March 04, 2010

लघु्तम साधारण विभाजक : जीवन-व्यवहारात अंकगणित


---

लघु्तम साधारण विभाजक ( सा वि) : जीवन-व्यवहारात अंकगणित

प्राथमिक शाळेत असताना मास्तरानी आम्हास "लघुतम साधारण विभाजक" (लसावि) शिकवला. का शिकवला ते सांगितले नाही. त्याचा व्यवहारात उपयोग काय ते पण सांगितले नाही.
गोऱ्या सायबाने सांगितले, आणि आम्ही मागे मागे शिकत गेलो, मेंढरासारखे, माकडासारखे, पोपटासारखे. अजूनही आम्ही भविकपणे तेच करतोय. तेव्हा मी कोंकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या जन्मगावी शिकत होतो. माझे शालेय शिक्षण मराठी भाषेतच झाले. कोंकण म्हणजे जैविक विविधतेने नटलेला जगातील सुप्रसिध्द प्रदेशापैकी एक.

त्यावेळी पण आम्हा पोट्ट्याना ठाम माहीत होते, शेतात पेरलेल्या भाताचे एक बीं रुजले की त्याच्या रोपाला पंचवीस-तीस दाण्यानी भरलेली लोंबी येते. वडाची इवलीशी बी रुजली की लाखो फळे देणारा महावृक्ष तयार होतो. त्याच्यावर शेकडो पक्षी आसरा घेतात, पोट भरतात. त्याच्यावर ब्राह्मण - समंध येऊन राहतात.

या साऱ्याचा "लसावि" - "लघुतम साधारण विभाजक" काय?

वयाची पहिली 2+ / १०/ १२/ १५/ १७ वर्षे मुले / तरुण शाळांत / महाविद्यालयात जसे जेवढे परवडेल तसे आपापल्या ऐपती प्रमाणे शिक्षण घेतात. पण त्यानंतर त्या शिक्षणाच्या आधारे आपले पोट कसे भरावे त्याना माहीत नसते किंवा कळत नाही. त्याना माहित असते, त्यासाठी "नोकरी" मिळावया हवी असते, नशीब हवे असते, वशिला हवा असतो, लाच द्यावी लागते. किंवा हे सारेच लागते. (त्याना पण " सा वि" चा आयुष्याच्या अंकगणितात काय उपयोग -- अगदी पदवीधराना -- पण माहित नसते.)

तोवर त्यांची पंचवीशी उलटून गेलेली असते. म्हणजे आयुष्याचा (अत्यंत जोमाचा) तिसरा हिस्सा निघून गेलेला असतो. देशातील तरूण पिढीच्या मानवी उर्जेचा केवढा अपव्यय!

तसे कारागिरांच्या - शेतकरी, सुतार, लोहार, गवंडी, कोष्टी... आणि व्यापारयांच्या मुलामुलींचे होत नाही. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत ते आपापल्या कुटुंबाच्या कलेत, पेशात, उद्योगात ते पारंगत - पदवीधर होतात. पंधरा वर्षांपर्यंत बाल्यही संपते आणि यौवनात पदार्पण. दोघेही स्वत:च्या पायावर उभे राहावयास तयार. मग योग्य वयात - अठराव्या वर्षी - लग्नाची तयारी.

या सर्वात "लसावि" काय?
-----------
हा "सूतोवाच". ही मालिका क्रमश: पुढील आठ / नुऊ भागात प्रसिध्द करावयाचा विचार आहे. शिक्षण आणि त्या अनुषंगाने इतर अनेक प्रश्न तुम्हाला / मला / सर्वानाच अगत्याचे आहेत. आपल्या सर्वांच्या मनमोकळ्या प्रतिसादाची आशा करतो.

या मूळ मराठीचे इंग्रजी भाषांतर माझ्या इंग्रजी ब्लॉग Archetypes India वर आठ भागांत प्रसिध्द केलेय. आपण ते पण जरूर पाहू शकता.
(Links to English Posts: 1. Arithmetic in Real Life, 2. Dharma or Fundamental Law by Nature, 3. WORK - Breaking the Mind Block, 4. Leisure - Perpetual Crave for Rest, 5. LCM-5: HEALTH - Forgotten Nature Within and Outside, 6. LCM-6: Learning to Learn,
7. LCM-7: PROPAGATION or Survival of the Species 8. LCM-8 A great epoch fiels at a tangent


क्रमश:

~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment