April 30, 2009

अग्निफुलांचा उत्सव

अग्निफुलांचा उत्सव

मी व्याकूळ आर्तता
तुझ्या रोमरोमात उमटेल
रंग सुने नाहीत जाणार चुकवून
इथे तिथे मी पाहीन
तुला रंगछटामध्ये कैक
गर्भ तुझ्या स्निग्धोष्ण उद्ररी
होवून राहीन मी सदाचा
तहान भूक निश्वसने तृप्तीचा
साक्षी आणि वाटेकरी
लाख फुललेले अंगार माझ्या
नजरेतले पाहीन माझा मला
वाढत असलेला
प्रसवाच्या निरंतर प्रतिक्षेत
धगधगत्या अग्निपुराच्या पडछाया
लेवून प्रश्नाचिन्हांकित
उभ्या गर्भवती हजार
मी धरित्रिच्या अंगांगावर
नाचेन अग्निफुलांचा उत्सव उत्तरारात्रीँ
- - - - -
(सातपुड्याच्या कुशीत होळी पुनवेची रात्र)
२४-०३-१९७०


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 28, 2009

हीमनगाची टीप


हीमनगाची टीप
सकाळपासून
सकाळपर्यंत
अंगाराचे उद्रेक

(Remigius de Souza:
15-3-1984)


~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 23, 2009

सातपुड्याच्या कुशीत असाही एक होळीचा उत्सव


सातपुड्याच्या कुशीत असाही एक होळीचा उत्सव
भिल्लांचा होळीचा उत्सव पाच दिवस चालतो. गावोगावी मेळे भरतात.नाच, गाणे, संगीत यानी भारलेले. असे मेळे नदीकिनारी अथवा तळ्यांच्या काठी असतात, आणि बाजारपेठेच्या गावी.
होळी आणि वृक्षपूजा हे मूळचे आदीवासी सण आणि परंपरा आहेत असे वंशशास्त्राचे अभ्यासक (कुमारस्वामी) मानतात. नंतर आर्यानी आणि बौध्धानी त्यांचा स्वीकार केला.

------

विंध्य- सातपुड्याच्या रांगांमध्ये नर्मदा नदीच्या अनेक उपनद्या वाहतात. इथली जंगले आदिवासींची जीवनरेखा आहे.हजारों वर्षे आदिवासी इथे निसर्गाशी सुसंवाद साधून राहिले।विंध्य आणी सातापुड्याच्या रांगामध्ये भिल्लानी आसरा घेतला. पण आता तेथली जंगलेही नागरी समाजानी संपुष्टात आणली. आणि भिल्लांच्या चरितार्थावरच घाला घातला.

----

भिल्लांची संस्कृति एवढी संपन्न आहे की त्याला जागतिक वारसा समजणे आणि त्याचे जतन करणे आजची निकड आहे. दहा हजार वर्षांहून अधिक या पुरातन जमाती निसर्गाशी संवाद राखून आतापर्यंत जगत आले. पण आता सुधारणेच्या वावटळीत कितपत टिकेल याची शंकाच आहे.

-----
भिल्लांची जमात (community) एकसंध असते. त्यांच्यामध्ये सुसंस्कृत समजल्या जाणारया नागरी समाजाप्रमाणे (society) श्रमाची विभागणी केलेली नसते. प्रत्येक व्यक्ति सारया जमातीचे प्रतिक / प्रतिनिधी असतोश्रम - विश्राम - अध्ययन - स्वास्थ्य यानी परिपूर्ण आदिवासी माणसांचे व्यक्तिमत्व नागरी माणसासरखे दुभंगलेले नसते.


----
होळीच्या रात्री अनेक वाड्यांवरून लहान थोर, बाया पुरूष होली पेटवायच्या जागी जमा होतात. येताना तादीने भरलेली मदकी, मक्याच्या भाकरया आणि अंडी बरोबर घेवून येतात.

चंद्र माथ्यावर आला की होळी पेटवतात. सारे बायका, पुरूष, मुले गाणी गात फेर धरून होळी भोवती नाचतात. अधून मधून ताडी पिने चालते. नाच गाण्यात ताडी पिण्यात रात्र संपते. दीवार वर येतो. सारे होलीभोवती जमा होतात. म्होरक्या सगळयानी आणलेल्या भाकरया एका मोठ्या बांबूच्या टोपलीत कुस्करून घालतो. त्यात कोंबडीची कच्ची अंडी फोडून घालतात, भाकरीचे तुकडे आणि अंड्यांचा बलक एकमेकात मिसळतात. हा होळीचा प्रसाद, सर्वाना वाटला जातो। आणी होळीच्या उपवासाची सांगता होते.



----

या तरुणानी ल्यालेले श्रृंगार कुतुंबांतील स्त्रीयांचे आहेत. बहुतेक दागिने काचमण्यांचे स्वत: गुंतलेले असतात.
त्यांच्या बांसरीला पाचच सूर असतात.
मोराची चित्रे बायका मुली अंगावर गोंदून घेतात. तर वाघाला ते वाघदेव मानतात.


----
तरुण युवक युवती आपला पसंतीचे जोडीदार निवडतात आणि मेळ्यातून पळून जातात. मग तरुणाचे आई वडिल मुलीच्या घरी जातात आणि मुलीला मागणी घालतात, मुलीच्या घराच्याना हुंडा देवून दोघांचे लग्न लावतात. यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो. ठिकठिकाणी पाच दिवस हे मेळे जत्रा भरतात. इथे गावोगावीच्या आप्तस्वकीयांच्या भेटी होतात.

----


ज्यावेळी माझे सहाध्यायी आणि सहकारी विलायातेला - अमेरिकेला जात होते आणि तेथेच स्थायिक होत होते तेंव्हा मी दरयाखोरयात - वाळवंटात - विशेषत: आदीवासी जमातीमध्ये भटकत होतो. शोधत होतो नागर समाजापुर्वीचे लोक आजही आहेत, जेथवर माझी पाळेमूळे नक्कीच पोहोचलेली असणार.

आणि माझी जीवानाशैलीच पार बदलून गेली -- कोणतेही विधी संस्कार न करता माझे धर्मांतर झाले म्हणा.
मी काढलेली ही छायाचित्रे मी प्रथमच प्रसिध्द करीत आहे. मन फारच अस्वस्थ आहे. वाटते मी काही चूक तर करीत नाही? कारण माणसावर माझा विश्वास असला तरी सुसंकृत समजल्या जाणारया समाजावरचा माझा विशवास केव्हाचा डळमळला आहे.

मी
लिहिलेले संशोधित निबंध : "Tribal housing: Buddha and the art and science of Karavi hut"; आणि : "Tribal housing and Habitat-2"
: "Tribal housing: Buddha and the art and science of karvi hut" आणि
: "
Tribal Housing and Habitat-2"
वारली
जमातीचे घर आणि परिसर, कला आणि संस्कृति संबधिं असले तरी इतर जमातींना पण लागू पडतात. कृपया वरील दुव्यावर टिचकी मारा.



~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 15, 2009

उत्सव


आता इथुनी पुढे
पळ अन् पळ जगावे
पळ अन् पळ जोडावे
काळाला नश्वर अविरत

(Remigius de Souza
२६-६-२००५)

~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 12, 2009

जीवन ज्याचे एक अंगभूत प्रार्थना

असे कोण आहे वनस्पती - पशू - मानवी
जगतात, जीवन ज्याचे एक अंगभूत प्रार्थना
अन बलिदान अन उत्सव असती एकेच वेळी?

प्रार्थना आणि अवडंबरे आणि विधी कुणास हवे
शिवाय जे दांभिक, असत्यवचनी अन फसवे,
जेव्हा धर्म होतात केवळ चलनी बाजारू नावे ?

(मूळ इंग्रजी कवितेचे लेखकाने केलेले मराठी भाषांतर: पहा दुवा )



~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 08, 2009

होळी पौर्णिमा


कलणारे तालवृक्ष
चंद्राचे पूर्णबिंब
प्रकाशाच्या रजईत
बासरीचे संगीत
---
(फाल्गून पौर्णिमा १९७६)

(छायाचित्र: होळीच्या उत्सवात भिल्ल आदीवासी सातपुड्याच्या कुशीत)
~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 02, 2009

मी एक घर काचेरी

काचेच्या पारदर्शक पडद्यात
तू आणि तुझ्या छाया बंदिस्त
गुंतावाल्यात पडछायांच्या गार
स्पर्शामध्ये तुझे सान्निध्य हरवते
आसुसलेली ओढ आरशाच्या
स्पटिक नितळपणात मिटते
अंतर केवळ पारदर्शक काचेरी
पद्याचे तुझ्या माझ्यात
उसासे आणि अश्रूत पुसत होत जाते
गारठून टपकणारे
फुटक्या प्रतिमानी भरलेल्या आरासेमाहलावर
अभ्रे येतात
निश्वासांची
आसुसलेली आलिंगने चुंबने नसलेली
गारठतात
गारठते वैफल्य टपकणारे
काचेवर...
मी एक घर काचेरी.
----
वडोदरा
१९६८
(थंड विलायतेतून काचेनं आच्छादलेली घरे उष्ण कटिबंधातील इंडियात आली. नंतर काचेच्या गगनचुंबी इमारती आल्या. त्याबरोबर बरेच काही आले.)



~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape