मनोगतः कबीर ते तुकाराम या सुमारे तीनशें वर्षांच्या काळात सर्व देशभर अनेक भाषांत अनेक संतकवी झाले. तेव्हा (अन आताही) सामान्य जनांसाठी पाठशाळा नव्हत्या. संतांसाठी प्रसारमाध्यमे व राजाश्रय नव्हते. तरीही आजपावेतो लाखो लोकाना ते तोंडपाठ आहेत. त्यांच्या रचना लोकभाषेंत आहेत; त्याना गेयता आहे; ध्यानात ठेवायला सोप्या. व सर्वात महत्वाचे, त्या लोकाभिमुख आहेत. कथा, कीर्तन, भवई इ. माध्यमे आणि संतकवी हे जनसामान्यांना आजही चालत्या बोलत्या पाठशाळा आहेत. साळसूद पाचोळा यांनी केलेल्या टिप्पणीने पुढील तपशील लिहिण्यास मला प्रवृत्त केले. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.
आता आमचे राज्य आहे. आजच्या कालमानाप्रमाणे ज्याना ज्या लोकशिक्षणाची अत्यंत निकडीची गरज आहे त्याना ते मिळते का? असे शिक्षण देण्यासाठी अनेक माध्यमे पण उपलब्ध आहेत. मग घोडं कुठं अडलं? संत कि बुवाबाजी ते जावू द्या,
सामाजिक बांधिलकीची माझ्या परीने जाणीव ठेऊन गेल्या काही वर्षात शिक्षण या विषयावर वेळोवेळी लेखन केले. मी माझ्या परीने काही प्रश्र्नांची युक्त उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
त्यातिल काही लेख नियतकालिकांत प्रसिध्द झाले. काही माझ्या इंग्रजी ब्लॉगवर प्रसिध्द केलेले आहेत. त्यांचे दुवे पुढे देत आहे. कृपया ते अवश्य पहावे.
1. Indian Schooling
2. Farming and the Politics of Education in India
3. Politics of Literacy in India
शिक्षण या विषयावर एकूण २७ लेख आहेत. इंग्रजीची एलर्जी नसल्यास जरूर वाचा.