November 03, 2009

लोकगीतांचा मागोवा-२: लोककला आणि अभिजात कला शैली

१.
पंडित कुमार गंधर्व यांची स्फूर्तीदायक आठवण मनात नेहमीच ताजी असते. पंडितजीना त्यांच्या शास्त्रक्रियेनंतर काही वर्षे गायचे नाही असे सक्तीचे पथ्य पलावे लागले. त्या पथ्याच्या काळात ते माळव्यात खेडोपाडीफिरले व अनेक लोकगीते ऐकली - जमा केली.
आणि समकालीन अभिजात संगीताने पंडितजींच्या हिंदुस्थानी गायकीचा नवा आविष्कार अनुभवला. लोक-गीत-संगीताने पुन्हा एकदा अभिजात कलाशैलीत नव्याने पदार्पण केले. (अधिक वाचा: Masters of Timeless Architecture)    

लोकगीते - सर्वच लोककला - यांच्यात अभिजात कलाशैलींचा उगम आहे हे सर्वमान्य आहेच. पण विसाव्या - एकविसाव्या शतकांत असे क्वासिताच घडते. (बॉलीवुड सिनेमाबद्दल न बोललेले बरे.) 

आर्किटेक्चर (वास्तुविद्या किंवा वास्तुउद्योग) [टीप १] या क्षेत्रात शंकर निवृति कानडे, आर्किटेक्ट (वास्तुविद), आता बंगळूर निवासी, याने या क्षेत्रात लोककलेचे अभिजात वास्तुमध्ये परिवर्तन केले. त्याने संशोधित केलेले बांधकाम "छापडी" पध्दति या स्थानिक भाषेतील नावाने कर्नाटकात ओळखली जाते.

माझा लहानपणापासून अनुसूचित जाती-जमातिंशी -- धनगर, महार, चांभार, कोष्टी, कुंभार, सुतार, गवंडी, सोनार, लोहार, इ. --  संपर्क आला. यानंतरच्या काळात कातकरी, ठाकर, वारली, डांगी, भिल्लांच्या वेगवेगळ्या जमातीं मध्ये वेळोवेळी सुमारे तीस वर्षे फिरलो- राहिलो. या काळात त्यांची वास्तु व जीवन शैली पाहिली. त्याचा प्राथमिक आढावा मी "Tribal Housing: Buddha and the Art and Science of Karavi Hut" या संशोधित निबंधात घेतलेला आहे. मी वास्तुमध्ये कोणतीही क्रांति केलेली नाही. मात्र अनेक वर्षांच्या संपर्काने माझी जीवन शैली मात्र बदलली.  
*   *   *

टीप १:  इथे आर्किटेक्चर याचा संदर्भ पाश्चिमात्य पध्दतिशी आहे. जो फरक एलॉपथी व आयुर्वेद यात आहे तसाच आर्किटेक्चर व इंडियन वास्तुशिल्प यात आहे. अर्थात दोनही "वास्तु" आहेत. आधुनिक विलायती वास्तुचा उगम औद्योगिक क्रांतिमध्ये आहे. आणि त्याची मुळें ग्रीक व रोमन वास्तुमध्ये आहेत. इंडियात आलेले आधुनिक आर्किटेक्चर म्हणजे विलायती आधुनिक वास्तुच्या  पुच्छाचे टोकच म्हणा ना. 
गेल्या दशकाच्या काळात आर्किटेक्चर म्हणजे सृजनशील उद्योग (creative industry ) समजले जाते. त्यामुळे त्याला वास्तुशिल्प किंवा वास्तुकला म्हणने आतातरी योग्य ठरणार नाही.  

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

11 comments:

  1. > पंडित कुमार गंधर्व यांची स्फूर्तीदायक आठवण मनात नेहमीच ताजी असते. पंडितजीना त्यांच्या शास्त्रक्रियेनंतर काही वर्षे गायचे नाही असे सक्तीचे पथ्य पलावे लागले.
    >--------

    कुमार गंधर्वांना क्षय झाला होता, आणि फुफ्फुसं कमजोर झाली होती. शिवाय त्यावरच्या उपचारामुळे रोग्यात त्राण रहात नाही. म्हणून त्यांच्या गाण्यावर बंदी होती. माझ्या माहितीनुसार कुमारजींवर शस्त्रक्रिया करावी लागली नाही. मात्र तो आजार बराच काळ चालला आणि त्यांच्या नशिबी लांब संन्यास आला.

    ReplyDelete
  2. माझ्या चुकीमुळे का असेना, कुमारजींचा एक तरी चाहता बोर्डावर आला त्याचा फार आनंद झाला.

    - रेमी

    ReplyDelete
  3. श्री रेमीजीयस डिसोजा : तुम्ही कुमार गंधर्वांचे चाहते आहात, तेव्हा त्यांची एका ज़ुन्या घरगुती मैफिलीवरून काढलेली 'भैरव के प्रकार' की असल्याच कुठल्या नावाची सी डी तुम्ही ऐकली असेल. ऐकली नसल्यास तिच्यात एक शिवमत भैरवात ८-१० मिनिटांची रचना आहे. ती मिळते का हे बघा. मुंबईला कदाचित र्‍हिदम हाउसमधे मिळेल. पण खात्री नाही, कारण सी डी ज़ुनी आहे.

    त्या कुमारजींच्या बंदिशीतला (शिवमत भैरव) एक ३-४ मिनिटाचा तुकडा http://www.sawf.org/Newedit/edit05292000/musicarts.ASP इथे ऐकता येईल. अमीनुद्दिन डागर, बुंदु खान आणि मल्लिकार्जुन मन्सूरांचा भैरव पण ज़रूर ऐका. आणि रविशंकरचा कौशी भैरव खूपच तयारीनी वाज़वला आहे. कुमारांचे भैरवाचे अनेक प्रकार तुम्हाला या लिंकवर ऐकता येतील.

    - धनंजय नानिवडेकर

    ReplyDelete
  4. धनंजय, अनेक धन्यवाद.
    पंडितजी माझे स्फूर्तीस्थान आहेत यात शंकाच नाही. पण गेली वीस वर्षे माझे लक्ष लोककला आणि लोकविद्या यानी आकर्षिलेले आहे. माझ्या इंग्रजी - मराठी ब्लॉग वरील गद्य-पद्य वाचले तर हे तुमच्या व कुणाच्याही लक्षात येईल.
    अन् जसे माझ्या संक्षिप्त परिचयात लिहिल्या प्रमाणे माझे ध्यान निसर्गात व्यक्त होणार्या चमत्कारात वेधलेले आहे.
    याचा अर्थ असा नाही की अभिजात संगीताचे मला पथ्य आहे. कुमार गंधार्वाना ऐकायला मी नेहमीच तयार असतो.
    -- रेमी

    ReplyDelete
  5. तुमच्या स्तंभाच्या मुख्य पानावर दोन चुका आहेत.

    'वृक्षवल्ली आम्हां सोयरी' हे तुकारामवचन आहे. ते तुम्ही ज्ञानेश्वरांच्या तोंडी टाकलं आहे. लताच्या तुकाराम भजनांच्या रेकॉर्डवर हे गाणं आहे. (http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/713.htm)

    ऊस डोंगा परि रस नाही डोंगा - हे शब्द चोखामेळ्याचे आहेत. 'चोखा डोंगा, परि भाव नाही डोंगा' अशा ओळी त्या रचनेत पुढे आहेत.

    'आलापिनी' या पुस्तकात कुमारांचे मित्र वामनराव देशपांडे यांनी त्यांच्यावर दोन दीर्घ लेख लिहिले आहेत. ते मराठीतून वाचणे जास्त चांगले; पण मराठी पुस्तक मिळत नसल्यास त्याची इंग्रजी आवृत्तीही बहुतेक निघाली आहे.


    कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनांची रेकॉर्ड ('झीनी चादरिया', इत्यादि) प्रसिद्ध आहे. पण त्याहीपेक्षा सरस अशी 'त्रिवेणी' भजनांची रेकॉर्ड तुलनेनी मागे पडली आहे. ऐकली नसल्यास अवश्य ऐकणे. त्रिवेणी म्हणजे सूरदास, कबीर, मीरा या तिघांच्या कलेतली निवड. त्यापलीकडे त्या शब्दाला अर्थ नाही. या रेकॉर्डची ओळख म्हणजे तिची सुरवात कुमारांनी लिहिलेल्या स्तुतीपासून होते. 'मैं गाऊँ, पद गाऊँ, गुण गाऊँ' असे शब्द आहेत. नंतर ९-१० अप्रतिम चालींची भजने आहेत. चाली लोककलेवर आधारलेल्या आहेत. तेव्हा ती गाणी ज़रूर ऐका.

    - डी एन

    ReplyDelete
  6. धन्यवाद.
    दोन्ही अभंगांच्या ओळी मी लहानपणापासून ऐकत आलो. तेव्हा मी माझ्या कोंकणातल्या गावी होतो. त्या तुकारामाच्या आहेत हे पण माहीत होते. त्यानंतर लाताजींचे गाणे पण ऐकले. हा ब्लॉग लिहिल्या नंतर तुकारामाचे शब्द बदलून ज्ञानेश्वरांच्या तोंडी घातले. पूर्वी पण हे कुणी अनामिकाने माझ्या निदर्शनास आणून दिले होते. कधीतरी सवडीने दुरुस्ती करेन.
    पंडितजींच्या भजनांची व त्यांच्यावर लिहिलेल लेख मी जरूर मिळवेन.

    पंडितजींवर फिल्म्स डिविजनने काढलेला माहितीपट एकदा पहिला होता. शेवटच्या दिवसांत ते भजन शिकवत होते. त्याविषयी ते म्हणतात. भजन गाणे फार कठीण असते. शिकणारे "तंत्र" साध्य करतात. आणि ते गाणे सपक होते. भजन गाण्यात अर्थ, शब्द आणि सूर - तीनही महत्वाचे असतात. गाण्यात अर्थ "प्रगट" व्हायला हवा. त्यांच्या शब्दात निराशा जाणवत होती: भजन गाणेच नव्हे तर शिकवणे पण अवघड असते.
    धनंजय, 'मैं गाऊँ, पद गाऊँ, गुण गाऊँ' हे शब्द वर लिहिलेले "अर्थ, शब्द आणि सूर" तीन शब्द तर व्यक्त करीत नसावे!! मला तरी वाटते त्रिवेणीचा अर्थ हाच असावा.
    एक विनंती: मी "धरतरी" ही कविता पुन्हा प्रसिध्द करीत आहे. कृपया जरूर वाचा आणि निस्पृह अभिप्राय द्या. पूर्वी ती 'चित्रात' (jpg) होती.
    शुभेच्छा
    रेमी

    ReplyDelete
  7. Shri De Souza: I remember reading on the LP's blurb that 'Triveni' referred to the fact that Kumar G had chosen three saints for the record release. Of course your interpretation is plausible but I don't think the artists had that in mind. (I am not much into poetry, but I will read your words and if I can think of anything to say about it, I will email you my response to it. But please note that I don't much care for poetry and often I just fail to understand it.)

    As for the documentary by Films Division, it is possible that multiple documentaries were made on Kumar-ji. I have seen one, made by Jabbar Patel; I do not remember whether the Films Division was behind it. It shows a very rare VIDEO footage, not just audio but video, of a very young Kumar (age about 14) singing. I think he was filmed singing Raamkali, which Kumar had also recorded on a 78 rpm, and is easily available commercially. While Wadia Film Co was famous around 1940, its supremo's brother, also a Wadia himself of course, was interested in shooting things of specialized interest. One of his scoops was to bring Kumar Gandharva to his studio, and shoot a small recital. I think this documentary can only be seen with special arrangement with Jabbar Patel. I saw it when Patel was visiting California a few years ago.

    - dn

    ReplyDelete
  8. Hi, Anonymous,
    Thanks for your information.

    I refer only to the words 'मैं गाऊँ, पद गाऊँ, गुण गाऊँ” (not Triveni) only to speculate that they may refer to Panditji's words “word, tone and meaning” in the documentary.

    This documentary was, perhaps, prepared as a tribute to Panditji after his demise. From that entire documentary I remember only these three words. By the way, Panditji described his disciples who failed to sing Bhajans, were 'crafty”.

    I love music, but I don't understand classical – Indian or Western. I regret my poetry does not even reach a level of folk-songs, or folk-arts in other mediums. And I expressed my regrets publicly. Hence, call me 'anti-art' if you wish.

    I have not read or heard everything about or by Kumar Gandharva, for that matter no other person, or even Kabir and Tukaram whom I adore most.

    Please do write your response on my poem, in the comments box, no matter brickbats or bouquets!

    Humbly

    Remi

    ReplyDelete
  9. डिसोजा साहेब : कुमार गंधर्वांवरल्या अज़ून दोन लेखांची आणि त्यांच्या एका तबकडीची माहिती देतो.

    त्यांनी १९७३ सुमारास एक ६ रागांची एल पी काढली होती, जी आता सी डी स्वरुपात मिळू शकेल. अशा इतरही तबकड्या कुमारांनी काढल्या. पण सर्वात जास्त संग्रहणीय जिच्या अ बाज़ूवर (Side One) किंवा पहिल्या बाज़ूवर श्री-कल्याण, साधा श्री आणि कल्याण (उर्फ यमन) हे राग होते. अनेक रागांच्या चीज़ा लोककलेकडे आणि निसर्गवर्णनाकडे झुकणार्‍या होत्या. दुसर्‍या बाज़ूच्या पूरिया-धनश्रीचे शब्द सुंदर आहेत आणि ती गायलीही छान आहे.
    आजरा दिन डूबा
    अब तू ध्यान धरियो री
    - सांझ आयी भेदी
    - रंग जो चाहो भरियो री (अंतरा)

    पु ल देशपांडे यांच्या 'गुण गाईन आवडी' पुस्तकात कुमारांवर लेख आहे, पण हा एप्रिल १९७४ मधे लिहिलेला लेख तितकासा चांगला नाही. बरीच चमचागिरी आहे, आणि त्यांच्या गायकीची दुबळी बाजू नज़रेआड केली आहे. रवींद्र पिंगे यांनी याच सुमारास (कदाचित १९७२ मधे) कुमारजींना त्यांच्या देवासच्या घरी भेट दिली. आणि त्यांच्यावर प्रदीर्घ लेख लिहिला. तो 'सर्वोत्तम रवींद्र पिंगे' या पुस्तकात तुम्हाला मिळेल. ज़रूर वाचा. लेख खेळकर शैलीत, गप्पाटप्पा करत लिहिला आहे. त्यातून कुमारांच्या विविध अंगांवर प्रकाश पडतो. त्या भेटीत लेखकानी कुमारांची द्वितिय पत्नी वसुंधराबाई कोमकली आणि मुलगा मुकुल यांच्याशीही चर्चा केली. त्याचाही उल्लेख आहे. तो लेख माझा अगदी आवडता आहे. त्या पुस्तकात कोकणच्या भूमीवर आणि जीवनशैलीवरही काही लेख आहेत, जे वाचण्यासारखे आहेत.

    - डी एन

    ReplyDelete
  10. तुम्हालाच काय, इतर कुणालाही कुमारांचा तो शिवमत भैरव ऐकायचा असेल वा नकलून घ्यायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधावा.

    विजय / v.wordsmith@gmail.com
    09822031963

    ReplyDelete
  11. @ शब्दप्रभा, अनेक धन्यवाद!

    ReplyDelete