जाल ऑक्टोपस रेमीचे (स्वप्रतिमा):
कला आणि/की व्यत्यास-कथा
कला आणि/की व्यत्यास-कथा
विलायातेत ऑक्टोपस पॉल एक दिवस अचानक प्रकाशात आला. निमित्त काय तर हल्लीच झालेल्या जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निकालांचे त्याने केलेले भविष्य खरे ठरले. आणि प्रथम जगत देशांत एकच खळबळ माजली.
ट्वीटरवर संदेशांची एवढी नोंदणी झाली की त्या गर्दीमुळे ट्वीटर साईट काही तास बंद पडली. एवढा अंधविश्वास, की श्रद्धा! तोही पुढारलेले समजल्या जाणार्या समाजात! विलायतेत एका देशाच्या सरकारने तर त्या जनावराला विकत पण घ्यायची तयारी दाखवली.
रेमी डिसोजाची 'जाल' (Tentacles) ही स्वप्रतिमा ब्लॉगवर प्रसिद्ध झाली. पण कुणाचा केसही हालला नाही. रेमी सहसा स्वत:ला कधी आरशात पाहात नाही. कारण त्याला ऑक्टोपस दिसतो. मग मुंबई महानगरात भटकंती करताना त्याचे काय हाल होत असेल बरे?
कॉंक्रीटच्या या जंगलात कांचबंद गगनचुंबी इमारतींत गिळंकृत झालेली बकाल वस्त्यांतील लक्षावधी माणसे (त्याचे आदिवासी व किसान सगे-सोयरे) त्याला दिसतात. पण मुंबईचा कारभार मात्र कधी ठप होत नाही.
ऑक्टोपस पॉल तेव्हा बच्चा होता. त्याच्या जमातीला व निसर्गनिवासाला मुकलेला. काही महिन्यानंतर तो मरण पावला.सुटला बिचारा!
ऑक्टोपस पॉल मरण्यापूर्वी त्याला कोणी पुढील भविष्य विचारल्याचे ऐकिवात नाही: "काही शतकांतच झपाट्याने अत्यंत बलवान झालेला हा आधुनिक औद्योगिक समाज (Industrial Civilization) कधी विनाश पावेल?"
अहो विचारता काय! बलिष्टांच्या बलस्थानांत त्यांचे मर्मस्थान असते. भस्मासुराची गोष्ट पुन: पुन्हा घडत आलीय. तो बलाढ्य औद्योगिक समाज खरं पाहता ऑक्टोपस पॉलबरोरच गेला.
या स्वप्रतिमेत रेमी स्वत:ला नैसर्गिक पर्यावरण गिळंकृत करताना पाहतो. हा त्याचा दैव दुर्विलास म्हणा, किंवा अनिच्छेने नशिबी आलेला भोग म्हणा, किंवा औद्योगिक समाजावर केलेली प्रच्छन्न टीका म्हणा! शब्द, चित्र, चित्रपट, पोथ्या, पुराणे, अवतार, प्रेषित... सर्व काही करमणुक किंवा कमाई करण्याची साधने. काही फरक पडत नाही.
या चित्रात रेमी स्वत:लाच हसतो!
© Remigius de Souza. All rights reserved.|
'प्रक्षोभ', Outrage, या एका शब्दाने 'जाल' या चित्राचे वा व्यंगचित्राचे वर्णन करता येईल.
ReplyDelete