August 15, 2012

अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभर

दोन गाणी : प्रस्तूतकालीन महाभारताची समीक्षा


लोक-उर्जा संधारण 
 आर्थिक-तांत्रिक-ओद्योगिक विकासाच्या नशेत लोकाविकासाचे कुणाला भान?


मला'खो' देते 'हर्षदा' आणि मी समीक्षा करायला निवडतो पुस्तकाऐवजी एक विषय, ज्याला म्हणता येईल : "प्रस्तुतकालीन महाभारत-कुरूक्षेत्र"! हे पुस्तक वास्तव रुपात आपल्यासमोर आहे. त्याचे स्वरूप "मायावी वास्तवता", Virtual Realty, नाही. ही टीका मी पुढील दोन गाण्यात आटोपतो.

पहिल्या गाण्यात आहे सत्तेशी केलेला संवाद जो विफल होतो, आणि त्याचे स्वरूप केवळ 'स्वगत' उरते. दुसऱ्या गाण्यात पहिल्या गाण्यातील वैफल्याचे निदान केलेले आहे.


प्रगती = पंचम जगत भारताचा उदय
ही मुले मुंबईची काय आठवण घेऊन मोठी होतील ?

 

अलिखित अर्वाचीन महाभारत- कुरुक्षेत्राची समीक्षा 

गाणे १. स्वगत सत्तेशी (नाट्यछटा) :  त्तेशी संवाद अशक्यप्राय


मी सत्त्याशी लुडबुड करू इच्छित नाही
वाटल्यास ते आपसूकच प्रगट होईल.
पण जेव्हा आम्ही विविक्षित तथ्य बोलतो
ज्यात मी गुंतलो आहे ते जाणणे माझा हक्क नाही का?
संवादात प्रतिसादाने बरोबरीचा हक्क नाही का?
किंवा कोणत्याही नात्याने — सर्व वाटांवर सर्वदा?
एक तथ्य उरतेच, जेव्हा मी विचारणा करतो
तेव्हा तू संवाद तोडतेस किंवा उत्तर टाळतेस.
कारण काहीही असो.

याला संवाद का म्हणावे? कि
याचा अर्थ माझ्याच खर्चाने माझी टवाळी?
तू माझ्या परिश्रमांची पैशाने किंमत देऊ शकतेस पण मोल नाही
(जर का तू कधी परिश्रमाचे मोल समजलीस तर
पुरवठ्याच्या बाजारी?).

मी नाही विकावू कि नाही भाड्याचा माल.
पसंत करीन मी तुला सोडचिठ्ठी देणे
देण्याहून औषधांची चिठ्ठी रोगांवर
ज्या जन्माला घालतात केवळ प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया.
नाईलाज आहे! अशा लुडबुडींना येथे नाही वाव
केवळ एकच जन्म हा!
(नाट्यछटा हा प्रकार दिवाकर यांनी मराठीत आणला. नाटक-सिनेमात स्वगते येतात.)

 

गाणे २. माझे गाणे जन्मले... 


माझे गाणे जन्मले भूईत आणि जळांत,
पोसले वानसांनी, लोकानी अन प्रेमाने,
सत्तेच्या हवसेने वेड्या नागरी समाजांत,
अंध कोपाने जगणेच उध्वस्त करणार्‌या.—
गांडूळे, हिंस्र जनावरे बरी त्याहूनी !  


विश्राम अमूल्य विनामोल
श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही सृष्टीने समस्त जीवमात्राला दिलेली पाच स्वायत्त मूलभूत कार्यें. यात हस्तक्षेपाचा कोणत्याही मानवी सत्तेला अधिकार नाही (पहा : टीप 1).

  सत्तेचे अनेक अवतार

सत्तेच्या अनेक रूपांत लोकाशी सरकारपण गृहीत आहे. पण सत्ता कुठल्याही स्तरावर असू शकते, कुटुंबापासून समष्ठीपर्यंत. त्यांत शाळा-शिक्षक आणि विद्यार्थी, अगणित सार्वजनिक संस्था, कॉपोरेशन, पोलीस, आमदार-खासदार, नोकरशहा, इत्यादी सर्व आले. कुटुंब नवरा आणि बायको, सासू-सासरा आणि सून, पालक आणि मुले यांच्या संबंधांतही सत्ता अवतार घेते.

अर्थात यात सत्ता आणि रयत, किंवा सत्तेसाठी संबंधितांचा संघर्ष आलाच. नागरी समाजात हा संघर्ष अपरिहार्य आहे. खरं तर सत्तेचे केंद्रीकरण हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नागरी समाजाच्या इतिहासात हे अव्याहत चालत आले आहे.

आणि या सत्तेने सत्तेसाठी केलेल्या संघर्षांत कितीक बलाढ्य नागरी संस्कृती नामषेश झाल्या, पण त्यांची रयत नव्हे. मात्र टिकून राहिल्या आदिवासी जमाती, ज्या आहेत सान प्रजासत्ताके, अनादी काळापासून... आजही!!


स्वावलंबनाला वेळूचा आधार
 यंत्रोद्योग = बहुसंख्य ग्रामीण जनतेच्या हस्तोद्योगांवर गाढवाचा नांगर आला. बांबू प्राचीन काळापासून भारतीय ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे, मग बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला?

या गाण्यांना काव्य म्हणता येईल का माहीत नाही ! ही आहेत रेमीच्या बोलीत राकट गावठी प्रेमगीते. येथे नाही अभिजात शैली, नाहीत अलंकार-उपमा, नाही शब्दांची वा कल्पनांची आतिषबाजी. शेतकर्‌याच्या पिंडाला अशी चंगळ परवडणारी नाही, मग ते पाणी असो की शब्द असोत.

एक प्रश्न उरतो. या रचनांना समिक्षा, टीका अथवा दुसर्‌या कोणत्या सदरात ठेवता येईल का? कोणत्याही सृजनशील अभिव्यक्तीत वैयक्तिक व सामाजिक यांच्या पलिकडे जाण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे यातील 'मी' नेहमीच गौण राहातो. दोन्ही गाण्यांचा विषय प्रेम आहे, पण हल्लीच्या रूढ (लैंगिक) अर्थाने नव्हे.  

प्रस्तुतकालीन महाभारत (कुरूक्षेत्र) आज काव्यात कोण लिहिणार, आणि वाचणार कोण? ते तर प्रत्येक व्यक्ती रोजच अनुभवते! मात्र त्याचे ऑपरेशन (कि डिसेक्शन, कि पोस्टमोर्टेम?) सुटसुटीत व्हायला काय हरकत! आजच्या परिस्थितीवर लेखातून, पुस्तकातून केलेल्या असंख्य टीका वेगवेगळ्या दालनात राहून केल्या जातात. कितिही प्रयत्न केले त्या अपुर्‌या राहातात. किंबहुना त्या जेवढ्या लठ्ठ तेवढ्या आकलनास कठीण.


अन्नपाण्यासाठी रयत दाही दिशा - जगण्यावर कर अनारोग्याचा
 चव्वलाच्या नादात पाणपोया वाहून गेल्या - हे रस्ते हे रस्ते


साधे उदाहरण : एकाद्या घटनेची, वस्तूची व्याख्या तिचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. व्याख्यांच्या जागी समर्पक उदाहरणे सोईची होतात असं मला वाटतं! ... पाण्याची शास्त्रीय व्याख्या H2O असली तरी ते त्याहून अधिक असते. तुका म्हणे 'प्रयत्नें वाळूचे कण रगडीता तेलही गळे'. अर्वाचिन युगांत रूसी शास्त्रज्ञांनी भूगर्भातील खडकांना दाब देऊन पाणी काढले. दगडाच्या खाणीत मिळालेल्या स्फटीकाच्या पोकळीत पाणी असते. ऐकावे ते नवल!

अर्वाचीन युगाची व्याख्या मला माहित नाही. पण चार्ली चाप्लीनचा मूक चित्रपट Modern Times शब्दही न वापरता त्याची व्याख्या समर्पकपणे चित्रित करतो. ते पाहून आणि वारंवार आठवून मी मात्र अभिजात शैलीच्या शब्दजंजाळातून मोकळा होत गेलो.

अर्वाचीन महाभारत-कुरुक्षेत्र!  एवढा क्लिष्ट, अनेकांगी आणि विस्तृत विषय! या देशाची घटनाच लिहायला किती विद्वानांना किती वर्षें लागली? आजच्या सुधारलेल्या प्रगत समाजात कुठून मिळणार डिक्टेशन देणारा व्यास आणि लिहून घेणारा गणपती! प्राचीन काळातील कुरुक्षेत्र एकाच रणांगणावर होते. आज ते सर्व भारत व्यापून राहिले आहे. सामाजिक संधारण आर्थिक फॉर्म्युला लावून कसे होणार?

प्रेमावाचून दुसरा कोणताही पर्याय किंवा साधन किंवा अहिंसक शस्त्र हे ऑपरेशन करायला मला सापडले नाही!


आमचा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया
आज सीमांत प्रदेश. उद्याचं ?माहित नाही

सरता पालव

इंडियन आयडल ६ च्या मंचावर पं. जसराज


टीवीच्या पडद्यावर सारा वेळ माझे ध्यान – कान आणि नजर – होते पंडितजींवर. कधीकाळी लोककलांतून अभिजात कलांचा – शिल्प, संगीत, नृत्य आदि– उगम आणि विकास झाला. अर्वाचीन काळातही पं. कुमार गंधर्वांनी ते केले. आजही लोकबोलीतला कबीर–तुकाराम अभिजात संगीताच्या गळ्यातला ताईत (रत्नहार नव्हे, तो राजे लोकांसाठी, तुकोबासाठी नव्हे.) आहे.

आता अभिजात संगीतातून बॉलीवुडच्या इंडिपॉप संगीताचा उगम झाला. त्याचा उदो करण्यासाठीच तर हा मंच आहे. आता त्यांच्या चालींवर श्रद्धाळू भजनं गातात. आता करूण-शांत-शृंगार रसांची जागा राजरोस बीभत्स रसाने घेतली आहे; हवा, जळ, जमीन, जीव ही प्रदुषित होताहेत.
या प्रदूषणाच्या जाणीवेवाचून कविता-कथा-कादंबरीची कशी सुटका होईल? मानवाने निर्माण केलेल्या सर्व प्रश्नांस उत्तरे आहे.कालचा व्यास नागरी समाजाच्या केंद्रित सत्तेचा कवी होता.

आजचे देशव्यापी "महाभारत आणि त्यात सतत चालले कुरुक्षेत्र" जेव्हा शंभर कोटी कवी लिहितील तेव्हा नागरी समाजाचे सत्तेचे केंद्रीकरण समाप्त होईल.

परिशिष्ट

आद्य महाभारतातील तीन प्रसंग


एकलव्य – दुर्गा भागवत याला 'मोहरीतील ठिणगी' (व्यासपर्व) म्हणतात;
लाक्षागृहातील कांड – संन्यस्थ कुंती गांधारी व धृतराष्ट्र ... रानाला लागलेल्या नैसर्गिक वणव्यात जळून मरतात, कुरुक्षेत्रानंतर...महाश्वेतादेवी (समीक्षा).
खांडव वनाचा विनाश – राजधानी इंद्रप्रस्थ बांधण्यासाठी लावलेल्या वणव्यात वानसे, पशूपक्षी व नाग जमात भक्ष्यस्थानी पडतात. त्याचे पर्यवसान पांडवांच्या वंश-विच्छेदांत होतो – तक्षक जीवाणू (वायरस) होऊन परिक्षिताचा वध करतो.

आदिवासी जीवन 

भिल्लांची आगळी होळी

आदिवासींची संस्कृती किती प्राचीन असेल याची कल्पना नाही. पण आज ते काही प्राचीन वातावरणात राहात नाहित.प्रस्तुत कालीन नैसर्गिक आणि सामाजिक-राजकीय-आर्थिक-इ. पर्यावरणात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते कसे टिकतात - sustain - याचं कारण ते निसर्गाशी संवाद साधून जगतात एवढं खरं!
ते  खरे सृष्टीयोगी !
भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य -१
त्यांना विश्राम विनामूल्य मिळतो. करमणुकीसाठी त्यांना सिनेमा, टीवी अशा कुबड्यांची गरज किंवा हवास नसते.
त्यांचा  होळीचा सण पाच दिवस चालतो.
बाजूच्या व खालील  फोटोत दीवासौ या सणाला या भिल्ल षोडशा उत्स्फूर्त नाच करताना. यावेळी मक्याचे पिक तयार झालेले आहे.



भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य - २

वरील चित्रांतील आनंदी भिल्ल व इतर आदिवासींचे नागरी समाजाने गेल्या पाच हजार वर्षांत केलेल्या नुकसानाची परतफेड आजचे लोकशाही सरकार कधीतरी करू शकेल का?


आता मी 'खो' देतो 'सविता' (अब्द शब्द) आणि 'अत्यानंद' यांना. दोघंही मातबर ज्येष्ठ लेखक. शिवाय सावितादी प्रवासी आणि फोटोग्राफर आहेत. तर अत्यानंद (प्रमोद देव) हे शास्त्रीय संगीताचे व्यासंगी गायक आहेत; त्यानी माझी एक, वरीलप्रमाणे कोणत्याही सदरात न बसणारी, कविता - 'अशी कविता एक कोडे' - गाईली होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.

टीप : . श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही माझी मूळ लेखमाला अपुरी राहिली आहे. पण तिचे इंग्रजी भाषांतर Archetypes India माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेय. त्याचा tag Work-Leisure-Health-Learning-Propagation.  ही माझी पुनर्शोधन (संशोधन नव्हे) मालिका आहे. त्याची स्फूर्ती, शिक्षण आणि दिशा मला माझे आदिवासी आप्तेष्ठ आणि आई-आजी यांच्याकडून  मिळाली.
२. नुकताच New Scientist या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला लेख Climate change: The great civilisation destroyer? अवश्य वाचावा. त्यासाठी नाव-नोंदणी Sign-in करावी लागेल. हा लेख मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्याची वर्ड-कॉपी हवी असल्यास इ-मेलने माझ्याशी संपर्क करावा.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त | १५ ऑगस्ट २०१२ | मुंबई
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

15 comments:

  1. Thanks for taking it up! Read post couple of times, bond between pieces is bit vague so took time to get concept

    ReplyDelete
  2. @Samved The criticism of Contemporary Kurukshetra is within the two songs. Could it make sense without the rest of text and images, which are a commentary on the two songs?
    I am aware there many blank spaces. Also, I am caught in a balancing act between number of words and their meanings, as usual.

    ReplyDelete
  3. हं... मूळ कल्पना काय आहे 'खो'ची हे पाहिलेलं नाही अद्याप. पण सध्याच्या महाभारताची तुम्ही केलेली समीक्षा नेहमीप्रमाणे विचारांत पाडणारी आहे.

    मला या विषयावर लिहायला कितपत जमेल माहिती नाही!

    ReplyDelete
    Replies
    1. सवितादी, आपला प्रतिसाद पाहूनच माझं काळीज सुपाएवढं झालं.
      थोडक्यात खो असा : सामवेद यांनी ही 'खो'ची कल्पना 'नाव सोनूबाई आणि कथिलाचा वाळा' या म्हणीवरून सुरू केली. ती अशी : 'नावाजलेली' पुस्तके जी वाचल्यावर लक्षात येते कि आहेत 'कथिलाचा वाळा' ! अशा कोणत्याही पुस्तकाची समिक्षा करायची. हर्षदा विनय हिने हिंदी "पुस्तकाचे ऑपरेशन" केले आहे ते वाचनीय आहे!
      आपण कोणतेही पुस्तक घेऊ शकता. आपणास पुस्तक परीक्षण नवीन नाही. मी घेतलेला विषय एक अलिखित पुस्तक - कथा - कादंबरी - महाकाव्य म्हणा वाटल्यास.

      माझ्या पूर्वीच्या कॉमेंट्स मी काढून टाकल्या आहेत. त्या आपल्याला मिळाल्या असलील. उगाच आत्मचरित्राने जागा का अडवायची?

      Delete
  4. ता.क. जे कायमस्वरूपी लोकजीवनावर परिणाम करतील असे व्यास, तुकाराम, कबीर इत्यादी विरळाच?
    मी, माझा अहंकार सदा गोंजारत बसणारा, कोण्या झाडाचा पाला?

    ReplyDelete
  5. सर, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास पहिली ते दहावी यत्तेपर्यंत झाला तेवढाच ! आपण लिहिलेले, इतिहास = नाव सोनुबाई आणि कथलाचा वाळा, वाचून धक्काच बसला. प्रयोगशाळेत आम्ही झाडे-पाने-फुले-जनावरे यांचे डिसेक्शन करतो. पण इतिहासाचे हे डिसेक्शन खरोखरच मला समजले नाही. कृपा करून खुलासा करा. मी ब्लॉग लिहित नाही. पण माझ्या विषयाचे ब्लॉग subscribe करायला वापरतो. आपला फोटोग्राफी ब्लॉग यामुळेच मी subscribe केला. आभारी.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रथम : तुमची मनमोकळी टिप्पणी मला आवडली. आम्ही इतिहासाचं शतकांचं ओझं डोक्यावर घेतो आणि भविष्याकडे डोळे लावून चालतो. या उचापतीत वर्तमानाकडे आपलं ध्यान राहातंच असं नाही. दुसरी गोष्ट अशी, कार्य-कारण-परिणाम cause and effect अटळ आहेत; भूत, भविष्य की वर्तमान असो. इतिहास त्याच्या अवशिष्टाच्या रूपाने waste आपल्यासमोर सतत उभा असतो. पण आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो. हेच तर दाखवण्याचा प्रयत्न मी येथे केला आहे. आनंद हेच केवळ सुखाचे निदान व साधन असू शकते. इलेक्ट्रोनि साधनांच्या कुबड्या सर्वकाळ कशा कमाल येतील?
      आभारी रेमी

      Delete
  6. सेम एज् संवेद वाचले पुन्हा, नक्कीच जाणवलं महाभारताची समीक्षा आहे; विरोधापलीकडे बरेच काही करण्यासारखे इथले मुद्दे आहेत. सध्या आपण सर्व औद्यीगीकी बाय-प्रोडक्ट्सनी होरपळून निघतोय, भूमिहीन (शब्द योग्य वापरतोय ना) त्यात कुठेच उभे राहू शकत नाही..खरंच चिंतनीय वर आणखी काही करणीय आहे हे सर्व.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण म्हणता - चिंतनीय व करणीय - हे खरंच आहे, पण आपापल्या शैलीने व परीने करायाल हवे. आपण सर्वच जाणता-अजाणता वेगवान जीवनशैलीत अडकलो भरकटतो आहोत.
      वरील रंगित चित्रे हमरस्त्यावरील आहेत. ती बापटांची आठवण करून देतात - एकच बोगदा मुंबई पुण्यात (दख्खनराणी).
      भूमिहीन आणिक विस्थापित - काय असते ते मी अनुभवलेय सहा वर्षांचा असताना, आणि आता अट्टाहासाने या श्रेणीत राहातोय. एवढं एवढंच करणे शक्य होते.
      या पोस्ट इतरांना पण इ-मेलने पाठवता येईल.
      धन्यवाद!

      Delete
  7. सत्तेचे अनेक अवतार ... हे नेहमीच अनुभवला येतात, घरी अन बाहेर. आपल्याकडे म्हण आहे : चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. शाळेत मास्तर काही मुलांवर डूख ठेवतात. म्युनिसिपल ऑफिस, राशानिंग ऑफिस जल तिथे अरेरावी. हे साध्यासुध्या लोकांचे अनुभव तुम्ही लिहेले आहेत. खरंच बरं वाटलं !!
    या लेखातील गर्भित अर्थ पण थोडा विचार केला तर ध्यानात येतात. धन्यवाद. हा लेख मासिकात किंवा पेपरात छापला असता तर बरे झाले असते असे मनापासून वाटले. ब्लॉग लिहिणारे कशाला वाचणार? आणि वाचले तर कुणाला असे स्वतंत्र विचार खपणार?

    ReplyDelete
    Replies
    1. खरं पाहता मी तरी कितीशा कॉमेंट्स करतो. केल्या तर त्या विस्तृत असतात. काही लोकांना हे अनपेक्षित असतं; असं बोलूनही दाखवतात. हि जागा खरं तर वाचकांची, आणि चर्चेची. पण काही लोक तर प्रशस्ती पत्रे देतात. पंचवीस वयापर्यंत आपण तेच जमा करत आलो, त्यामुळे आता इतरांना पण द्यायची!!

      आज म्हणे "जागतिक शिक्षण दिवस" -- आणखी एक घोषणा.
      पण सुयोग्य (appropriate) शिक्षण कोण, कसे ठरवणार? हितसंबंधी "सत्ता" ते कधीही होवू देणार नाही. नाहीतर तीन हजार वर्षांनंतर ४० टक्के जनता अजूनही निरक्षर राहिली असती का? असा हा आमचा महान इतिहास!! काल-परवा पर्यंत देवाभाषेला पण अस्पृश्यांचा विटाळ होत होता. म्हणून ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद ऐकवले होते; त्याला सातशे वर्षे झाली.
      आजची सत्ता भांडवलशाहीची -- त्याला साम्यवादी लाल चीन पण अपवाद नाही -- त्यांना सत्तेच्या गुलामागीरीचेच शिक्षण द्यायचे. कधीतरी ऐकण्यात आले होते, ब्रिटीश सत्तेला कारकून हवे म्हणून शिक्षण दिले.

      बिनधास्त टिप्पणीबद्दल मनापासून आभार!

      Delete
  8. सत्ताधारी नियम करणार अन त्या करता इतरांना राबवणार हा पूर्वापार चालत आलेला राबता आहे . जातीय समीकरणं ही त्यातलीच, राहुल तरी त्याहून वेगळा कुठे त्याला जी थोडी सत्ता मिळते ती तो वचपा काढायलाच वापरतो.

    ReplyDelete
    Replies
    1. आशाताई, स्वागत!
      आपण म्हणता ते खरं आहे. सत्ताधारी - सत्ताभिलाषी, सारे एका माळेचे मणी. पण यांचे आजच्या परिस्थितीत बोलाविते धनी नजरेस येत नाहीत. उच्चभ्रू वर्गाचे लोक कोणत्या ना कोणत्या वादात गुंतलेले असतात. हे अल्पसंख्यांक - १० ते १५ टक्के उच्चभ्रू ८५ ते ९० टक्के रयतेवर राज्य करताहेत. नव्वद कोटी शेतकरी "वर्ग" संघटीत नाही, जसे ओद्योगिक कामगार संघटीत असतात. आतापर्यंत दहा वर्षांत विदर्भातील दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याला कोणीच एक्सपर्ट उत्तर देऊ शकत नाही. देशाच्या शिरगणती अनुसार, गेल्या वर्षापर्यंत शेतकरी बायकांचा दर्जा Non -workers असा होता. एक फिर्याद सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा पर्यंत न्यायाधीशांसह कायदे पंडितांना हे माहीतच नव्हते. हे ब्रिटीश राजवटीपासून चालू होते. हे १९८० साली माझ्या ध्यानात आले. आणि ते काही स्वयंसेवी संस्थाना सागितले पण. पण लक्षात कोण घेतो? मी काही चळवळ्या activist नाही.
      पूर्ती केल्याबद्दल आभार!

      Delete
  9. माझे नाव सागर आहे. मी www.mindurmarathi.com या संकेतस्थळाचा लेखक आहे. ही वेबसाईट मी २ महिन्यापूर्वी सुरु केली असून माझा प्रयत्न मराठी-इतर लोकांना अतिशय सोप्या पद्धतीने मराठी शिकविण्याचा आहे. माझी अशी इच्छा आहे कि आपण आपल्या sidebar मध्ये या वेबसाईटची लिंक टाकावी जेणेकरून गरजू व्यक्तीना मदत होईल.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  10. वा. ल. कुलकर्णी यांचे 'साहित्य : स्वरूप आणि समिक्षा' (पहिली आवृत्ती १९७५) हे पुस्तक वाचनालयात अनायासे हाती आले. विद्यार्थ्याना हे अभ्यासाला आहे असे ऐकले.
    'साहित्य आणि इतिहास' या प्रकरणात महाभारत येणे अर्थातच अपरिहार्य. 'वाल'नी या महाकाव्याचे सुरेख विवेचन केले आहे. त्यात त्यांनी पुढील प्रश्न उपस्थित केला, तोपण अटळ आहे : 'महाभारतकथेचे वास्तव ... एकाच वेळी विशिष्ट आणि सार्वकालीन सत्त्यांची सूचना देत आहे... हा त्याचा आवाका आहे तो वर्तमान साहित्यात कितपत गोचर होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे (पृष्ठ १५१).'
    त्यांनी शेवटी काढलेला निष्कर्षही तेवढाच वास्तव पण कटुसत्य आहे. 'परंतु... एका प्रचंड समाजमनाची निर्मिती आहे असा आभास निर्माण होण्याइतपत तिला सामर्थ्य लाभणे एकंदरीने कठीण (पृष्ठ १५३).'
    मात्र मी काढलेल्या निष्कर्षापर्यंत किंवा पर्यायापर्यंत ते पोहोचले नाहीत. त्याचे कारण साधे आहे. आम्ही पाच हजार वर्षांच्या जोखडातून मुक्त होणे सहजासहजी शक्य नाही. लक्षावधी वर्षांपूर्वी जो माणूस होता तोच आजही आहे. त्यालाही सृष्टीने संस्कृतीचे वरदान दिले होते, ते आजही अव्याहत चालू आहे. पण कोणती नागरता किंवा सुसंस्कृत समाज – civilization – शाश्वत आहे? या प्रश्नाकडे 'वाल'नी काणाडोळा केला. शेवटी आमच्या विचाराला आपणच मर्यादा घालतो, एवढेच.
    माझे विचार चक्र चालूच असते. कारण हा विषय मला अगत्याचा वाटतो.

    ReplyDelete