बलिष्टांचे शक्तीस्थान त्यांचे मर्मस्थान पण असते. कुस्तीवरच्या एका कथेत फारा वर्षापूर्वी वाचलेले वाक्य. गुरू आपल्या शिष्याला हा उपदेश देतो. मल्लयुध्दाच्या डावपेचांतील हे एक इंगितः आपल्यापेक्षा अधिक ताकदीच्या मल्लाला चीतपट करायचे असल्यास त्याचे वर्म ओळखणे जरूरीचे असते.
भारतातून सुमारे इ. स. 200 वर्षापूर्वी बौध्ध भिक्षू चीनमध्ये धर्मप्रचारासाठी हिमालयातून जात असत. वाटेत लुटारू हल्ले करीत. तेव्हा त्या निशस्त्र भिक्षूनी जीजूत्सू विद्येचा शोध लावला. ही खरीखुरी विधायक सर्जनशीलता.
आज याची भारतातील बहुसंख्य दीनदलीत, पिडीत, कृषिक वर्गाला गरज आहे, विद्येची गरज आहे, नक्षलवाद्यांची नाही, परजीवी संघटनांची नाही. भारतातील उच्चवर्गीयानी, किंवा उच्चवर्णीयानी म्हणा, त्याना हजारो वर्षे विद्येपासून वंचित ठेवले, व या निधर्मी लोकशाहीत अजूनही ठेवलेय. ही विद्या बदलत्या काळानुसार बदलायला हवी. ही विद्या कृषिक भारतीयांसाठी समर्पक आहे.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:
Post a Comment