January 06, 2010

शब्दगाऽऽरवा : हिवाळी अंक (अभिप्राय)

शब्दगाऽऽरवा : हिवाळी अंक - आंतरजालावर ही कल्पना नाविन्यपूर्ण, आणि विषयांची विविधता दोनही युक्त वाटले.
लेखनासोबत छपाई (print) करण्याची सोय उचित आहे. निदान माझ्यासारख्याना जे स्क्रीनवर वाचायचे टाळतात.
अन् कविता लहान असो कि लांब - ती निवांतपणे कागदावर वाचायची गोड़ी वेगळीच.
तसे पाहता आम्हाला सर्वच ऋतूंचे सारखेच कौतुक.
सृष्टी किती छान नाही! माझ्या आजीसाराखी ती पण कधी नेमाने गोल गोल फिरायला कंटाळत नाही. शिशिरानंतर वसंत येणार! वानसे किती नशीबवान. त्यांच्या आयुष्यांत सारे ऋतु नेमाने येतात. माणसांचे तसे नाही. साहित्याचे तसे काही व्हायला नको!

एक सूचना: विषय / लेखक यांच्या यादिबरोबर शिर्षकांची यादी जोडली जावी असे वाटले.
हिवाळी जोडलेल्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.

माझ्या जालानीशीवर हा अभिप्राय वाचकांसाठी प्रसिध्द करतोय. हा अंक अवश्य वाचावा.

~~~~~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment