January 12, 2010

निवारा धेनू: मुंबईत आपला परिसर


-------

कृषीप्रधान इंडियात / भारतात बहुसंख्य (majority) जनतेचा गाईगुरें - गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, उंट इत्यादी - सर्वाथाने "निवारा आहेत. ईथेच नाहीत तर दुनियेतल्या अनेक प्रदेशांत, आजही.

"कल्पवृक्ष" जसे नारळाचे झाड, बांबू जसे "जीवनसंगीत", त्याचप्रमाणे गाय ही "कामधेनू" आहे. दृष्टा श्रीकृष्ण म्हणूनच की काय गाईच्या शेजारी उभा राहून बांसरी वाजवणारा "गोपाळ" झाला. ही श्रध्दा जगण्याच्या व्यवहारातून आली असावी.

हल्लीच्या काळात अप्पा पटवर्धन यानी सुमारें साठ वर्षांपूर्वी कोंकणातील कणकवली शहराच्या शेजारी "गोपूरी" आश्रम सूरू केला होता. तेथे त्यानी शेणापासून उर्जा (biogas) खत करण्याचे प्रयोग केले होते.

गाय आणि भात यांचे गृहसंवर्धन (domestication) मानवाने आजच्या चीन, इंडिया इ। देशात सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी केले। त्याच दरम्यान तैग्रीस युफ्रेटीस नद्यांच्या परिसरात शेळ्या, मेंढ्या, गहूं इत्यादींचे गृहसंवधन केले. याला कृषीक्रांती म्हणतात, जी जगभर पसरली. आधुनिक परिभाषेत या गृहसंवर्धनाच्या प्रक्रियेला "जैव प्रौद्योगिकी" (biotechnology) म्हणतात.

त्यानंतर सुमारे पांच हजार वर्षानी आली नगरे आणि नागरी समाज (civilized societies). याला संशोधकानी नागरी क्रांती (urban revolution) असे नाव दिले. हा मानवजातीवर झालेला पहिला आघात.

त्यानंतर सुमारे पांच हजार वर्षानी विलायतेत औद्योगिक क्रांती (Industrial Revolution) आली. त्याबरोबरच औद्योगिक क्रांतीचे शस्त्र घेऊन आला साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद, आणि जगभर पसरला.हा केवळ मानवजातीवरच नव्हे तर सर्व जैव-अजैव सृष्टीवर झालेला दुसरा आघात.

कल्पना करुया, जर कधीकाळी इंडियात / भारतात औद्योगिक क्रांती शंभर टक्के यशस्वी झाली तर काय होईल?

समासात राहणारे ८० ते ९० कोटी लोक उपासमारीने किंवा यादवी युध्दात (दुसरे महाभारत) नेस्तनाबूद होतील; शेती करयला जमीन उरणार नाही कारण तेथे आता वाळवंट झाले असेल किंवा ती प्रदूषित झालेली असेल. उरलेले लोक अन्न आयात करतील वा प्रयोगशाळेत केलेल्या "मृदाविरहीत रासायनिक जलशेती"वर (hydroponics) जगतील.

मुंबईत पांढरपेशे भाविक, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून "गाईला चारा" देतात. ईतर शहरांतपण देत असतील. कोंकणात ईतर ग्रामीण भागांत हा विधी मी कधी पाहिला नाही. महाराष्ट्रात पोळ्याचा सण आहे. वसूबारस - गाईंच्या वासरांची आश्विन शुध्द द्वादशीला पूजा करण्याची प्रथा आहे.

लोक गाईगुरांचे शेण घरासाठी वापरतात, इंधन म्हणून वापरतात, शेतात खतासाठी वापरतात, आणि गाईचे शेण अग्निहोत्रासाठी वापरतात.

धनगराना त्यांच्या शेळ्या आपापल्या शेतात बसवण्यासाठी शेतकरी बोलावतात. शेळ्यांच्या लेंड्या-मूत्राने शेताला खत मिळते. शेळीचे दूध आणि त्यांच्या गोठ्यात राहिल्याने क्षयी रोगी बरा होतो... लहानपणी शाळेत असताना वाचलेली "अब्बूखांकी बकरी" ही हृदयस्पर्शी गोष्ट आठवते: तीचे तात्पर्य, बकरी त्याचा "निवारा" होती.

उगाच नाही "गोधन", "पशूधन", "कामधेनू", "कल्पवृक्ष" हे शब्द देशी भाषांतून प्रचलित झाले. हे किंवा असे शब्द इंग्रजी भाषेत आहेत का मला माहीत नाही. मूलतः भाषा ही संस्कृतीच्या अनेक अभिव्यक्तिंपैकी एक आहे. आणि संस्कृती (culture) नेहमीच स्थानिक असते, जागतिक नसते. "जागतिक संस्कृती" ही कल्पना चूक असून दिशाभूल करणारी आहे. फक्त "व्यापार" जागतिक असतो.

कोणत्या देशी / परदेशी शस्त्रज्नाने पशूधनाचा आर्थिक / "पर्यावरण-पारिस्थितिकी-ऊर्ज" यांच निर्देशांक शोधून काढलाय? "गाईला चारा" घालताना किती जणांच्या डोक्यांत हे विचार येतात? श्रध्दा आणि अंधश्रध्दा यामधली रेषा फार नाजूक असते. तथाकथित आधुनिक सुधारकसुध्दा अंधश्रध्देने भारलेले असतात; ते तर्काच्या अंतापर्यंत कधी जात नाहीत.

- - - - -

- - - - -
(ही व्यत्यासकथा फारच लांबली; पुरे करतो.)
* * *

टीप: शेण या विषयावर पुढील दुव्यांवर अधिक वाचा:
1. Clay–Cow dung Grain Silos of Saurashtra, Gujarat

2. Cow dung, Rice and Amartya Sen (a critique): Challenges of 21st Century

3. Collecting cow dung for Energy 3

4. Collecting cow dung for energy 2

5. Collecting cow dung for energy

6. Cow-dung for Sustenance in India

~~~~~© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

6 comments:

 1. > याला संशोधकानी नागरी क्रांती (urban revolution) असे नाव दिले. हा मानवजातीवर झालेला पहिला आघात.
  >---

  आपली प्रगती करावी, ही माणसाची इच्छा असते. ऐहिक गोष्टींतही माणूस ती करू पाहतो, आणि मानसिक पातळीवरही. या दिशेनी मानवज़ातीनी शास्त्रांत आणि कलांत केलेला पराक्रम अचाट आहे. त्याला मी 'आघात होणे' म्हणणार नाही. बदल होत गेला नसता, तर मानवज़ात कशावरून ३,००० वर्षं आधीच नष्ट झाली नसती? हे कोणी सांगू शकत नाही.

  मात्र माणूस ज़ात्याच हावरट आहे, आणि त्यापायी मानवज़ात कदाचित नष्टही होईल. कदाचित त्यावर माणूस बुद्‌धिचातुर्यानी आणि नियतीच्या दयेनी मार्गही काढेल. तुमचा सगळ्याच प्रगतीला विरोध दिसतो आहे. पण प्रगतीचा अभिमान वाटण्यासारखं खूप आहे.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 2. गायीच्या शेण ज्या खड्यात साठवले जाते त्यास आमच्या कडे "उकिरडा" म्हनतात, त्या उरड्याच्या आत खुप उष्णता असते. सांधे, हाडे यांचे दुखणे बरे होण्यासाठी हात पाय त्या उकिरड्यात गाडून घेनारे मी लहान पनी पाहिलेले आहेत. याशिवाय गोमुत्राचेही अनेक फायदे आहेतच..
  .
  श्री क्रुष्णास "गो-पाल" का म्हनायचे हे मला तुमच्या ह्या लेखातुंनच पहिल्यांदा उलगडे.
  .
  संस्कृती ही स्थानिक असते, जागतिक नसते. हेही पटले.
  .
  पन.. नागरी क्रांती, आणि त्यानंतर आलेली ओद्योगिक क्रांती यांनी मानव जातीवर अघात केला असे मला आजुनतरी वाटत नाहि, (भविष्यात कदाचित हे सारं सोडून परत क्रुषीकडेच लक्ष द्यायलाही लागेल).. पन ह्या विकास प्रक्रियेत निसर्गावर, आनी समस्थ प्राणीजातीवर "आघात" झाला हे मात्र नक्की... फक्त मानवजातीलाच त्याचा सर्वाधिक फायदा होतोय हेही नक्कि.

  गाय, शेळी, मेंढ्यां, बैल असे जे मानवउपयुक्त (पशुधन) प्राणी आहेत त्यांचे "जगने" तरी अजून व्यवस्तित चालू आहे, इतर कैक प्राणी जमाती मानव नष्ट करतो आहे त्याचे काय?
  .
  साळसूद पाचोळा.

  ReplyDelete
 3. नमस्कार, नानिवडेकर,
  प्रगती जर वैश्विक नसेल व केवळ आज आहे तशी जागतिक असेल तर तिला "प्रगति" कसे म्हणावे? आजही अश्मयुगात जगणारे मानव आहेत.

  आध्यात्मिकता व सामाजिक बांधिलकी मला वन्द्य आहेत. पण धर्म, शास्त्रे, कला ही जीवनापेक्षा कधीही श्रेष्ट असू शकत नाहीत.
  नगरे मूलत: सत्तेच्या केन्द्रीकरनाचे लक्षण आहेत, तर नागरी समाजाचे "श्रमाची विभागणी" हे मूलभूत लक्षण आहे. याला इतिहास साक्षी आहे.

  कारण व परिणाम या न्यायाने सद्यास्थितिकडे पाहिले तर हे सहज लक्षात येईल.

  कृपा करून "Lowest Common Multiple: Arithmetic in Real Living" और (" Work-Leisure - Health - Learning - Prpagation") ही माझी इंग्रजी लेखमाला माझ्या "Archetypes India" ब्लॉगवर जरूर वाचा. आणखी धक्के लागतील. आपल्या प्रतिक्रिया-अनुक्रिया यांची नोंद पण जरूर करा.

  तुमच्या प्रांजल मताबध्दल आनंद झाला.

  -- रेमी

  ReplyDelete
 4. नमस्कार सचिन,
  तुमच्या नागरी क्रांती संबंधीच्या विचाराना मी माझे उत्तर दिले आहे. श्री नानिवडेकर यांचे विचारही तुमच्या सारखेच आहेत.

  पण मी आपल्याला विनंती करतो: माझ्या या ब्लॉगवर माझा एक प्रबंध आहे, हा तीन भागात हल्ली सुधारून पुन्हा प्रसिध्द केलाय. (1: Garden under a Glass Cage…, 2: Built Environment and Biodiversity, 3: But who will bell the Cat - the Bureaucrats?)
  त्यात नागरी क्रांतीवर खुलासेवार लिहिलेय. तो जरूर वाचा व आपला अभिप्रायाची नोंद करा. तो तेव्हा पण कुणाला पसंत पडला नसावा. काही हरकत नाही. व मला अजिबात मतानिभिवेश नाही.
  आभारपूर्वक
  --रेमी

  ReplyDelete
 5. श्री डिसोजा : या विषयात मला तसा कमी रस आहे, म्हणून मी खूप काही लिहू शकणार नाही. पण सुरवातीला तरी माणसानी बर्‍याच गोष्टी सद्‌भावनेनी केल्या. उदा. प्लॅस्टिकच्या पिशव्या पॅसिफ़िक सागरात प्रश्न निर्माण करतील, याची आधी कल्पना नव्हती. ती कल्पना आल्यावरही माणूस त्या पिशव्या वापरतो, हे मला मान्य आहे. पण असा पदार्थ तयार करणार्‍या शास्त्रज्ञांबद्‌दलही मला आदर आहे.

  या सृष्टीत दोन ज़ीवांमधे अनेकदा झगडा चालतो, हे सत्यही नाकारता येणार नाही. मी आर्थिक लाभासाठी अभयारण्यात जाऊन, कायदा मोडून वाघ मारणार नाही, पण जगात चारच वाघ उरले असतील आणि माझ्या वस्तीला त्यांचा धोका असेल, तर मी ते खुशाल मारीन. आपण गायींना किंवा हरिणांना खात राहिलो तर त्या ज़माती नष्ट होतील याची वाघसिंह काळजी करतात का? इतर प्राणी असे अप्पलपोटे असतात, आणि तसाच माणूस. हे चालायचंच.

  - डी एन

  ReplyDelete
 6. श्री. डी एन,
  भाषण ० लेखन जेव्हा संभाषण होते तेव्हा अमूर्त कल्पना - विचार बदलून स्फटिक बनतात. हा आनंद मला तरी मोलाचा वाटतो.
  मी जे लिहिलेय बहुतेक भारत / इंडिया या उघड्या पुस्तकात गवसले, थोड़ेफार पुस्तकात सापडले.
  तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पश्चिमेत प्रथम रासायनिक खते वापरायला सुरवात केली. मग पर्यावरण क्रांती आली, अन् पुन्हा ते जैव / सेंद्रीय शेतीचा (organic farming ) प्रचार करू लागले. अशा एक दोन नह्हित भाराभर मुध्दे आहेत.
  --रेमी

  ReplyDelete