July 14, 2009

अशी कविता: एक कोडें

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. रेमी, मी ह्या कवितेला चाल लावलेय. ;)
    तुझा इ-मेल पत्ता दे म्हनजे पाठवता येईल. :)

    ReplyDelete
  2. प्रमोद,
    तुमच्या ब्लॉग वरचे प्रतिसाद पाहिले. आणि आता ही माझी कैफियत नमूद करतोय; काही उशीर झालेला नाही.

    तुम्ही गायलेली "अशी कविता..." ऐकून वाटले ती "कविता' होती, आता "गाणे" झाली. धन्यवाद. मनातली रुखरुख कमी झाली, संपली नाही.
    मला नेहमीच वाटते, कवितेला गेयता हवी.

    कविता लिहिणे हा काही माझा पेशा नाही. किंवा लेखन ही माझा पेशा नाही. तसेच शास्त्रीय संगीताचा मी दर्दी नाही. पण संगीत समजते. लिहिणे अपरिहार्य आहे म्हणून लिहितो.

    ही कविता कोडे अशासाठी:
    पहिल्या दोन ओळीत या आणि माझ्या ईतर काही कवितांची लक्षणे दिलीत.
    नंतरच्या दोन ओळीत वास्तविकतेचा -- आजच्या वास्तविक स्थितीचा -- उल्लेख आहे.
    पुराण काळी "श्रृति -स्मृती" पद्यात रचल्या होत्या. आणि हा प्रघात नंतरही चालत आला -- संस्कृत, प्राकृत, प्रादेशिक भाषांत. आजही लोकगीते लोकबोलीत रचली जातात. हे सारे साहित्य मौखिक (mnemonic) पद्धतीने पिढ्यान पिढ्या वारसाने आले. कागद आणि छपाई फारच नंतर आले.
    कधीकाळी मी पण बर्री-वाईट गाणी लिहिली होती, पण त्याना गेयता होती.
    आणि वाटेवर माझ्या रचनांचे "सांस्कृतिक संकरण" (cultural hybridization) कधी झाले समजलेच नाही. तरीही मी आग्रहाने असेच म्हणेन, मराठी असो की इंग्रजी, ही रेमीची बोलीभाषा आहे. मी अनेक भाषांत लोकगीते प्रत्यक्ष ऐकलीत. ती मलातरी हृदयस्पर्शी वाटली. माझ्या कोणत्याही कवितेस मला नाही वाटत त्यांची सर कधीकाळी येईल.

    रेमी डिसोजा

    ReplyDelete