April 02, 2010

अन्नपूर्णा चुलीजवळ

 अन्नपूर्णा  चुलीजवळ


माझ्या चुलीजवळ भेटतसे मी
आप्तांस आत्ता नि पुनरपी निशीदिनी;
अन एक नि:शब्द संवाद घडतो
समर्पणांत नि बलीदानात;
ते नेती मजसी दूर निवासीँ
जेथ असती नवखे मानुष - मानुषी,
नि अविरत परिश्रम प्रेमाचे निरामय
मातीत, पाण्यात, ऊन-हिंव-पावसात.

माझ्या लहानग्या सैपाकघरी बरोबर
समर्पितो आम्हास आम्ही यज्ञवेदीवर
जगण्यात - वाढण्यात - मरण्यात
बरोबरीने अनुरागे त्यागात.
इथे विस्तारते एक वैश्विक गीत
जे घेऊन जाई मज नवख्या मुलुकात.
*    *    *

(मूळ इंग्रजी "At my little kitchen" या कवितेचे भाषांतर)
हल्लीच जागतिक महिला दिन "प्रथम जगत" देशांत संपन्न झाला. त्याचे दुनियेतील तृतिय व चतुर्थ जगात काय प्रयोजन आहे ते माझ्या अल्पमतीस समजले नाही.
आपल्या देशात पण तो साजरा झाला, तसेच केंद्र सरकारने शासनात (म्हणजे लोकसभा, विधानसभा इ.) महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाचा ठराव आणला.
इथपर्यंत महिलांची वर्णी लागली. यापुढे ते कसे राबवले जाईल हे बघायचे.
सरकार म्हणजे शासन (legislation), प्रशासन (administration), व न्यायसंस्था (judiciary), या सरकारच्या तीन शाखांत या बिलाची व्याप्ती काय असेल व ती कोण ठरवणार हाही एक मूक प्रश्न राहतो. हाताच्या काकणाला आरसा कशाला? ~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment