आई नर्मदे
चण्डिकेचा अवतार धारण करून
गावे राने धुवून काढतेस
तरीही लोक तुझा जयघोष करतात...
आई नर्मदे
हरघडी मी अनिवार्य ओढीने
तुझ्याकडे येतो सर्जनशीलतेला जेव्हा होतात
सामाजिकतेचे बांध असह्य...
कितिक ओंजली भरभरून मी पीतो
आणी श्रध्दा माझी प्रत्येक ओंजळीतून
सामर्थ्याचं प्राशन करते...
आई नर्मदे
तुझ्या पाण्याच्या प्रत्येक ओंजळीने
माझ्या आतला अग्नी प्रज्वलीत करावा
जागा ठेवावा;
आणी त्या अग्नीचा मलाच विरघळून
टाकणारा महापूर बनावा;
मनातील सामाजिकतेची सारी जळमटे
धूवून टाकणारा अग्नीपूर भडकून उठावा;
त्यात स्वत:च निर्माण केलेल्या
दंभाच्या साऱ्या प्रतिमा नष्ट व्हाव्या;
त्या साऱ्या पतिमानी डागाळलेले
जीवन मुक्त मनसोक्त व्हावे...
आई नर्मदे
त्या अग्नीपूरात तुझीही प्रतिमा नष्ट झालीय;
आता मीतूचा भावही संपलाय;
तुझ्या पाण्याच्या प्राशानाने मी नर्मदामय झालोय.
माते वैराग्यभूमी,
युगायुगांची साक्षी
तुझ्या पाण्याच्या प्राशानाने
दुर्बलांचे अश्रू लाव्हारासा बनू दे;
त्यांचे निश्वास ज्वालामुखी बनू दे;
आणी त्यांची जीवने अग्नीपूर होवूं दे।
-----
स्थळ:
सन : १९६९
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
मकर वाहिनी नर्मदेच्या पदकमली रमते!
ReplyDeleteमाझे मन पावन होते!!
बिंदूमधुनी निघून मैय्या सिंधू अशी होते!
कल कल करता करता रेवा ही धावते!
मधुर त्या जलनादे मन माझे रंजते!
माझे मन पावन होते!!
तव जलांतरीचे अगणित जलचर!
दिव्य अंबरी विहरती नभचर!
तुझ्या क्रुपेने जीवन हे बहरते!
माझे मन पावन होते!!
वंदना! आपल्या अर्थपूर्ण कवितेने केलेली टिप्पणी भावली!!
ReplyDelete