सातपुड्याच्या कुशीत असाही एक होळीचा उत्सव
भिल्लांचा होळीचा उत्सव पाच दिवस चालतो. गावोगावी मेळे भरतात.नाच, गाणे, संगीत यानी भारलेले. असे मेळे नदीकिनारी अथवा तळ्यांच्या काठी असतात, आणि बाजारपेठेच्या गावी.
होळी आणि वृक्षपूजा हे मूळचे आदीवासी सण आणि परंपरा आहेत असे वंशशास्त्राचे अभ्यासक (कुमारस्वामी) मानतात. नंतर आर्यानी आणि बौध्धानी त्यांचा स्वीकार केला.
------होळी आणि वृक्षपूजा हे मूळचे आदीवासी सण आणि परंपरा आहेत असे वंशशास्त्राचे अभ्यासक (कुमारस्वामी) मानतात. नंतर आर्यानी आणि बौध्धानी त्यांचा स्वीकार केला.
विंध्य- सातपुड्याच्या रांगांमध्ये नर्मदा नदीच्या अनेक उपनद्या वाहतात. इथली जंगले आदिवासींची जीवनरेखा आहे.हजारों वर्षे आदिवासी इथे निसर्गाशी सुसंवाद साधून राहिले।विंध्य आणी सातापुड्याच्या रांगामध्ये भिल्लानी आसरा घेतला. पण आता तेथली जंगलेही नागरी समाजानी संपुष्टात आणली. आणि भिल्लांच्या चरितार्थावरच घाला घातला.
----
भिल्लांची संस्कृति एवढी संपन्न आहे की त्याला जागतिक वारसा समजणे आणि त्याचे जतन करणे आजची निकड आहे. दहा हजार वर्षांहून अधिक या पुरातन जमाती निसर्गाशी संवाद राखून आतापर्यंत जगत आले. पण आता सुधारणेच्या वावटळीत कितपत टिकेल याची शंकाच आहे.
-----
भिल्लांची जमात (community) एकसंध असते. त्यांच्यामध्ये सुसंस्कृत समजल्या जाणारया नागरी समाजाप्रमाणे (society) श्रमाची विभागणी केलेली नसते. प्रत्येक व्यक्ति सारया जमातीचे प्रतिक / प्रतिनिधी असतो। श्रम - विश्राम - अध्ययन - स्वास्थ्य यानी परिपूर्ण आदिवासी माणसांचे व्यक्तिमत्व नागरी माणसासरखे दुभंगलेले नसते.
----
चंद्र माथ्यावर आला की होळी पेटवतात. सारे बायका, पुरूष, मुले गाणी गात फेर धरून होळी भोवती नाचतात. अधून मधून ताडी पिने चालते. नाच गाण्यात ताडी पिण्यात रात्र संपते. दीवार वर येतो. सारे होलीभोवती जमा होतात. म्होरक्या सगळयानी आणलेल्या भाकरया एका मोठ्या बांबूच्या टोपलीत कुस्करून घालतो. त्यात कोंबडीची कच्ची अंडी फोडून घालतात, भाकरीचे तुकडे आणि अंड्यांचा बलक एकमेकात मिसळतात. हा होळीचा प्रसाद, सर्वाना वाटला जातो। आणी होळीच्या उपवासाची सांगता होते.
----
या तरुणानी ल्यालेले श्रृंगार कुतुंबांतील स्त्रीयांचे आहेत. बहुतेक दागिने काचमण्यांचे स्वत:च गुंतलेले असतात.
त्यांच्या बांसरीला पाचच सूर असतात.
मोराची चित्रे बायका मुली अंगावर गोंदून घेतात. तर वाघाला ते वाघदेव मानतात.
----
तरुण युवक युवती आपला पसंतीचे जोडीदार निवडतात आणि मेळ्यातून पळून जातात. मग तरुणाचे आई वडिल मुलीच्या घरी जातात आणि मुलीला मागणी घालतात, मुलीच्या घराच्याना हुंडा देवून दोघांचे लग्न लावतात. यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो. ठिकठिकाणी पाच दिवस हे मेळे जत्रा भरतात. इथे गावोगावीच्या आप्तस्वकीयांच्या भेटी होतात.
----
ज्यावेळी माझे सहाध्यायी आणि सहकारी विलायातेला - अमेरिकेला जात होते आणि तेथेच स्थायिक होत होते तेंव्हा मी दरयाखोरयात - वाळवंटात - विशेषत: आदीवासी जमातीमध्ये भटकत होतो. शोधत होतो नागर समाजापुर्वीचे लोक आजही आहेत, जेथवर माझी पाळेमूळे नक्कीच पोहोचलेली असणार.
आणि माझी जीवानाशैलीच पार बदलून गेली -- कोणतेही विधी संस्कार न करता माझे धर्मांतर झाले म्हणा.मी काढलेली ही छायाचित्रे मी प्रथमच प्रसिध्द करीत आहे. मन फारच अस्वस्थ आहे. वाटते मी काही चूक तर करीत नाही? कारण माणसावर माझा विश्वास असला तरी सुसंकृत समजल्या जाणारया समाजावरचा माझा विशवास केव्हाचा डळमळला आहे.
मी लिहिलेले संशोधित निबंध १: "Tribal housing: Buddha and the art and science of Karavi hut"; आणि २: "Tribal housing and Habitat-2"
१: "Tribal housing: Buddha and the art and science of karvi hut" आणि
२: "Tribal Housing and Habitat-2"
वारली जमातीचे घर आणि परिसर, कला आणि संस्कृति संबधिं असले तरी इतर जमातींना पण लागू पडतात. कृपया वरील दुव्यावर टिचकी मारा.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
तुझे कौतुक वाटतंय.. अजून काय बोलणार.. सध्या मलापण वेड लागलंय या root level ला जाऊन पाहायचं.. पण हातून काहीही घडलं नाहीये..
ReplyDeleteव्हायचंच.. होइलंच कधीतरी.. hope.. hope..hope...
हर्षदा,
ReplyDeleteआयुष्यभर चालतो हा शोध - शिकणं! हा तुमच्या - माझ्या स्वायत्ततेचे स्वात्यंत्र आहे.
-रेमी
पुष्टि: आजच्या धकाधकीच्या काळात कुणाला आहे एवढे धैर्य - असा विचार पण करायचे. (थोडीशी तुरट चव! )
ReplyDeleteWe would love to know more about tribals... We are going through the links provided.
ReplyDeleteआभारी.
ReplyDeleteआपण मराठी/ देवनागरी वाचू शकता याचा फार आनंदही झाला.
भिल्लांच्यावर आणखी लिहायची इच्छा आहे.
रेमी
या शब्द-चित्रांत एक वस्तुस्थिती लक्षांत येते, जी नेहमीच दुर्लक्षित राहिली.
ReplyDeleteआदिवासी आणि लहान मुलाना ऑडियो आणि विडियो IPL - टीवी वगैरे पाहण्याची - ऐकण्याची कधीच गरज वाटत नसते.
अशा अक्रिय मनोरंजनाची गरज भासते ती शहरी समाजाला.
शहरी लोक मुलाना टीवीवर होणारया नाच- गाण्यांच्या स्पर्धेत भाग घ्यायला प्रत्साहित करतात. पण स्वतंत्र विचार आणि निर्मिती करायला किती लोक प्रोत्साहित करतात?
लहान मुलाना कचकड्याच्या बाजारू खेळण्यामध्ये रस नसतो. तीं उत्स्फुर्तपणे गातात नाचतात, कहाण्या रचतात. घर परिसरातून ते स्वत:चे खेळ शोधून काढतात. विटीदांडू, लगोरया, सूरपारंब्या हे खेळ मुलानीच शोधून काढले असणार नक्कीच. IIT च्या पदावीधरांनी नाही.
आणि मुलांना खेळायला छोटी मैदाने पुरवायला सरकारला कुठे भान आहे? शरद पवार IPL मागे लागलेत!
"नर्मदेची बाळे" हे छायाचित्र किती बोलके आहे!
आपल्या वस्तुनिष्ठ टिप्पणी बद्दल आभारी.
ReplyDelete