June 25, 2010

श्रम गेले गटारात

येथल्या गटारांतूनही
या शहरी जीवनात आशा आहे काही
गाळून सोने काढायची
पण येथल्या मूढमतींकडून काहीच नाही --
दिसायला ते शोभिवंत
परि असती ते भोगवादी बाजारू वस्तू --
करिती फक्त पोपटपंची
त्यांचे प्रतिसाद उथळ, भेदी त्यांचे कारक व्यापार

काय अपेक्षा करणार
या संवर्धित कृत्रिम फुलझाडांकडून
घडवले जयाना जुळवणी पंक्तिवर
या संस्कृतिने, जी सदा मदमस्त संमोहित सुखात नि अवशिष्ट निर्मितीत?
नाही फुले. नाही फळे.
ना सर्जनशील कर्म. नाही मुक्ति. 

*  *  *
(माझ्या मूळ इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर)   
टिप: (१) सेकंदाला फक्त एक पैसाः सेलफोनवर बोलायचा दर! मात्र रोजचया व्यवहारातून एक, दोन, पांच, दहा, वीस पैशांची नाणी कधीच गेली. आता पंचवीस पैशाचे नाणे पण दिसत नाही. पैशांची किंमत वाढली पण मोल कमी झाले. यंत्राची किमत (मजूरी) वाढली. श्रमाची किंमत व मोल, दोनही कमी झाली. मजूराला तासाच्या पण हिशेबाने कोणी मजूरी देत नाही. शारीरिक व मानसिक श्रम कमी करायला यंत्र वापरायचे. पण जे यंत्राचे गुलाम झाले त्यांचे मोल काय? (अधिक वाचा: सोन्याच्या शोधात: मुंबईत आपला परिसर )
 
(२) छायाचित्रे :  "मुंबईत सोने शोधणारे" | रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


Page copy protected against web site content infringement by Copyscape

5 comments:

 1. hi remi, aaj baryach divasani online vachanyachi sandhi milali... tujhe likhan aavadale. mala far neet articulate karata yet nahi feelings... ani ho blog cha nava look pan aavadala... ase vatatey ki tujya blog var pan shravan aalay.. :)

  ReplyDelete
 2. हर्षदा, मी नेहमीच भिजलेला असतो. वसंतात पालवी येते, ग्रीष्मात फुले फळे येतात, श्रावणात जमिनीवर पडलेल्या बिया रुजतात. अशावेळी फारच homesick वाटते बघ. वाटते याच ढगावर बसावे आणि कोकणातील माझ्या गावी-घरी पावसाच्या धारांबरोबर बिनधास्त कोसळावे. अशीच अधून मधून आठवण करावी हे विनंती.

  ReplyDelete
 3. @हर्षदा विनया, लिहील्यावाचून राहवेना. मलापण सुव्यक्त (articulate ) लेखन करण्यात अडचण येते. ही कविता इंग्रजीतून भाषांतर करताना परिभाषेची पण अडचण आली. जात सारस्वताची असली तरी रेमीचा पिंड शेतकऱ्याचा. बियाणे पेरून चालत नाही. त्या अगोदर आणि नंतर पण मशागत करावी लागते. ही मूळ इंग्रजी कविता माझ्या इंग्रजी ब्लॉग वर जरूर पाहा. (दुवा http://remidesouza.blogspot.com/2010/07/labour-lost-in-gutters-poem.html). आणि High Voltage (H.V.) टिप्पणी वाचायला मिळेल अशी आशा बाळगतो.

  ReplyDelete
 4. @ हर्षदा, @ संदीप, आभारी. मराठीला स्वत:ची लिपी आहे. हां, कोकणी भाषेत गोमांतकी कोंकणीत काही लोक रोमन लिपी पोतुगीजांच्या काळापासून वापरत आले. कारवारी कोंकणी काहीजण कानडी लिपी वापरतात. रोमन लिपी आणि विलायती भाषा स्वनिक (phonetic) नाहीत. याउलट आमच्या भाषा स्वानिक आहेत. गुगल इ कंपन्या हिंदी मराठी ओळखतात पण देवनागरीचा उल्लेख करीत नाहीत. ही त्यांची उणीव, कमतरता, अज्ञान आहे असेच समजायचे नाही का? कि ते आगाऊ आहेत असे समजायचे?

  ReplyDelete