वासुदेव, गोंधळी, गोसावी इत्यादि संप्रदायांचे लोक आता उणे होत चालले आहेत.
वरील छायाचित्रातील वासुदेव राहत्या घरांच्या गल्ल्यातून मोकळ्या आवाजात गात चालला होता; ओव्या, भजने, भारुडे इ. दिवाळी नुकतीच आटोपलीय.
मी जेव्हा त्याला फोटोसाठी थांबवले तेव्हा त्याने विचारले, "वार्ताहर का?"
मी म्हटले, "नाही. एक भावीक." मी त्याला बिदागी दिली.
या पंथांच्या लोकाना "भिक्षेकरी" म्हणतात. त्यात अर्थातच लाजीरवणे काही नाही. पण ते सार्थ सुद्धा नाही. गौतम बुद्धाचा भिक्षा मागायचा वाडगा सुप्रसिध्द आहे. आजच्या वैश्यवृत्तीच्या युगात भिक्षा मागणे हीन समजले जाते. मी भिक्षा नाही म्हणत, "बिदागी" म्हणतो.
या साऱ्या इंडियाच्या आदिमप्रत (archetypes) परंपरांचा भाग आहेत. या समाजधारणेतून निर्माण झाल्या होत्या. बारा बलुतेदारांप्रमाणे लोक यानापण बिदागी अजूनही देतात.
११० - ११५ करोड़ लोकवास्तीत कितिकाना मोबाईल फ़ोन / टेलीविजन / आयपोड़ घेणे परवडते?वासुदेव म्हणजे चालता बोलता ग्रामोफोन / रडियो / वाकिटाकी / रिअलिटी शो!
वासुदेवांची गाणी लोकासाहित्याचा एक भाग आहे.
परंपरेच्या नावाने चाललेल्या गोंधळात परंपरागत गोंधळी मात्र सामील होत नाहित. परंपरेच्या नावाने चाललेले राजकारण त्याना पक्के माहीत असते. असे राजकारण समाजधारणेला नव्हे तर समाज-विघटनाला मात्र हातभार लावते. मराठी सत्तेच्या काळात गोंधळी पोवाडे गाऊन लोकजागृतीचे काम करीत होते.
वासुदेवाच्या गाण्याचा एक नमुना:
दान पावलं ऽ दान पावलं ऽ
पंढरपुरामंदी इट्टोबारायाला
कोंढणपुरामंदी तुळजा ऽ बाईला
जेजुरीमंदी खंडोबारायाला
सासवडामंदी सोपानदेवाला
(वरील गाण्याचा संदर्भ: भारतीय संस्कृतिकोश, संपादक: पं. महादेवशास्त्री जोशी, पृ. ६३१-६३२)
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
वा, छान पोस्ट आणि माहीती
ReplyDeleteरेमी साहेब: तुमच्या स्तंभाचे वेगळेपण अशी माहिती देऊन तुम्ही राखून आहात.
ReplyDelete'कुंकू' चित्रपटात जरठ-पती केशवराव दाते तळमळत पडले असताना एक असाच भटका फ़कीर एक सूचक गाणे गात ज़ातो : 'सुखशयनी शय्येवरती बेचैन जेवाची होई'; ते संगीतकार केशवराव भोळे यांनी स्वत:च फार छान गायले आहे.
त्याच चित्रपटात बाल-वधू शान्ता आपटे दु:खाने घेरली असता तिला आशेचा सन्देशही पाठीवर घर असलेल्या गायकाकडूनच मिळतो : मन सुद्ध तुझं, गोष्ट आहे प्रिथिवी-मोलाची. (http://www.youtube.com/watch?v=qqN-EpUdtaw)
१९८० च्या सुमारास असेच एक गायक गावोगाव भटकत. त्यांचे नाव आठवत नाही, पण आम्ही काही मित्रांनी थांबवून त्यांच्याकडून बालगंधर्वांची पदे ऐकली होती. ते छान गात.
तुम्ही लिहिल्याप्रमाणे या परंपरा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कालाय तस्मै नम:, असेच आता म्हणायचे.
- नानिवडेकर
अनिकेत,
ReplyDeleteमनापासून आभारी. मला मराठीचा अभिमान तर आहेच, त्याबरोबरच तिच्या मुलांचाही, मग त्याना भिक्षेकरी म्हणा कि संत म्हणा. त्यांच्या पुढे माजा "क्लासच" नाही.
-- रेमी
श्री. नानिवडेकर,
ReplyDeleteसाहेबांचे दिवस गेले. नुसतं 'रेमी' म्हटलं तरी चालेल. इथं वयाचा प्रश्न नाही. असो.
मी फारसं मराठी वाचलेले नाही किंवा सिनेमे नाटके पाहीलेली नाहीत. पण जे काही पाहिलं, ऐकलं, वाचलं त्यानी मला धन्य वाटलं.
तुम्ही म्हणता ते खरं आहे. जेवढं जसं जमेल तसं लिहायचे: सवड आहे पण वेळ नाही.
तुम्ही दिलेल्या महितीने या प्रश्नाच्या सीमा मात्र वाढल्या. वाचकांच्या वतीने पण मी आपला आभारी आहे.
-- रेमी
वासूदेव आणि मुंबइत .. नवल नाही हाईटच झाली बुवा... अजुनतरी विश्वास बसतो आहे पन अजून ४-५ वर्षानी "वासुदेव" म्हनजे काय? असा मुलभुत प्रश्न नवीन पिढी विचारेल?
ReplyDelete(रेमीजी आम्ही तुम्हाला म्हटले होते ना की आम्ही इकडे वारंवार येत राहु... असेच लीहित रहा... आम्ही येत राहु..)
सचिन,
ReplyDeleteतुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे, निदान शहरात तरी.. खेडेगावात आता काय परिस्थिती माहीत नाही.
-- रेमी