April 24, 2010

मुक्काम मुंबई - पोस्ट इंडिया : मुंबईत आपला परिसर

आजचा  २४- ४- २०१० दिवस "राष्ट्रीय पंचायती राज दिन"  म्हणून साजरा करा असे केंद्र सरकारने जाहिर केलेय.  

मुक्काम मुंबई, पोस्ट इंडिया 
 आज इथे, उद्या माहीत नाही  
यही मुंबै मेरी जान 
आय लव माय इंडिया  
वगैरे वगैरे 

साठ वर्षे : रोज विस्थापितांचे लोंढे सर्व प्रदेशांतून शहरा शहरांत महानगरांत येतात, बकाल जीवन जगतात. 

साठ वर्षे कोणत्याही सरकारने - राज्य वा केंद्रात -   कोणत्याही झेंड्याच्या - रंगाच्या - पंथाच्या - नेत्यांच्या  कोणत्याही पक्षाने, या समस्येवर तोडगा काढलेला नाही.
त्यांच्या घोषणा थांबत नाहित. कोणतेही विधायक काम सुरू झाले तर तडीस जात नाही. असे आहेत हे आजच्या आधुनिक "महाभारताच्या" यादवी युध्दाचे लेखक.

पांडित्यपूर्ण प्रबंध लिहून ही समस्या कधीच सुटणार नाही. प्रकासशाकांचे मात्र खिसे भरतील, व लेखकाना सन्मानाचे किताब / बक्षिसे मिळतील.    

अब्जावधी रुपये खर्च करून कितीही सिनेमे - धारावाहीक मालिका काढल्या तरी या प्रश्नाला टेंगूळ पण येणार नाही. वितरकांचे खिसे मात्र भरतील, व कलावंत वार्षिक बक्षिस समारंभात संगीत खुर्चीचा खेळ खेळतील.       

IPL चा सद्या चाललेला घपला तर विचारूच नका! अकरा क्रिकेटपटू अकरा मिलियन (११० कोटी) लोकांचे हीरो झालेत. आणि सर्व अवतारी महापुरुष देवघराच्या बंदीवासात  राहिले!      

कोणत्या पंचायती राज्याच्या या घोषणा? देशात सुमारे सहा लक्ष खेडी आहेत. त्यांची वार्षिक आवक किती असेल? बोलीवूड, दूरचित्रवाणी, क्रिकेट राहू दे हो बाजूला. केवळ  केंद्र वा राज्य सरकारे - शासन, प्रशासन व न्याय संस्था - चालवायला वार्षिक खर्च काय? सरकारी खर्च खर्व-निखर्वानी भरेल. या सहा लक्ष गावांवर (सुमारे सत्तर कोटी व्यक्ति) केलेल्या खर्चाच्या लक्षावधी / अब्जावधी पटीने असेल!   

आहे! उत्तर आहे!! सर्व मानवनिर्मित प्रश्नाना उत्तरे आहेत!!! 
एकच उत्तर: सर्व गावाना स्वायत्तता द्यायची, म्हणजेच 
सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे. 
पण हे उच्चभ्रू वर्गाला पचन होणार नाही. हे पण आम्हास माहीत आहे. फक्त कायदे करायचे, कागदोपत्री लिहायचे; आणि म्हणायचे हे सर्व आम्ही अंमलात आणलेले आहे. थोडक्यात जनसामान्यांच्या तोंडाला पाने पुसायची. 

|| जय हो ||

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment