचे.
'पंचम जगते' सर्व जगभर आहेत. मुंबईत यांची वसती सुमारे ६० ते ७० लाख आहे. यांचीपण शीरगणती आता होणार असे ऐकिवात आहे!
शेतकरी आयुष्यभर पशू - पक्षी - वानसे यांची आयुष्यभर पालन पोषण जोपासना करतो. शहरी लोकांचे आयुष्य यांत्रिकी झाले तर नवल काय! मग शेतकर्याचे काय? त्याचा संपर्क सतत पंचमहाभूतांशी येतो.
एका बिजातून वाढलेले वानस अगणित फळे / फुले / दाणे देते; केवळ मानवाला नाही तर प्राणी-पक्षी-कीटक या सर्वाना. असा 'सत्संग' ज्याला लाभला तो 'मानव' सहजपणे 'वानस' होऊ असू शकतो, कारण ती शेतकऱ्याचा "स्वधर्म" किंवा "सहज प्रवृत्ती" (vocation) असते. शहरी समाजातील व्यक्तींची "सहज प्रवृत्ती" शहर घडवीत असते. त्यांनी जमिनीपासून निसर्गापासून फारकत किंवा काडीमोड घेतलेला असतो. जमीन व निसर्ग या व्यापारी व दृष्टीसुखाच्या उपभोग्य वस्तू आहेत एवढेच त्यांना माहित असते. (ज्याने त्याने आपापले चित्त तपासून पाहावे.)
![]() |
Spring-time in Mumbai : वसंत ऋतू मुंबईत |
![]() | ||
विस्थापित मुंबईत २०११ |
हे विस्थापित देशाच्या ग्रामीण विभागातून पोटापाण्याचा उद्योग शोधायला मुंबईत तसेच इतर शहरांत पसरलेले आहेत. या मुंबई नगरीत पांढऱ्या पायाच्या गोऱ्या फिरांग्यांचे मात्र हार्दिक स्वागत होते. पण यांना बेकादेशीर आगंतुक समजतात. यांना गुळपाणी कुठले, पाणी, सर्व जीवसृष्टीची 'प्राथमिक' गरज, पण कुणी देत नाही. यांची अवस्था "आई वाढीना, बाप भिक मागू देईना" अशी झालेली आहे. पण "आई" आहे कुठे?टिप: प्रतिमा: रेमीजीयस डिसोजा
रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
'एक तीळ सात जणात वाटून खावा' याचा अर्थ मी 'अशक्य जे वाटते ते जरूर करून पाहावे' असा लावते.
ReplyDeleteबाकी एका जगात अनेक जगते आहेत या तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.
@aativas,
ReplyDeleteआपण सांगितलेला अर्थ ध्यानी ठेवीन. हि म्हण आठवली की मला कुंतीची आठवण होते: "पांच जणांत वाटून घ्या." पण अशक्य कामाचे बोलायचे तर मी मात्र "झोळ" किंवा लोकसहभाग - community participation - याचा उल्लेख करेन. आज मात्र कोणी कामाचं वाटप करायला तयार होइल का याची शंकाच आहे.
लोकसहभाग याला अनेक शब्द आहेत - जसे सातपुड्यात 'लाह्या', काही भागात 'इरजिक' .. हे सगळे शब्द एकत्र कुठे मिळतील काही माहिते आहे का?
ReplyDeleteचला! आणखी दोन शब्दांची भर पडली! सद्या "श्रमदान' हा शब्द चलनात आहे. मागे मराठी "Thesaurus " कुणीतरी तयार करीत असल्याची बातमी वाचली होती. किंमत सुमारे ५०००/- रुपये ठेवली होती. पण हे पुस्तक मी अजून पहिले नाही किंवा शोधले नाही. नाशिक येथे मराठी, गुजराथी, हिंदी व इंग्रजी या चार भाषेत शब्दकोश प्रसिध्द झाला असं मित्रांकडून समजले. काही बाबतीत मी फारच आळशी आहे. साधी चौकशी पण केली नाही. आता करेन.
ReplyDelete