March 01, 2011

कविता जेव्हा लघुनिबंध होई

कविता जेव्हा लघुनिबंध होई
व निबंध जेव्हा महाकाव्य होई
साकारते रेमीची गावठी बोली 

गावें, गल्ल्याबोळ, रानमाळ, नागरी अरण्ये जाती, जमाती, अनिर्बंध आधुनिक नागरी समाज   भटकता भटकता रेमीच्या भाषेने अभिजात साहित्य कधी मागे सोडले समजलेच नाही. आणि रेमीचे लेखन छंद, मात्रा, लय, ताल, अलंकार, विशेषणे इ. नियमांच्या दावणीतून मोकळे झाले.

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

8 comments:

  1. कधीकधी 'नियमांच्या दावणीतून मोकळे होण्याचे' पण नियम बनतात .. त्यापासून सावध राहावे लागते ... कदाचित या वळणानंतर अभिजात साहित्याचा नवा अर्थ तुम्हाला सापडेलही :-)

    ReplyDelete
  2. कल्पना नाही पुढे काय घडेल याची. आत्तातरी इच्छा आहे कि माझी कविता लोकगीतांच्या स्तरावर तरी पोचावी. सर्व अभिजात कला लोककलेतून रुजलेल्या आहेत. फक्त विसाव्या - एकविसाव्या शतकात "मास्टर" आले त्या मागून "चेले" - नकलाकार - आले. तशी कोणतीच आकांक्षा कधीच नव्हती, आताही नाही. दिवंगत पं. भीमसेन जोशी यांनी काही वर्षांपूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांना एकदा सांगितले, "मी दुसऱ्यांच्या 'चीजा' ऐकतो व त्यांना आपल्याशा करून गातो."

    ReplyDelete
  3. सवितादी! माझी कैफियत - तुम्ही चालना - चावी - दिली व मी लिहिली! नाच गाणे कहाणी गोष्टी चित्र शिल्प इ. माणसाच्या अभिव्यक्तीची उपजत साधने आहेत, अगदी मानवाची उत्क्रांतिने उत्पत्ती झाल्यापासून. अभिजात कला कधी आल्या? शुद्ध लेखन कधी आले? अभिजात किंवा संयतशील - classical - वा निर्भरशील - romantic - हे नागरी समाज-संस्कृतिचे निदर्शक आहे.
    समाज वाहत्या गंगेसम असायला हवा. त्याचे डबके झाले कि घाण वास मारतो. आता तर नागरी समाजाने गंगामाईला पण विटाळ आणलाय. विधायक सर्जनाला काही वाव आहे का? जर जुने नियम सुटले, नवे केले नाही तर हे कोणत्या तरी वादाच्या चौकटीत बसायलाच हवे का? माझी कैफियत!

    ReplyDelete
  4. रेमीजी, या विषयावर खूप काही लिहिता येईल - तुमच्या ‘कैफियती’शी मी पूर्ण सहमत आहे तरीही! पण त्याला बराच वेळ लागेल. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर:

    १.नागरी समाज ‘औद्योगिक क्रांती’ नंतर उदयाला आला हे विधान भारतापुरते तरी बरोबर नाही. भारतीय इतिहासात आणि प्राचीन साहित्यात किमान दहा प्रकारच्या नगरांचे उल्लेख आहेत – अगदी ऋग्वेदातही आहेत. म्हणजे ग्रामीण – शहरी हा तिढा फार जुना आहे, तो आजचा नाही. हा संघर्षही आजचा नाही.

    २.आपण समजतो त्यापेक्षा खेडी आणि शहरे यांचे नाते जास्त बळकट आहे. आज शहरे कशी वाढतात? तर खेड्यांतून लोक तिकडे स्थलांतरण करतात – मुख्यत्वे उपजीविकेसाठी. शहरात जन्मलेली आणि वाढलेल्या लोकांची संख्या आता वाढते आहे – त्यामुळे वीस एक वर्षांत हे चित्र पूर्ण बदलेलही कदाचित.

    ३.खेडीही बदलत आहेत. उदाहरणार्थ वारली १०० वर्षांपूर्वी जसे अभिव्यक्त होत असतील तसेच आजही होत असतील असे मानणे चुकीचे ठरते. कारण दरम्यान त्यांचेही जगणे बदलले. कोणतीही कला माणसाचे जगणे व्यक्त करत असते. काही कलाकृती कालातीत ठरतात कारण आज समाज कदाचित वर्तुळ पूर्ण करून तिथे पोचलेला असतो, पण बहुतांश कलाकृती तात्कालिकच महत्त्वाच्या असतात.

    ४.स्वान्तसुखाय अशी कला असते का हा प्रश्नच आहे - ज्या कलांना राजाश्रय लाभला त्या तगल्या हा इतिहास पाहता! कलाकारांना दाद हवी असेल तर त्यांना काही नियम पाळावे लागणार – कारण संवाद करताना आपले नियम वेगळे असतील तर आपण एकमेकांशी बोलू शकणार नाही. म्हणून नियम मोडा, तोडा, नवे करा .. पण एका अर्थी नियम असणार आणि ते पाळावे लागणार!

    ५.कोणी कितीही नियम तोडले तरी त्या नियम तोडण्याची पुन्हा एक नवी परंपरा (नियम) निर्माण होते कारण सामान्य माणसांना नियमाच्या माध्यमातून (ते कधीकधी जाचक वाटले तरीही) जगणे सोपे करता येते – काय अपेक्षित आहे ते कळते आणि अनपेक्षिताला सामोरे जाणे जितके टळेल तितके सुरक्षित वाटते. हा माणसाचा स्वभाव आहे – सार्वजनीन आहे – काही प्रसंगी काही माणसांचा अपवाद वगळता. म्हणून बुद्धाच्यांही मूर्ती बनतात – आणि साईबाबांसाठी (शिर्डीच्या!) सोन्याचे सिंहासन केले जाते!

    ६.अशुद्ध लिहिण्यामागे काही भूमिका असेल (उदाहरणार्थ ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देण्याची) तर ठीक. पण बरेचदा आम्हाला शुद्ध लिहिता येत नाही म्हणून अशुद्ध लिहायचे, दुसरी भाषा येत नाही म्हणून मातृभाषेचे प्रेम – हे मला बेगडी वाटते. भूक लागल्यावर पोट कशानेही भरते हे खरे तरी स्वादिष्ट जेवण आपल्या आवडते हेही खरे. म्हणून नेहमी स्वादिष्टच जेवले पाहिजे असे नाही हेही मान्य!

    ७.नियम बदलत जाणार. आज आपण जे नवे निर्माण केले ते उद्या कालबाह्य होणार आणि कोणी तरी ते तोडणार इतके समजून उमजून असले की नियम पाळले काय आणि तोडले काय – फारसा फरक पडत नाही – निदान आपल्याला! आणि समाज तर काय सगळे बदल पचवून टाकण्याची ताकद त्याच्यात आहेच!

    ८.असो. थोडक्यात म्हणता म्हणता आणि सहमती असतानाही असे मोठे उत्तर झाले. म्हणजे ‘मोठे’ किती मोठे होईल याची तुम्हाला कल्पना आली असेलच!

    ReplyDelete
  5. सवितादी,
    आपली मुद्देसूद प्रतिक्रिया वाचून बरे वाटले. काही ब्लॉग वर याहीपेक्षा लांबलचक संवाद मी पाहिलेले आहेत. या मुद्द्यांवर आणि शहर व खेडी यावर मी वेळोवेळी व वेगवेगळ्या संदर्भाने पूर्वी लिहिलेले आहे. तरीही पुढील गोष्टींची पुनरावृत्ती करायला मला कंटाळा येत नाही.
    १. शहरे - निदान आजची शहरे - ही जवळच्या अन दूरच्या प्रदेशांवर जगणारी "बांडगुळे" आहेत असे माझे मत आहे.
    २. नागरी संस्कृती आणि त्यांचे प्रतिक 'नगर' (civilized society) यांची सुरवात सुमारे पांच हजार वर्षांपूर्वी झाली असे शास्त्रज्ञ सांगतात. नागरी संस्कृती संस्कृतीचा पाया व मुख्य गमक आहेत "सत्तेचे केंद्रीकरण" व "सामाजिक अधिश्रेणी" - उच्च व नीच वर्ग किंवा जाती - आहेत; अगदी सुरवातीपासून आजतगायत.
    ३. ही केंद्रित सत्ता पूर्वी राजा आणि पुरोहित यांच्या यांच्याकडे होती. कनिष्ट समाजाला एकाने, राजसत्तेने संरक्षणाचे आश्वासन द्यायचे, दुसऱ्याने, धर्मसत्तेने मरणोत्तर स्वर्गाचे - मोक्षाचे - आश्वासन द्यायचे. मला वाटते "धर्म"संस्थेचा शोधही नागरी संस्कृतीने लावला असावा.
    औद्योगिक क्रांतीने हे तर विकोपास गेलेले आहेत. आता ती केंद्रित सत्ता भांडवलशाही आणि शास्त्रज्ञ - तंत्रज्ञ यांच्याकडे आहे. हे तर संरक्षण आणि इहलोकीच स्वर्गाचे आश्वासन देतात.
    ४. वेदांचा दाखला देणे हा पण "सत्ते"चाच प्रकार नाही का? शुध्द लेखन हा पण सत्तेचाच... लोकबोलीना - लोकभाषांना अशुध्द म्हणून नीच असल्याची भीती दाखवणे.
    ५. या पूर्वीचा लेख "इंडिया, भारत की गोंडवन?" व नंतरचा, स्मृतिचित्रे या पुस्तकाची समीक्षा, जरूर वाचा.
    आणखी काही नमुने.
    http://remichimarathiboli.blogspot.com/2009/11/civilization.html
    http://remichimarathiboli.blogspot.com/2010/01/blog-post_30.html
    पुढील प्रतिमेत मी माझ्या बोलीसंबंधी या ब्लॉग वर लिहिलेले आहे. हे पहिले पोस्ट.
    http://remichimarathiboli.blogspot.com/2008/06/blog-post_21.html
    धन्यवाद!

    ReplyDelete
  6. रेमीजी, वाचते हे सगळ सवड मिळाली की आणि मग लिहिते पुन्हा :-)

    ReplyDelete
  7. Read..
    felt resonated at some of the points, though I can't put it verbally. I strive for the society of researches, artist designing caves, writers writing for lifetime.. and it's not about cities or villages.. It's about society, where incidents like Gujrat riots just can't happen..people won't be running on Dadar station.. where men and women can LIVE in family and give birth..create..

    ... SIGHHHHHHHH

    ReplyDelete
  8. Dear Harshada, I am aware your among the rare species who has "community" beyond so-called communities in the space of virtual reality caught on I-Net / Web. It is evident in your writings... Your strivings will bear fruits, I am sure, some day.
    Best
    Remi

    ReplyDelete