पायाखालच्या जमीनीपासून
जेव्हा जेथे असें मी तेथून
वर वर चढणारया नजरेत
गोल गोल क्षितिजे सामावत
उंच उंच हिमाद्रीच्या कड्यावर;
इथे अहंकाराचे अस्थिर कड़े - सागर
हरघडी वितळतात - वाफारातात,
विरतात मातीत - अवकाशात.
काळजातली उब पुरेशी होते
कवेत घ्यायला नविन क्षितिजे;
हरघडी विस्तारते स्वत्व माझे.
बंध मातीचा अतूट सामावत
सारी पृथ्वी भाकरीच्या चतकोरात
ओळख उरते धरतीच्या चतकोरात.
~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
छानच. पण शेवट........
ReplyDeleteआशा,
ReplyDeleteअनेक आभार.
फक्त एकच शेवटचा शब्द राहीला: "पायाखालच्या".
पण विचार केला वाचकाना पण मुभा द्यावी.
आता तो शेवट पूर्ण(!) करतो.
शेवटी माझी 'पृथ्वी' व्यावहारिक पातळीवर
सपाटच रहाते ना?
--रेमी